Site icon http://www.sattadheesh.com

करोना वार्डात नातेवाईक जातात तोंडात औषध भरवायला महापौर साहेब!

जबरस्ती करणा-यांवर पोलिसी कारवाई!महापौरांच्या वक्तव्यावर नागरिकांचा संताप

आपण नव्हता गेलात का आईंना भेटायला?नातेवाईकांचा प्रश्‍न

केटी नगर काेव्हिड उद् घाटन सोहळ्यातून करोना पसरला नाही का?

नागपूर,ता. २९ एप्रिल: शासकीय रुग्णालयांमध्ये करोना बाधितांच्या वार्डात जाण्यास कायदेशीर प्रतिबंध आहे हे नागरिकांनाही माहिती आहे मात्र महापौर दयाशंकर तिवारी म्हणतात तसे आम्ही सकाळ,दूपार,संध्याकाळी जेवण,चहा,नाश्‍ता घेऊन जात नाही तर त्यांच्या टेबलवर पडलेली औषधे तशीच पडून राहतात,ती त्यांच्या तोंडात कोंबायला जात असल्याची उद्विग्न भावना अनेक नागरिकांनी व्यक्त केली.

शासकीय रुग्णालयांमध्ये असणा-या वयोवृद्ध रुग्णांना मोबाईलवर ही बोलता येत नाही.त्यांच्या तोंडाला ऑक्सीजन मास्क लागलेला असतो,तेथील परिचारिका या त्यांना मोबाईलवर मॅसेज टाका म्हणून सांगतात,त्यांना मोबाईवर मॅसेज टाकता आला असता तर करोना झालाच कशाला असता?एवढे हूशार असते तर करोना होण्यापासून सावध नसते का राहीले? ?असा संतप्त सवाल रुग्णांचे नातेवाईक विचारत आहेत.

जे जेवण त्यांना पोहोचवतो ते ही तसच पडून असतं.वार्डात त्यांच्या तोंडात प्रेमाने एक पोळी तरी खा म्हणून भरवणारे कोणी नाही,लवकर बरे व्हायचे आहे ना?म्हणून आम्हीच एक पोळी कशीबशी त्यांच्या तोंडात कोंबून येतो,महापौर साहेबांच्या ९६ वर्षीय वयोवृद्ध मातोश्री या देखील करोना संसर्ग झाल्याने काही महिन्यांपूर्वी मेयो रुग्णालयात दाखल होत्या मग महापौर साहेबांनी कोव्हिडचा नियम पाळला का?ते गेलेच नाही का आपल्या आईच्या खोलीत?त्यांची पत्नी देखील मेयोमध्ये भर्ती होत्या,त्यांना ही भेटायला महापौर गेलेच नाही का?असा प्रतिप्रश्‍न आता विचारला जात आहे.

आधीच धस्तावलेली असणारी रुग्ण आपली माणसे जवळ बघतात तर त्यांना धीर येतो मात्र तुम्ही आम्हालाच पोलिसी खाक्या दाखवण्याची भाषा वापरत आहेत?दररोज तुमचे उद् घाटन साेहळे सुरुच आहेत,फिरती बस,ऑक्सीजन प्लांट,गर्दीमुळेच भारतात करोना वाढला हा जागतिक आरोग्य संघटनेनेच ठपका ठेवला आहे.विषाणूचे नवे रुप,लसीकरणाचा अल्प वेग आणि अनावश्‍यक गर्दी यामुळे करोनाचा उद्रेग झाला अशी ही जागतिक संघटना सांगते तरी देखील गर्दी जमवून तुमचे राजकीय उद् घाटन सोहळे सुरुच आहेत?वरुन सगळे नियम आम्हालाच शिकवणार,पोलिसांच्या हवाली करणार?सोशल मिडीयावर आज अनेक नेटीझन्सनी महापौरांवर असे चौफेर वार केलेत.

मूळात आमच्यामुळेच करोना पसरतो का?तुम्ही नुकतेच थाटामाटात केटी नगरच्या कोव्हिड रुग्णालयाचे उद् घाटन केले त्यात मंचावर किती गर्दी होती?मंचावरच वीसपेक्ष्ा जास्त माणसे बसली होती,समोर कार्यकर्त्यांची फौज होती,त्यांच्याकडून करोचा प्रसार झाला नाही का?सगळे नियम आम्हीच पाळायचे का?तुम्ही उद् घाटन सोहळे बंद करा व फक्त या अमूक-अमूक सुविधा सुरु केल्या अश्‍या फक्त ‘घोषणा’करा ना?

आम्ही आमच्या रुग्णांच्या ऑक्सीजन नळीतील फ्लो मीटरमधील संपलेलं पाणी टाकायला आत जातो कारण अनेक परिचारिका या कर्तव्यावर असताना आपापल्या व्हॉट्स ॲपवर व्यस्त असतात,आजचा काळ हा काही ‘मदर टेरेसा’सारख्या संवेदनशील रुग्णसेवेचा नाही,त्यामुळेच आम्हालाच जोखीम पत्करुन कोव्हिड वार्डात आपल्या माणसासाठी जावं लागतं आणि आमच्यावर पोलिसी कारवाई करायचीच असेल तर आधी केटी नगर मधील कोव्हिड केअर केंद्राच्या उद् घाटनात तुम्ही जमवलेल्या गर्दीवर कारवाई करा,असा संताप आता व्यक्त केला जात आहे.

काय म्हणाले महापौर?

कोरोनाबाधितांच्या वार्डात जाण्यात त्यांच्या नातेवाईकांना मनाई आहे. तरीही त्यांचे नातेवाईक नजर चुकवून जबरदस्तीने सकाळी, दुपारी, संध्याकाळी व रात्री चहा, नास्ता, जेवण घेऊन त्यांना भेटायला जातात. कोव्हिडच्या मागील साथी मध्ये कोव्हिड वार्डा मध्ये रुग्णालय कर्मचा-यांच्या व्यतिरिक्त इतरांना प्रतिबंधीत करण्यात आलेले होते व त्यानुसार पोलिस प्रशासनाने देखील कठोर निर्बंध लावले होते. सद्यस्थीतीत कोव्हिड वार्डातून निघणारा माणून कोरोना कॅरिअर म्हणून समाजात वावरत आहे, त्यांच्या प्रवेशावर पोलिसांच्या सहकार्याने प्रतिबंध घाला,

महापौरांनी सांगितले की, कोव्हिड वार्डात बाधितांच्या नातेवाईकांना आत जाण्याची परवानगी देऊ नये. पोलिसांनी नागरिकांना बाहेर थांबवावे आणि जर कोणी जबरदस्ती करत असेल तर त्याच्यावर नियमानुसार कारवाई करण्यात यावी. नागपूरला कोरोनापासून मुक्त करायचे असेल तर कडक निर्बंध लावावे लागतील.

Exit mobile version