उपराजधानीव्यापार- वाणिज्य

 ज्येष्ठ नागरिकांच्या वैद्यकिय सेवेसाठी बुटीबोरी येथे अद्यावत ’आशानिकेतन मेडिकल वृद्धाश्रम’

ज्येष्ठ नागरिकांच्या वैद्यकिय सेवेसाठी बुटीबोरी येथे अद्यावत ’आशानिकेतन मेडिकल वृद्धाश्रम’

नागपूर: पाश्‍चिमात्य देशात तसेच जगातील इतर विकसित देशात ‘ हाॅस्पीस’ ही सेवा उपलब्ध असते. वयाची साठी पार केल्यानंतर आर्थिकदृष्टया स्थैर्य असलेल्यांना मात्र शारिरीक व्याधींना सामोरे जावे लागत असणाऱ्या अश्‍या हॉस्पीस म्हणजेच मेडिकल वृद्धाश्रमात सेवा सुश्रृषा पुरविली जाते. नागपूर येथे बुटीबोरीमध्ये असेच एक अद्यावत ‘आशानिकेतन मेडिकल वृद्धाश्रमाची’ नुकतीच २४ एप्रिल २०१९ रोजी नागपूर शहरातील निष्णात डॉक्टर प्रा.डॉ.विठ्ठलराव पु. दांडगे यांनी सुरवात केली.
नागपूर शहरासाठी ही एक अनोखी संकल्पना असून जवळपास तीस लाख लोकसंख्या असणाऱ्या नागरिकांपैकी हजारो नागरिकांना वैद्यकीय वृद्धाश्रमाची नितांत आवश्‍यकता असते मात्र अशी सेवा देणारी संस्था नेमकी कुठे आहे याची त्यांना माहिती नसते.

आशानिकेतन मेडिकल वृद्धाश्रमात गात्रं थकल्यामुळे हवी असणारी सेवा पुरविली जाते यासोबतच रक्तदाब, हद् यरोग,मधुमेह,पक्ष्ाघात, सांधेदुखी,स्मृतीभ्रंश,कंपवात,अपघातामुळे आलेले पराविलंबत्व इत्यादीसाठी अद्यावत सेवा पुरविली जाते. एकाकी ज्येष्ठ नागरिक ज्यांना अनेक अडचणींचा सामना करावा लागतो,बँकेचे व्यवहार, विविध बिले भरणे, कौटूंबिक गरजांमुळे करावी लागणारी खरेदी ही सेवा देखील हॉस्पीसमध्ये पुरविली जाते.ज्यांना कर्करोग झाला आहे किंवा पक्ष्ाघात झाला त्यांनाही नियमित औषधे देणारी व सेवा करणार्या सेवेकरींची गरज असते. अश्‍यांना आशानिकेतन मेडिकल वृद्धाश्रमात हक्काची मदत मिळते. अन्न,वस्त्र,निवारा व वैद्यकीय उपचार एकाच छताखाली उपलब्ध असणे हे वयोवृद्ध रुग्णांसाठी अत्यंत सोयीचे ठरते. आशानिकेतन त्यांना ही सोय उपलब्ध करुन देते. अशी सेवा देणारी भारतात फार कमी केंद्रे आहेत,नागपूर शहरात देखील फार कमी संस्था या सेवा पुरवितात. लोकसंख्येच्या मानाने या सेवेचा विस्तार होणे गरजेचे आहे,अश्‍यावेळी डॉ.दांडगे यांनी बुटीबोरी एम.आय.डी.सी औद्योगिक क्ष्ेत्रात,नागपूर पासून २२ किलोमीटर दूर असलेल्या रचना हॉस्पीटलच्या विस्तीर्ण परिसरांत हा नवीन आशादायी उपक्रम सुरु केला.ज्येष्ठ नागरिकांचे कष्टमय जगणे अधिक सुकर व्हावे याकरीता आशानिकेतनमध्ये सर्व सुखसोयी पुरविण्यात आल्या आहेत. .िवविध व्याधींनी ग्रस्त रुग्णांसाठी तज्ज्ञ डॉक्टरांची चमू २४ तास सेवारत राहते. प्रशिक्षित परीचारिकांची चमू त्यांच्या सेवा व मदतीसाठी २४ तास तत्पर राहते. गरज पडल्यास रक्त तपासणी, क्ष्-किरण तपासनी, भौतिकोपचार, व्यवसायपोचार या सर्व सेवा उपलब्ध असून कर्क रुग्णांसाठी योग्य त्या रुग्णालयात उपचारासाठी रुग्णवाहीकेने ने-आण करण्यासाठी उपलब्ध आहे. एका आधुनिक इमारतीत ४० ज्येष्ठ नागरिकांसाठी सोय करण्यात आली आहे.

रचना हॉस्पीटल व अनुसंधान केंद्राची सुरवात २० वर्षांपूवी-
रचना हॉस्पीटल व अनुसंधान केंद्राची सुरवात २० वर्षांपूर्वी,बुटीबोरीच्या एम.आय.डी.सी परिसरात झाली. २४ तास वाहरणारा राष्ट्रीय महामार्ग क्र. ७ जवळच असल्यामुळे रस्त्यांवरील अपघातग्रस्त व्यक्ती तसेच बुटीबोरी औद्योगिक वसाहतीमधील कारखान्यात काम करताना अपघातग्रस्त कामगारांसाठी रचना हॉस्पीटल हे जीवनदायिनी ठरले आहे. अपघातग्रस्तांना वाचविण्यासाठी पहीले काही सुवर्ण क्ष् ण हे अत्यंत महत्वाचे असते. रुग्णालयात घेऊन जाण्यासाठी अर्धा,एक तासांचा वेळही मृत्यूला आमंत्रण देत असतो.या पार्श्वभूमिवर डॉ.दांडगे यांचे हे रुग्णालय येथील रहीवाश्‍यांसाठी देखील ‘पूजास्थळ’ झाले आहे. एवढी श्रद्धा येथील लोकांची डॉ.दांडगे यांच्याप्रति आढळते. रचना रुग्णालय व अनुसंधान केंद्राकडून सुरु होणारा हा नवीन उपक्रम निश्‍चितच ज्येष्ठ नागरिकांसाठी सुसह्य जीवन देणारा ठरेल असे डॉ. दांडगे सांगतात. सध्या स्थितीत २४ निष्णात डॉक्टर्स आपली सेवा आशानिकेतनला प्रदान करीत आहेत. आशानिकेतन मधील ट्रॉमा केअर सेंटर,आयसीयूचा उपयोग आशानिकेतन उद् घाटीत झाल्याबरोबरच अनेक रुग्णांना झाला हे विशेष.

डॉ.विठ्ठलराव दांडगे यांचा बालरोगतज्ज्ञ पासून तर रचना हॉस्पीटलच्या अध्यक्ष् पदापर्यंतचा सेवाभावी प्रवास-
बुलढाणा जिल्ह्यातील दहिगाव( माटोडा) या लहानशा गावात विठ्ठलराव यांचे प्राथमिक शिक्ष् ण झाले. पुढील शिक्ष् ण बुलढाणा येथील शाळेत झाले.याच शाळेत आगाशे मास्तर यांच्या कठोर शिस्तीत विद्यार्थी म्हणून ते घडले. ‘खोट््याच्या बाबतीत ऐकायचे नाही..नाव खराब झाले तरी चालेल पण सत्याची कास सोडायची नाही,प्रसंगी सत्यासाठी दोन ठेऊन देण्याचेही सामर्थ्य अंगी असावे’ हे त्यांचे जीवन जगण्याचे तत्वज्ञान होते. त्यांच्या सुविद्य पत्नी शशिकला आगाशे यांनी देखील विठ्ठलराव यांच्यावर मुलाप्रमाणे माया केली. यानंतर नागपूरात मोहता सायंसमध्ये एडमिशन घेतली. विज्ञान शाखेतच जायचे हे बालपणापासूनच मनात होते. १९६८ मध्ये एमबीबीएसच्या शिक्ष् णाचा प्रवास सुरु झाला. १९७२-७३ मध्ये डॉक्टरची पदवी मिळवली. सुरवातीला दीड वर्ष पॅथोलॉजीला अध्यापन केले. मात्र मनाची ओढ ही बालरोगतज्ज्ञ होण्याकडेच होती. पुढे हे स्वप्नं पूर्ण झाले. आणि एम.डी.ची डिग्री हातात आली. २९ नोव्हेंबर १९७७ रोजी मेडिकलमध्ये बालरोग विषयाचा अधिव्याख्यता म्हणून रुजू झालो. १९८१ मध्ये मुंबईच्या नामांकित जे.जे.रुग्णालयात ७ वर्षे अध्यापन केले. यानंतर मुंबईतील टोपीवाला नॅशनल कॉलेजमध्येही ५ वर्ष अध्यापन केले. येथे ते विभागप्रमुखही होते.

अध्यापन कार्यकरीत असतानाच त्यांनी बालकांच्या श्‍वसन रोग संबधी सखोल अभ्यास केला. बाल श्‍वसन रोगाविषयीचे अध्ययन करणारे ते फांऊंडर प्रोफेसर आहेत. बाल श्‍वसन रोगाचे अध्ययन करण्याची नींव त्यांनीच ठेवली. त्यांच्या याच विद्वत्तेचा गुण हेरुन गल्फ कंट्रीतील ओमान मध्ये नोकरीची संधी मिळाली. मात्र लाखोच्या घरात पगार असताना देखील दोन वर्षात त्यांनी ती नोकरी सोडून मातृभूमीतच वैद्यकीय सेवेचा उपयोग करण्याचे ठरवले. दोन मुली व एक मुलगा असणार्या कुटुंबियांची देखील जवाबदारी त्यांच्यावर होती. ओमानमध्ये शिक्ष् ण हे भारतासारखे दर्जेदार नव्हते. भारतातही त्यांनी नागपूर शहरालाच कारर्कीद घडविण्यासाठी प्राधान्य दिले. १९९५ मध्ये काही काळ शतायुमध्ये ओपीडी चालवली यानंतर सीताबर्डी येथील लता मंगेशकर हॉस्पीटलमध्ये ते रुजू झाले.पुढे रणजीत देशमुख यांच्या आग्रहातून हिंगणा येथील लता मंगेशकर रुग्णालयात त्यांनी वैद्यकीय शिक्षक सेवा सुरु केली. १९९६ साली त्यांनी बुटी बोरी येथे ७० हजार स्के. फुटची जागा विकत घेतली. चार वर्षे बांधकामाला लागले व आपल्या मोठ्या मुलीच्या नावाने मल्टी स्पेशल रचना हॉस्पीटलची सुरवात केली. उद् घाटनाला स्वत: त्यावेळेचे विरोधी पक्ष् नेते नितीन गडकरी हे आले होते. गडकरी यांनी डॉ.विठ्ठलराव यांचे कौतूक करताना ‘काही माणसे ही ध्येयवेडी असतात,मी पण एक वेडा राजकारणीच आहे त्यामुळेच सांगतो हे रुग्णालय शंभर टक्के यशस्वीपणे चालणार आहे’ पुढे गडकरी यांचेच शब्द खरे झाले. डॉ.विठ्ठलराव दांडगे यांना एकाच दिवशी ७० बालरुग्ण तपासण्याची वेळ येऊ लागली. मुलांच्या मृत्यूदरात कमी येऊ लागली त्यामुळे आजूबाजूच्या परिसरात ‘या रुग्णालयात नेले तर हमखास बाळ वाचते’अशी ख्याती पसरली. बालरुग्णांशिवाय विष प्राशन करुन येणारे हजारो शेतकरी रुग्णांना देखील रचना हॉस्पीटमध्ये जीवनदान मिळाले. ५०० च्या वर हेड इंजूरीच्या रुग्णांना वाचवले.‘कोणताही व्यवसाय हा विश्‍वासावर चालतो’ असे डॉ.दांडगे म्हणतात. रचना हॉस्पीटल बांधण्यासाठी सुरवातीला प्रभाकर दटके हे अध्यक्ष् असलेल्या शिक्ष् क सहकारी बँकेकडून कर्ज मिळाले नाही. मग नंतर स्वत: बोलावून साढे बारा लाखांचे कर्ज फक्त विश्‍वासावर मंजूर केल्याची आठवण ते खास ‘सत्ताधीश ’न्यूज पोर्टलला दिलेल्या मुलाखतीत सांगतात.

नुकतीच त्यांनी आशानिकेतन या मेडिकल वृद्धाश्रमाची नवी संकल्पना प्रत्यक्ष्ात साकारली. याचा लाभ शहरातील नागरिकांनी घ्यावा असे आवाहन त्यांनी केले आहे. त्यांची कन्या डॉ.रचना या देखील बालरोगतज्ज्ञ आहेत. जावई डॉ.अनिल सोनटक्के हे वयस्क लोकांचे श्‍वसनरोग तज्ज्ञ आहेत.त्यांना पार्थ आणि अन्वय ही दोन गोंडस मुले आहेत.  धाकटी कन्या प्रेरणा हीचं एक वर्षा पूर्वी लग्न झालं, ही आयटी झाली असून सिंगापूर येथे कार्यरत आहेत.  तर डॉ.विठ्ठलराव यांचा मुलगा डॉ.शशांक दांडगे हे अस्थिरोगतज्ज्ञ असून त्यांनाही श्‍लोक आणि विहान नावाची दोन गोंडस अपत्ये आहे. चार नातवंडांचे लाडके आजोबा असणारे डॉ. विठ्ठ लराव दांडगे हे अतिशय साध्या व्यक्तिमत्वाचे धनी आहेत. समाजासाठी आपल्या विद्वत्तेचा काहीतरी उपयोग करावा याच ध्येयाने एकंदरीत आयुष्याची वाटचा ल त्यांची अद्यापही वाटचाल सुरु आहे. दहिगावसारख्या लहानशा खेडेगावातून येऊन शहरात त्यांनी उभारलेली ही नेत्रदीपक कामगिरी निश्‍चितीच कौतुकास्पद ठरते.

डॉ.विठ्ठलराव दांडगे-संपर्क क्रमांक – ९४२२१०६७७४, ९३७०९४४९५१
डॉ.शशांक दांडगे- ९४२२१०८२३९

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *