फक्त..बातमीशी बांधिलकी

फक्त..बातमीशी बांधिलकी

Homeउपराजधानी...आणि म्हाताऱ्या नवऱ्याने शेवटी तिला मुलगी मानले: व्ही शांतारामच्या क्लासिक चित्रपटाने प्रेक्ष्...

…आणि म्हाताऱ्या नवऱ्याने शेवटी तिला मुलगी मानले: व्ही शांतारामच्या क्लासिक चित्रपटाने प्रेक्ष् क विचारप्रवण

 

 

बापू का बायोस्कोपमध्ये पहील्या दिवशी ‘कूंकू’ ‘शेजारी’ दोन चित्रपटांचे सादरीकरण

नागपूर:नीरां’ ही आई-वडीलांच्या मायेला पाेरकी झालेली तरुण मुलगी. लोभी मामांच्या आश्रयात राहत असताना शहरातील नामवंत वकील ज्यांना स्वत:ची अतिशय कर्तृत्वान समाजसेवी असणारी तरुण मुलगी आणि बदफैली तरुण मुलगा असतो ते म्हातरपणाच्या एकटेपणाला कंटाळून पुन्हा लग्नं करण्याचा विचार करतात आणि नीरा त्यांच्या या ईच्छेची बळी ठरते. नीराला माहिती नसतं आपलं लग्न कोणासोबत होत आहे. तिला बघायला आले असताना वकील साहेबांच्या मुलालाच ती उपवर नवरा समजते मात्र जसा दोघांमधला ‘आंतरपाट’ बाजूला होतो तो क्ष् ण…प्रेक्ष् कांच्या काळजाचाही ठोका चुकवतो.हातात माळ असताना ती लगेच दोन पावले मागे होते आणि ओरडते ‘मी म्हातार्याशी लग्न नाही करणार’ मात्र लोभी मामा तिच्या हातातली माळ जबरीने म्हताराच्या गळ्यात घालतात. यानंतर पडद्यावर सुरु होतो तो फक्त तिचा ‘बंड’.नवरा म्हणून तिला तो पसंद नाही त्यामुळे तिला त्या म्हातारयाशी संसार करायचा नाही. ‘मी दू:ख सहर करील पण अन्याय सहन करणार नाही’ ही तिच्या स्वाभिमानाची लढाई पदोपदी सुरु असते, नवर्याच्या आत्याशी, समाजाशी, देवाशी,धर्माशी..जेव्हा जेव्हा ती आरशात बघून कपाळावर ‘कूंकू’ लावायला जाते तिचे हात थबकतात..तिची नजर भिंतीवरील श्रीराम-सीतेच्या, रुक्मिणी-श्रीकृष्णाच्या तस्बीरीकडे स्थिरावते..सीता आणि रुक्मिणी किती आनंदाने त्यांच्या कपाळवर कूंकू लावतात मग तिच्या नशीबी का असे कूंकू लेणे आले…हा प्रश्‍न ती त्यांनाच करते.
नागपूर महापालिका व ऑरेंज सिटी कल्चरल फाऊंडेशनतर्फे पर्सिस्टंट येथे अायोजित दोन दिवसीय व्ही.शांताराम यांच्या चित्रपटाचा महोत्सवात शनिवारी ’कूंकू’वशेजारी’हे दोन क्लासिक चित्रपट दाखवण्यात आले.ती एकटी आहे,तिच्या बाजूने कोणीही नाही,ना धर्म,ना समाज,ना कुटुंब,सगळ्यांची हीच अपेक्ष्ा असते आता लग्न झाले आहे तर तिने आता म्हातार्याचा नवरा म्हणून स्वीकार करावा व संसाराची सुरवात करावी मात्र तिला तिच्या आयुष्याची जी कल्पना असते तिला तसेच जगायचे असते. तिचं रसरशित तारुण्य श्रावणातही रखरखित असतं. म्हातार्या नवर्याच्या घरातील प्रत्येक रात्र तिच्या स्त्रीत्वाला कणाकणाने जाळत असते,त्यामुळे ती अधिकाधिक बंडखोर होते. म्हाताऱ्या वकीलाची समाजसेवी मुलगी दिवाळीत घरी येते तेव्हा नीरा तिला सांगते,‘मी अशी वागते कारण माझ्या वागण्याने या समाजाला धडा मिळाला पाहीजे,म्हाताऱ्या माणसाचे या पुढे कोणीही नातीच्या वयाच्या मुलीशी लग्न लावून देणार नाही!’ नीराचे हे सारगर्भित वाक्य संपूर्ण समाजालाच विचारप्रवण करायला लावणारे ठरतात. तिच्या जिवणाचं, तिच्या जगण्याचं तिळतिळ होम असतानाही ती दुसर्या मुलींचा विचार करते,यावेळी समासेवी मुलगी तिला सांगते..आशा सोडू नकोेस..अंधार्या रात्री नंतर दिवस नक्की उजाडतो..तुझ्याशी जिवनात ती पहाट उगवेल..म्हातार्या नवर्याला हे ऐकून स्वत:चीच लाज वाटते,आपल्या हातून काय अनर्थ घउले याची त्याला जाणीव होते,ते स्वत: नीराच्या कपाळावरील कूंकू पुसतात आणि शेवटी तिच्याकडून पुर्नविवाह करुन सुखी होण्यांच अभिवचन घेऊन तिच्या सुखासाठी,लग्न या बेडीतून तिच्या सुटकेसाठी तिला न सांगता आत्महत्या करतात.
व्ही.शांताराम यांचा हा चित्रपट काळाच्या कितीतरी पुढे होता. ‘माझं जगणं मी ठरवणार’हे स्वातंत्र्य त्यांनी तत्कालीन स्त्रीला त्या काळातच दिलं होतं. ते स्वातंत्र्य मिळालं नाही तरी मी ते घेणार, ‘तू म्हणजे एक व्यक्ति आहेस मग तू बाई असो किंवा पुरुष’ हा काळाच्या कितीतरी पुढचा विचार आपल्याला व्ही.शांताराम यांच्या चित्रपटात दिसतो. म्हणूनच हा चित्रपट क्लासिक ठरतो. स्त्री म्हणून ती जे आहे ते…आजही आहे..आजच्या काळातही स्त्री म्हणून तिचं विचारस्वातंत्र्य समाज,पुरुषी मानसिकता मान्य करते का? व्ही.शांताराम यांचा हा चित्रपट पर्सिस्टंट सभागृहातील प्रेक्ष कांनाही असाच विचारप्रवण करुन जाण्यात यशस्वी ठरला. म्हातार्या वकीलाच्या भूमिकेत केशवराव दाते व नीराच्या भूमिकेत शांता आपटे यांचा सर्वांग सुंदर अभिनय या चित्रपटाला एक वेगळीच उंची प्रदान करुन गेला याच शंका नाही. ‘कूंकू’लावल्यामुळे तुला निभावून न्यावं लागेल याला तिने दिलेला नकार..मी म्हाताऱ्या नवर्याचे नावाने हे कूंकू लावणार नाही हा तिचा प्रतिकार…हा या चित्रपटातला गाभा प्रेक्ष् कांच्या अंर्तमनाला खोलवर अस्वस्थ करतो हेच या चित्रपटाचे आजच्या काळातही यश आहे,असेच म्हणावे लागेल.

पुन्हा त्या चित्रपटाशी ‘नातं‘ जोडायला प्रेक्ष् क क्लासिक चित्रपट बघतात-अभिजित रणदिवे
चित्रपट निर्मितीची या एकविसाव्या शतकात पूर्णपणे तंत्र बदलले आहे. अनेकांना जुन्या काळातील चित्रपट हे जुनाट वाटतात. अभिनय शैली किवा परिधान, संवाद कौशल्य,कथा-पटकथा यांच्याशी आजच्या पिढीचा काहीच मेळ बसत नाही मात्र तरीही ७५-८० वर्षांपूर्वीची चित्रपट आजच्या काळात पाहण्याचे काय औचित्य आहे, आज ते चित्रपट का पाहावे तर याची तीन कारणे सांगता येतील,एक तर ज्येष्ठ पिढी यासाठी ते चित्रपट पुन्हा बघतात कारण फार पूर्वी कधीतरी त्यांनी तो बघितला असतो परिणामी पुन्हा त्या चित्रपटाशी ‘नातं‘ जोडायला ते चित्रपट बघतात, मधली पिढी त्यात नव्याने जे त्या काळी चित्रपट पाहताना सुटून गेलं होतं त्याचा पुन्हा नव्याने शोध घेते, पुन्हा त्या चित्रटाशी स्वत:ला जोडून घेतात, आता ते बघताना त्या वेळेला न बघता आलेले अनेक गोष्टी त्यांना नव्याने कळतातही, तर नवीन पिढी असे क्लासिक चित्रपट यासाठी बघतात कारण अमूक चित्रपट बघून कदाचित त्यांना काही तरी मिळेल या उद्देशाने ते असे ब्लॅक ॲण्ड व्हाईट चित्रपट बघतात. व्ही.शांताराम यांनी ‘कूंकू’हा चित्रपट जेव्हा तयार केला तेव्हा त्यामागे कोणतातरी ‘विचार’ होता. ‘कूंकू’ हा चित्रपट हा आधूनिकता, तत्वज्ञान किंवा एक प्रकारचा ‘ईझम’ होता असे म्हणायला हरकत नाही,असे ‘कंूकू’चित्रपटाचा अभिजित रणदिवे या समीक्ष् णात्मक उलगडा केला.

‘शेजारी’ फाळणीपूर्वीची हिंदू-मुस्लिम नातेसंबधाची पार्श्वभूमि!
शनिवारी व्ही.शांताराम चित्रपट महोत्सावत दाखवण्यात आलेला ‘शेजारी’ हा असाच आशयघन चित्रपट ठरतो. हिंदू आणि मुस्लिम धर्मीय दोन शेजारी राहणारे मित्रांची ही कथा. गावातील काही विघ्नसंतोषी लोकांमुळे त्यांच्या मैत्रीत तनाव निर्माण होतो. एका ताटात जेवणारे एक दुसर्याचे तोंडही बघायला तयार नसतात मात्र आपल्या हिंदू मित्राचा जीव धोक्यात असल्याचे पाहून मुस्लिम मित्र प्राण पणाला लावून त्याला वाचवायला धावतो, मात्र दोघेही धरणाच्या त्या माईन ब्लॉस्टमध्ये सापडून मरण पावतात. चित्रपटाच्या अंतिम दृष्यात दोघांचीही समाधी व कब्र शेजारी दिसते व संपूर्ण गावातील माणसे,जात-पात,धर्म,पंथ विसरुन दोघांच्याही समाधी व कब्रवर श्रद्धेने फुले अपर्ण करतात. माईन ब्लास्टच्या दृष्यात त्याकाळी देखील तंत्रज्ञानाची उत्तम सांगड व्ही.शांताराम यांनी घातली होती. चित्रपटातील पात्रे, त्यांचा पेहराव, त्यांचं वांगणं ही फक्त रुपकं आहेत,चित्रपटाचा आशय मात्र खरोखरच प्रेक्ष् कांना विचारप्रवण करुनच सोडतो.
‘माणूस म्हणून सारे प्रवासी घडीचे’ चित्रपटातील हे गाणं असंच आशयघन आहे. प्रभात स्टूडियोमध्ये १९४१ साली या चित्रपटाची निर्मिती झाली. या चित्रपटाचे समीक्ष् ण करताना समर नखाते सांगतात की व्ही.शांताराम यांचे चित्रपट नुसता आशय मांडत नाही तर विचार करायला लावतात. प्रेक्ष् कांवर जबादारी निश्‍चित करतात. त्याकाळी कॅमरे हे प्रचंड मोठ्या आकाराचे होते ते सतत हलवत ठेवणे, क्लोज अप घेणे,चेहर्यावरचे हावभाव टिपणे यासाठीच १२-१३ माणसे लागायची. १९७० पर्यंत तर रात्रीचे चित्रिकरण दिवसाच करण्यात येत असे. मग लेबोरेटरीत प्रोसेक करुन शेड टाकण्यात येत असे. सर्व पात्रांना संवाद शिकविण्याकरीता शिक्ष् कच राहते असे. व्ही.शांताराम यांच्या सर्व चित्रपटांचा जिवनमानाशी संबंध होता,असे ते म्हणाले.

नागपूरचे प्रेक्ष् क हे एफटीआयचे विद्यार्थी आहेत का?
समीर नखाते यांच्या समीक्ष् णातील अतिशय बोजड भाषा,अलंकारिक शब्द, तांत्रिकी शब्द हे सभागृहातील सामान्य प्रेक्ष् कांच्या डोक््यावरुन गेलेत. त्यांनी साध्या सरळ भाषेत चित्रपटाच्या आशयाचा उलगडा जर केला असता तर जास्त योग्य होते अशी प्रतिक्रिया सभागृहाबाहरे काही प्रेक्ष् कांनी व्यक्त केली. व्ही.शांताराम यांच्या चित्रपटांवर प्रेम करणारा रसिक प्रेक्ष् क हा समीर नखाते यांच्या तांत्रिकी भाष्याबाबत चांगलेच नाराज दिसले. आताचेच नव्हे हे नेहमीचेच आहे. हे पुणे नाही,हे नागपूरचे प्रेक्ष् क आहेत, नखाते हे दरवेळी नागपूरच्या प्रेक्ष् कांना पुण्यातील एफटीआय(फिल्म ॲण्ड टेलिव्हिजन इंनिस्टटयूट’]चे विद्यार्थी समजून अतिशय बोजड व तांत्रिक भाषेत प्रेक्ष् कांशी संवाद साधत असतात अशी नाराजी उघडपणे काही प्रेक्ष् कांनी सभागृहातून बाहेर पडताना प्रसार माध्यमांकडे बोलून दाखवली.

- Advertisment -spot_img

Latest बातम्या