उपराजधानीराजकारण

स्वत:महापौर असताना संदीप जोशी यांनी का नाही केले ,खासगी रुग्णालयांचे ‘ऑडीट?’

प्रशांत पवार यांचा सवाल

जय जवान जय किसान’ संघटनेचीच मागणी माजी महापौरांनी उचलली

नागपूर,ता. २९ एप्रिल: काल माजी महापौर संदीप जोशी यांनी व्हिडीयोद्वारे रुग्णांची आर्थिक लृट करणा-या शहरातील खासगी रुग्णालयांचे ते स्वत:च्या ‘स्टाईलने’ऑडिट करण्याचा इशारा दिला मात्र ते स्वत: महापौर पदी असताना व करोना हा त्यांच्याही काळात थैमान घालत असताना,तेव्हाही गरीब,गरजू रुग्णांची आर्थिक लृट होत असताना त्यांनी का नाही केले खासगी रुग्णालयांचे ऑडिट त्यांच्या स्टाईलने?ही मागणी तर गेल्या वर्षी ‘जय जवान जय किसान ‘संघटनेनीच त्यांच्याकडे केली असल्याची माहिती संघटनेचे अध्यक्ष् व राष्ट्रवादी पक्ष्ाचे नेते प्रशांत पवार यांनी पत्रकाद्वारे केली.

आमच्या संघटनेनीच असा अर्ज माजी महापौरांकडे दिला होता मात्र तत्कालीन महापौरांनी आमच्या अर्जाला केराची टोपली दाखवली,आता त्यांच्या एका जवळच्या मित्रालाच कोणत्याच खासगी रुग्णालयात खाट मिळाली नाही,तीन लाख रुपये अमानत रक्कम भरण्यास सांगण्यात आले व शेवटी त्या मित्राचा उपचाराअभावी दूर्देवी मृत्यू झाला,त्यामुळे आता माजी महापौरांना गरीब रुग्णांच्या वेदनांची जाणीव झाली का?असा सवाल प्रशांत पवार यांनी उपस्थित केला.

आमच्या संघटनेनीच खासगी रुग्णालयांचे तातडीने ऑडिट करा,अशी मागणी केली होती मात्र मनपामध्ये सत्ता भारतीय जनता पक्ष्ाचीच असताना आणि महापौरांच्या हातात अधिकार असताना का नाही तेव्हाच खासगी रुग्णालयांच्याविरोधात कठोर पावले उचलली?सत्ताधारी म्हणून आजही तुमच्याच हातात ‘ऑडीट’करण्याचे अधिकार असताना तुम्हीच ऑडीट करण्याची मागणी करीत आहात याचा अर्थ तुम्ही भाजप सोडली आहे का?असा टोला त्यांनी हाणला.

महापौर पदी असताना खासगी रुग्णालयांच्या या भयंकर लृटीच्या विरोधात काहीही न करणारे संदीप जोशी यांना आता या विषयावर काहीही बोलण्याचा अधिकार उरला नसल्याचा टोमणा पवार यांनी हाणला.

जी रुग्णालये रुग्णाला दाखल करण्यापूर्वीच रुग्णांकडून अनामत रक्कम मागत आहे त्यांनी ‘जय जवान जय किसान’संघटनेच्या ७८८८२७७३३२ या क्रमांकावर फोन करण्याचे आवाहन प्रशांत पवार यांनी केले.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *