उपराजधानीनागपूर मनपा

शहरात ‘मरणोत्सव’मनपा सत्ताधा-यांना मात्र निविदांचा सोस

जनसंपर्क विभागासाठी आय.टी.क्राफ्टची पुन्हा निविदा!

नागपूर,ता. ३० एप्रिल : करोनासारख्या भंयकर महामारीत जिथे शहरात असंख्य नागरिक दररोज मृत्यूमुखी पडतात आहेत तिथे शहराचे पालकत्व ज्या स्थानिक स्वराज्य संस्थेवर आहे त्या नागपूर महानगरपालिकेत मात्र अजूनही ‘टेंडर’प्रवृत्ती जोर धरुन आहे,मनपाच्या जनसंपर्क विभागाशी संलग्न कामांसाठी ६ वर्षांपूर्वी ‘महालकरआनंद नगरकर व वैभव लाडे संचालक असणा-या आय.टी.क्राफ्ट या खासगी एजंसीची नियुक्ती तीन वर्षांसाठी तीन कोटीं रुपयात करण्यात आली होती,दोन वर्षांपूर्वी पुन्हा या एजंसीला दोन वर्षांसाठी मुदतवाढ देण्यात आली तर मागील महिन्यात ५ मार्च २०२१ रोजी या एजंसीची मुदत संपल्यानंतर पुन्हा निविदा मागवण्यात आल्या असून याच एजंसीने पुन्हा निविदा भरल्याची माहिती आहे.

मनपाच्या एका सत्ताधारी नेत्याचीच असणा-या या एजंसीला सर्व नियम कायदे ताक वर ठेऊन काम मिळाले असल्याची बरीच चर्चा त्यावेळी मनपात रंगली.अगदी नवख्या असणा-या व जनसंपर्क कामाचा कोणताही अनुभव नसणा-या या एजंसीलाच काम मिळावे यासाठी दहा लाख वार्षिक टर्नओवरची अट मुद्दामून घालण्यात आली होती.विशेष म्हणजे या एजंसीने प्रत्यक्ष् कामाला आधी सुरवात केली,नियम नंतर जाहीर करण्यात आले होते.

मूळात मनपाचा अधिकृत जनसंपर्क विभाग असताना व या विभागातील ६ अधिकारी व कर्मचा-यांवर महिनाकाठी ११ लाखांच्या जवळपास खर्च होत असताना पुन्हा पाच लाख रु.महिना घेणा-या आय.टी.क्राफ्ट या एजंसीचा आर्थिक भुर्दंड नागपूरकर जनतेवर का?असा सवाल आता उपस्थित केला जात आहे.

या एजंसीला मनपाच्या विविध उपक्रमांचे सोशल मिडीयावरील प्रसिद्धीसाठी काम देण्यात आले तसेच एजंसीसोबत झालेल्या कराराप्रमाणे एकूण ६ कर्मचारी हे काम बघतील अशी अट असताना एजंसीमध्ये फक्त चार कर्मचारी सध्या कार्यरत आहेत.मनपाच्या नव्या इमारतीतध्ये चौथ्या माळ्यावर असणा-या भव्य कक्ष्ात या एजंसीसाठी ‘राजेशाही’ कक्ष् स्थापन करण्यात आला आहे.वीज,कूलर,पाणी,संगणक,कोरी कागदे,इंटरनेट इ.संपूर्ण खर्च मनपा करतेय वरुन सोशल मिडीयावर मनपाच्या विविध उपक्रमांची प्रसिद्धी करण्याऐवजी या एजंसीचे कर्मचारी ‘खरडणघाशी’ करीत बैठकीतील वृतांत पत्रकारांना मेल करण्याची जवाबदारी उचलत आहेत व मूळ जनसंपर्क विभागातील कर्मचारी फक्त काखेद फाईली दाबून मुख्यालयात फिरत असताना गेल्या ५ वर्षांपासून दिसत आहेत!

गेल्या ५ वर्षांपासून नागरिकांनी एजंसीचा भुर्दंड सहन केला मात्र या ५ मार्च रोजी या एजंसीची मुदत संपल्यानंतर देखील आणि करोना महामारीचा भयावह काळ असताना देखील मनपा सत्ताधा-यांना वायफळ खर्चांचा आणि आपल्या ‘टक्केवारीचा’मोह आवरता येईना,असा संताप आता व्यक्त केला जात आहे.तीन कोटी या एजंसीवर खर्च करण्यापेक्ष्ा ऑक्सीजन प्लांट उभारा कारण तिसरी लाट जुलै ऑगस्टमध्ये येणार असल्याचे भाकीत स्वत:आज मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनीच आभासी माध्यमातून केले आहे.

गेल्या १५ वर्षांत सत्ताधारी भारतीय जनता पक्ष्ाने संपूर्ण मनपाचे अतोनात दोहन केल्याची चीड आता माध्यमात उमटली आहे.पाणी वाटपाची जवाबदारी मनपावर असताना ओसीडब्ल्यूला नागरिकांच्या डोक्यावर ‘चोवीस बाय सात’या बोगस आश्‍वासनाखाली आणून बसवले.बहूमताच्या जोरावर शहर परिवहन व्यवस्थेची वाट लावली.सिमेंट रस्त्यांच्या निविदेत प्रचंड भ्रष्टाचार केला.एकाच प्रभागातील एकाच सिमेंट रस्त्यांचे फक्त बिल नंबर बदलून पैसे मंजूर करुन घेतले.

मनपा कर्मचारी व अधिकारी हे प्रशासकीय कारभार करण्यासाठी ‘सक्ष् म’नसल्याची जाणीव भाजपला झाल्यानेच गेल्या १५ वर्षापासून कर संकलनापासून तर दहन घाटांपर्यंतचे प्रत्येक काम हे खासगी एजंसींना देण्यात आले.प्रत्येक प्रकल्पासाठी मनपाच्या प्रशासकीय अभियंतांना डावलून कोट्यावधी रुपये खर्चून खासगी ‘सल्लागारांच्या‘ नियुक्त्या केल्या. जनतेच्या कष्टाचा करांचा पैशांचा अक्ष् र: चुराडा केला,असा संताप व्यक्त होत आहे.

आज महामारीच्या काळात मनपा दवाखान्यांची स्थिती काय आहे हे नागपूर खंडपीठानेच स्पष्टपणे व कडक शब्दात नुकतेच अधोरेखित केले आहे.गेल्या १५ वर्षांचा सत्ताधा-यांचा कारभार हा प्रत्येक प्रकल्पामध्ये पैसा खाण्याचाच असल्यामुळे शहराचा विकास होण्याऐवजी शहर व अारोग्य व्यवस्था ही अधिकच भकास झाल्याची चीड समाज माध्यमात उमटत आहे.

करोना महामारीमुळे कदाचित सत्ताधा-यांचे डोळे उघडले असावे असा फसवा आशावाद नागपूरकर जनतेने बाळगला होता मात्र पुन्हा आय.टी.क्राफ्ट सारख्या आपल्याच एजंसीला कोट्यावधी रुपयांची लृट करुन पुन्हा नागपूरकरांच्या डोक्यावर बसविण्याचा घाट घालण्यात आला असल्याची चीड व्यक्त केली जात आहे.

फक्त दिखाव्यासाठी यंदा ही आय.टी.क्राफ्टसोबत इतर तीन कंत्राटदारांच्या निविदा भरण्यात आल्या असल्याचे दबक्या आवाजात बोलले जात आहे.माय अल्काय कम्यूनिकेशन,अमित एडवर्डटाईज व Acintva सोल्यूशन्स या तीन निविदा प्राप्त झाल्या आहेत.लवकरच या निविदा ओपन होतील,यात पुन्हा आय.टी.क्राफ्टला अनुभवाच्या नावावर दोन वर्षांसाठी काम सोपवले जाण्याची शंका व्यक्त केली जात आहे.इतरांना काम मिळू नये व आपल्याच एजंसीला काम मिळावे याकरिता मनपामध्ये कश्‍याप्रकारे बोगस निविदा भरल्या जातात,जाचक अटी लादल्या जातात,स्थायी समितीत मंजूर केल्या जातात,सभागृहाचा शिक्कामोर्तब बसतो,यावर एखाद्याची पीएच.डी होऊ शकते,अशी कोटी मनपात ऐकू येते.

यंदा ही आय.टी.क्राफ्टलाच काम देण्याचा घाट रचल्याची आशंका व्यक्त केली जात आहे.विशेष म्हणजे आ.विकास ठाकरे हे महापौर पदी असताना त्यांनी कधीही प्रशासकीय कामात हस्तक्ष्ेप केल्या नसल्याचे तेथील अधिकारी वर्ग सांगत असतो. मात्र ज्या भाजपकडे नागपूरकरांनी फार विश्‍वासाने सत्ता सोपवली,गेल्या १५ वर्षांत नाले,चेंबर,रस्ते,उद्याने,मनपा शाळा व रुग्णालयांची काय अवस्था झाली आहे हे सांगण्यास कोणत्याही ज्योतिष्याची गरज नाही.

………………………………………………

(सर्वाच्च न्यायालयाची सर्वोच्च टिपण्णी-
आज शुक्रवार दि. ३० एप्रिल रोजी सर्वोच्च न्यायालयाने अतिशय महत्वूपर्ण निर्वाळा देऊन समाज माध्यमांवर करोना महामारीसंबंधित प्रशासनाची हलगर्जी,रुग्णांची दुरावस्था दाखविणा-यांवर कोणताही गुन्हा दाखल करता येणार नसल्याचे सांगितले.अभिव्यक्ती स्वातंत्र्याचे रक्ष् ण करीत न्यायालयाने राज्य सरकार किवा प्रशासनाकडून असे घडल्यास हा न्यायालयीन अवमान मानल्या जाणार असल्याचा इशारा दिला)

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *