उपराजधानीक्राइम

प्रदीप उकेची लाख रुपयांची अय्याशी!मारोती नव्वाने लावला सरळ ऑडियो काॅल

ॲड.उके यांची कहानि पूरी’फिल्मी’:मारोती नव्वा याचा दावा:मी रमाणीला ओळखतसुद्धा नाही,मध्यस्थीचा प्रश्‍न आलाच कुठे?

नागपूर,ता. २२ फेब्रुवारी २०२२ : ॲड.सतीश उके यांचे धाकटे बंधू प्रदीप उके याच्यावर हिंगणा पोलिस ठाण्यात १२ फेब्रुवारी रोजी गुन्हा नोंदवला गेला. या पार्श्वभूमीवर ॲड.सतीश उके यांनी आपल्या भावावर पोलिसांनी खोटा गुन्हा दाखल केला कारण आम्ही हिंगणा येथे २००८ व २०१० साली त्यांच्यावर दाखल दोन गुन्ह्याच्या संदर्भात अभिलेखाच्या शोधात गेलो असल्यानेच माझ्या भावावर सुडाच्या भावनेतून हिंगणा पोलिस ठाण्यात गुन्हा नोंदविण्यात आला असल्याचा दावा पत्र परिषदेत ॲड.उके यांनी केला होता,मारोती नव्वा नावाचा कुख्यात गुंड माझ्या भावाला हिंगणा येथील त्या आदित्य बारमध्ये घेऊन गेला होता कारण नव्वा हा माजी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचा उजवा हात असणा-या धरमदास रमाणी याचा निरोप घेऊन आला होता की तू फडणवीस यांच्या विरोधातील सर्व कायदेशीर लढाई तुझ्या भावाला अर्थात ॲड.सतीश उकेला थांबविण्यास सांग,असे उके यांनी सांगितले होते मात्र आज मारोती नव्वा याने प्रत्यक्ष पत्र परिषद घेऊन ॲड.उके यांची ही कहानि पुरी ‘फिल्मी’असल्याचे सांगून प्रदीप उके हा एक नंबरचा अय्याश व रंगेल असून अनेक बारमध्ये नृत्यांगणांवर लाखो रुपये उधळत असल्याचा खळबळजनक आरोप करीत,मी काेणत्याही धरमदास रमाणीला ओळखत नाही ना मी फडणवीस यांच्या विषयीच्या कोणत्याही प्रकरणाविषयी प्रदीप उकेला निरोप दिला,मी रमाणीला ओळखतच नाही तर मध्यस्थीचा प्रश्‍न आलाच कुठे?असा दावा नव्वा यांनी आज प्रेस क्लब येथे आयोजित पत्र परिषदेत केला.

या प्रकरणात प्रदीप उके याच्यासोबतच मारोती नव्वावर ही हिंगणा पोलिसांनी गुन्हा दाखल केला आहे,हे विशेष!याप्रसंगी बोलताना मारोती नव्वाने सांगितले की प्रदीप उके याच्यासोबत त्याची मैत्री गेल्या वीस वर्षांपासूनची आहे.आम्ही दोघेही अनेकदा बारमध्ये जात असतो मात्र प्रदीप याचा वकील भाऊ ॲड.सतीश उके यांनी पत्र परिषद घेऊन जे सांगितले की मी फडणवीसचा निरोप घेऊन धरमदास रमाणी माझ्याकडे आला मग त्याचा निरोप घेऊन आम्ही पाच मित्र हिंगणाच्या हॉटेल आदित्यमध्ये ५ फेब्रुवरीला बसलो आणि गाणे ऐकून घरी निघून गेलो तर हे सर्व दावे खोटे असून माझ्याकडे कोणताही धरमदास रामाणी आलाच नाही,मी रामाणी नावाच्या माणसाला ओळखत देखील नाही,पोलिसांनी माझ्या मोबाईलचे सर्व कॉल रेकॉड्स तपासावे,ॲड.सतीश उके हे पत्र परिषदेत धांद्यात खोटे बोलले.

हिंगणा पोलिसांनी आम्हाला खोट्या गुन्ह्यात फसवले,आम्ही कोणतेही पैसे उधळत नव्हतो.आदित्य हॉटेलमधील सीसीटीव्ही फूटेज पोलिसांनी तपासावे,तिथे आम्ही दारु पिली,जेवलो आणि निघून गेलो.मात्र हिंगणा पोलिसांनी आम्ही पाच जण सोबत असताना फक्ती उके,माझ्यावर आणि आणखी एकावर गुन्हे दाखल केले,ते देखील १२ फेब्रुवरी रोजी म्हणजे घटनेच्या एका आठवड्यानंतर.५ फेब्रुवरीलाच पोलिसांनी आम्हाला अटक का केली नाही?अचानक एका आठवड्यानंतर पोलिस आम्हाला शोधू लागली व वृत्तपत्रातही आमचे नाव झळकले,असे नव्वा यांनी ‘प्रेस नोटमध्ये’ नमूद केले आहे.

मात्र पत्र परिषदेत ‘ऑन कॅमरा’बोलताना त्याने प्रदीप उके याच्याबाबत अनेक धक्कादायक खुलासे केले आहेत.धापेवाडा येथील संतोष बावणकर याच्या ’बे-वॉच’बारमध्ये प्रदीप उके याने तीन लाख रुपये तर बुटीबोरीतील बारमालकाकडून एक लाख रुपये नृत्यांणावर उधळण्यासाठी उधारीवर घेतले होते,असा धक्कादायक खुलासा नव्वा याने याप्रसंगी केला.हे दोन्ही बार आता बंद झाले असल्याचे त्याने सांगितले मात्र या बारशी संबंधित व्यक्तींना त्याने फोन लावला व स्पीकर ऑन ठेऊन संभाषण साधले.यात प्रदीप उके याने त्यांच्याकडून नेमके किती लाख रुपये घेतले व किती देणे बाकी आहे?याची माहिती नव्वा याने पत्रकारांना फोनवर ऐकवली.

५ फेब्रुवारी रोजी देखील प्रदीप उके याने बार मालकीणीकडून दोन लाख रुपये हे गायिकांवर उधळायला उधार घेतले होते.याची बार मालकीणीच्या डायरीत नोंद देखील आहे.आपल्या आवडीच्या गाण्यावर प्रदीप पैसे उधळू लागल्याने बार मालकीणीने तिच्याच कक्षात असणा-या सीसीटीव्ही कॅमराचे तोंड वळवून टाकले कारण पोलिस आयुक्तांचे सख्त निर्देश आहेत कोणत्याही बारमध्ये गायिकेवर पैसे उधळणे हा आता कायदेशीर गुन्हा झाला आहे,त्यामुळे आता सगळ्या बारमध्ये वेटरच्या हातात पैसे दिले जातात,वेटर ते पैसे गायिकेला नेऊन देत असतो,मात्र प्रदीप उके याने गायिकेजवळ जाऊन पैसे उधळायला सुरवात केल्याने मी त्याला याबाबत टोकले ही होते.तो टेबलच्या त्या बाजूला बसला होता मी दुस-या टेबलवर बसला होतो,याचे ही सीसीटीव्ही फूटेज तपासून बघू शकता,असा खुलासा नव्वा याने केला.

मी २०११ नंतर अपराध जगतात कुठेही नाही.त्या पूर्वी माझ्यावर हत्येचा गुन्हा २००२ मध्ये दाखल झाला होता,सक्करदरा व सदर पोलिस ठाण्यात माझ्यावर गुन्हे नोंदवण्यात आले होते मात्र हत्येच्या गुन्ह्यात मला निर्दोष सोडण्यात आले होते,त्या वेळी माझी मुलगी ही फक्त दोन महिन्यांची होती.तो एक काळ गुन्हेगारीचा असेल ही पण आता माझी मुलगीच २१ वर्षाची असून बी.एससीचे शिक्षण घेत आहे.मी पाच वर्ष तुरुंगात देखील होतो मात्र यानंतर मी गुन्हेगारी सोडली.माझी बहीण डॉक्टर आहे,माझ्या भाच्या या टिचर आहेत,मला ही कुटुंब आहे जे मला माझ्या गुन्हेगारी पार्श्वभूमीसाठी अजूनही बोल लावतात पण मी आता त्यासाठी काय करु शकतो?

प्रदीप उके याने बार मालकीणीकडून दोन लाख रुपये ५ फेब्रुवरी रोजी उधार घेतले त्याच वेळी मीसुद्धा दोन हजार रुपये गायिकेला देण्यासाठी घेतले होते,अशी कबूली देत,मात्र मी गायिकेवर पैसे उधळले नाहीत असा दावा करीत ती सवय प्रदीप उकेलाच असल्याचा आरोप केला.
गाडी क्र.५००० या वकील वैभव जगतापच्या गाडीत जगतापसोबत आम्ही त्या बारमध्ये गेलो होतो.आशिष,अली,प्रदीप आणि मी सोबत होतो मात्र पोलिसांनी फक्त तिघांच्या विरुद्ध गुन्हा दाखल केला.५ फेब्रुवरी रोजी माजी उर्जामंत्री चंद्रशेखर बावणकुळे यांच्यावर आरोप करणारा त्यांचा नातेवाईक सुरज तातोडे याचा वाहनचालकसुद्धा आमच्यासोबत होता,अशी कबुली नव्वा याने दिली.मी प्रदीपला यासाठी हटकले देखील होते मात्र त्याने त्याला सोबत गाडीत घेतले,असे नव्वा याने सांगितले.

मी कुख्यात गुंड,मवाली,गँगस्टर आहे असा ॲड.सतीश उकेंनी दावा केला तो सपशेल खोटा आहे.माझी प्रतिमा गँगस्टरची खोटी सांगितली गेली,’इनके चक्कर मे मै फस गया,मै बुढ्ा भी हो जाऊ,सुधर भी जाऊ तो भी ये लोग अब मुझे गँगस्टर ही कहेंगे’अशी हतबलताही मारोती नव्वा ने याप्रसंगी व्यक्त केली.

पोलिसांनी हॉटेल आदित्यचे सीसीटीव्ही फूटेज तपासावे,सीडीआर काढावा,माझ्या मोबाईलचे कॉल रेकॉर्ड्स तपासावे व सत्य समोर आणावे,अशी मागणी नव्वा याने केली आहे.

नव्वा हा अनपढ:लिहता वाचता येत नाही:शेखर सोमकुंवर

पत्र परिषदेत मारोती नव्वाने जी प्रेस नोट पत्रकारांना वाटली त्यात ’नागपूर पोलीस ने प्रदीप और मेरे को झुठे केस मे फसाया,हम कोई पैसे नही फेक रहे थे,वहा के सीसीटीव्ही फूटेज देख सकते है,हम वहा पर शराब पी रहे थे और खाना खाया लेकीन पोलीस ने मेरे साथ के तीन लोगो पर गुन्हा दाखल क्यो नही किया?’

असा उल्लेख आहे मात्र ऑन कॅमरा बोलताना त्याने प्रदीप उके हा गायिकेवर पैसे उधळत होता हे खरे असल्याचे सांगितले.पोलिसांकडे याचा पुरावा देखील नसणार कारण बार मालकीणीने त्याचवेळी सीसीटीव्ही कॅमरेचे तोेंड वळवले,असे नव्वा याने सांगितले.प्रेस नोट व ऑन कॅमरा यातील आरोपांमध्ये पराकोटीची विसंगती असल्याने ‘सत्ताधीश’ने पत्र परिषदेत मारोती नव्वा याच्यासोबत उपस्थित असणारे शेखर सोमकुंवर यांना संपर्क केला असता,शेखर याने नव्वा याला संपर्क केला,तो गाढ झोपला असल्याचे सांगत नव्वा याच्या पत्नीने सांगितले उक्त प्रेस नोट त्याच्या भाच्याने जिल्हाकधारी कार्यालयासमोरील टायपिस्टकडून टाईप करुन घेतली होती,मारोती नव्वा याला लिहता आणि वाचता येत नाही,त्याने भाच्याला जे तोंडी सांगितले होते तेच भाच्याने टाईप करुन आणले.नव्वा याला फोनमध्ये नावे ही टाईप करता येत नाही,.त्यामुळे त्याने त्याच्या घराजवळच्या मुलाला जो त्याला ‘मामा’म्हणतो पाठवले आणि तोंडीच सांगून टाईप करुन आणायला लावले होते,त्यात नेमके काय लिहले आहे?हे त्याला लिहता-वाचता येत नसल्याने त्याला चूक सुधारता आली नाही,मी नव्वा याला अनेक वर्षांपासून ओळखतो,त्याची पूर्वीची गँगस्टर इमेज ही इतक्या वर्षात तरी अनुभवली नाही,जे खरं आहे,जे सत्य आहे तेच नव्वा पत्र परिषदेमध्ये बोलला आहे,त्याच्या अडाणीपणामुळे प्रेस नोटमध्ये सत्य छापलं आहे हा दावा सपशेल खोटा ठरतो.असा खुलासा शेखर यांनी केला.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *