उपराजधानीसांस्कृतिक

‘मह‍िला कट्टा’महिला सक्षमीकरणासाठी भविष्‍यातले उत्‍तम व्‍यासपीठ :विजयलक्ष्‍मी बिदरी

‘मह‍िला कट्टा’चे थाटात उद्घाटन

नागपूर, ११ मार्च २०२३: महिलांनी मह‍िलांसाठी सुरू केलेले ‘महिला कट्टा’ हे अभिनव व्‍यासपीठ आहे. सर्व क्षेत्रातील महिलांच्‍या समस्‍या सोडवण्‍यासाठी आणि त्‍यांना सक्षम करण्‍यासाठी भविष्‍यातले हे उत्‍तम व्‍यासपीठ ठरणार आहे, असा विश्‍वास विभागीय आयुक्‍त विजयलक्ष्‍मी बिदरी यांनी व्‍यक्‍त केला.

नागपूर महानगरपालिकेच्या माजी महिला व बालकल्याण सभापती प्रगती पाटील यांच्या संकल्पनेतून संकल्‍पनेतून साकारलेल्‍या ‘महिला कट्टा’ महिलांनी मह‍िलांसाठी सुरू केलेल्‍या या व्‍यासपीठाचे प्रेस क्‍लब येथे विजयलक्ष्‍मी बिदरी यांच्‍या हस्‍ते उद्घाटन करण्‍यात आले.

विजयलक्ष्‍मी दोरजे यांनी प्रगती पाटील यांच्‍या या प्रयत्‍नाचे कौतूक केले. त्‍या म्‍हणाल्‍या, हा कट्टा म्‍हणजे मह‍िलांसाठी अराजकीय व्‍यासपीठ असून त्‍या माध्‍यमातून विविध क्षेत्रातील मह‍िलांच्‍या समस्‍या सोडवण्‍यासाठी त्‍याचा उपयोग होणार आहे. या कट्टयाच्‍या माधमातून एखाद्या गरीब कुटुंबातील मुलीना उच्‍च शिक्षणासाठी किंवा स्‍पोर्ट्ससाठी मदत करणे शक्‍य होईल, बचत गटातील महिलांना मार्केटशी जोडता येईल. प्रत्‍येक मह‍िलेने जर आपल्‍या आजुबाजुच्‍या किमान पाच मह‍िलांच्‍या समस्‍या सोडवण्‍यात मदत केली तर या कट्टयाचा उद्देश सफल होईल, असे त्‍या म्‍हणाल्‍या.

पुढे बोलताना विभागीय आयुक्त विजयालक्ष्मी बिदरी म्हणाल्या, कुठलाही स्वार्थ न बाळगता केवळ महिला उत्कर्षासाठी अशी संकल्पना कुणीतरी मांडते, हेच सुखावह आहे. या संकल्पनेचे प्रत्येक क्षेत्रातील प्रत्येक महिलेने स्वागत करायला हवे. आपल्याजवळ खूप काही आहे आणि कुणाजवळ तरी काहीच नाही. पण काहीतरी मिळविण्याची आसक्ती त्यांच्यामध्ये आहे. परंतु परिस्थिती त्यांना परवानगी देत नाही. अशा महिलांना सहकार्याचा हात देत ज्या क्षेत्रात तिची जायची इच्छा आहे, भरारी घ्यायची इच्छा आहे, त्या क्षेत्रातील महिलांनी त्यांना सहकार्य केल्यास आणि गरजू महिलांनी अशा सहकार्यातून भरारी घेतल्यास ‘महिला कट्टा’च्या माध्यमातून इतिहास रचला जाईल. हा महिलांचा हक्काचा मंच आहे. त्यामुळे काहीतरी वेगळं करण्यासाठी या मंचात नक्कीच सहभागी व्हा, असे आवाहन त्यांनी यावेळी केले.

प्रास्‍ताविकातून प्रगती पाटील यांनी महिला कट्टाच्‍या संकल्‍पना उलगडली. त्‍या म्‍हणाल्‍या, प्रत्येक क्षेत्रात महिला कार्यरत असून त्‍या आपले कतृत्‍व सिद्ध करीत आहेत. कामाच्‍या ठिकाणी त्‍यांच्‍यावर अन्‍याय, अत्‍याचार होत असतात. त्‍यांच्‍या समस्‍या विविध क्षेत्रातील महिलांच्‍या मदतीने सोडविण्‍याचा मह‍िला कट्टाचा उद्देश आहे. मह‍िला कट्टा हा सामाजिक, आर्थिक, शिक्षण, उद्योग, माध्‍यम, सांस्‍कृतिक, साहित्यिक, क्रीडा अशा विविध क्षेत्रातील मह‍िलांना जोडणारा दुवा असून दर मह‍िन्‍याच्‍या दुस-या क‍िंवा चौथ्‍या शनिवारी सर्वांनी एकत्र येऊन मह‍िलांच्‍या समस्‍या सोडवायचा आहेत, असे त्‍या म्‍हणाल्‍या.

कार्यक्रमाचे सूत्रसंचालन श्‍वेता शेलगावकर व सना पंडित यांनी केले. आभार श्वेताली देशमुख यांनी मानले.

विविध क्षेत्रातील या महिलांची उपस्थिती-
राजकीय क्षेत्रातील माजी महापौर अर्चना डेहनकर, माया इवनाते, नंदा जिचकार, माजी नगरसेविका आभा पांडे, संगीता गिर्हे, ज्येष्ठ साहित्यिक व सामाजिक कार्यकर्ता अरुणा सबाने, मनपा उपायुक्त डॉ . रंजना लाडे, पत्रकार वर्षा पाटील, राखी चव्हाण, अनुसया काळे, ममता जैस्वाल, डॉ. रोहिणी पाटील, स्वेताली देशमुख, सपना नायर, हरप्रित मुल्ला, अनिता मगरे, कल्पना फुलबांधे, शेफाली दूधबडे, डॉ. सुरेख जिचकार, डॉ. लिना निकम, जया देशमुख, साधना बरडे, प्रेमलता तिवारी, सुचित्रा नशीने, प्रतिमा उईके, ज्योती रामटेके, राजलक्ष्मी दास, सुप्रिया सोनकुसळे, डॉ. सबिना शेख, अरुणा भोयर, सुनीता सोनी, नूतन रेवतकर, डॉ. संगीता राऊत, कल्पना मानकर, जया आंभोरे, संगीता बेहेरे, नंदा चौधरी, कल्याणी बुटी, शिवांगी गर्ग, ऍड. दैवशाला काळे, डॉ. उर्वशी याशरे, कीर्तिदा अजमेरा, आर. जे. निशा, सुचित्रा नशीने, भारती चरण यांच्यासह शेकडो महिला उपस्थित होत्या.

…………………………………..

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *