उपराजधानीनागपूर मनपाराजकारण

शहरात प्लास्टिक बंदीचा फज्जा!

महानगरपालिकेचे दुर्लक्ष, कारवाई थांबली:श्रीकांत शिवणकर यांचा आरोप

सिंगल युज प्लॅस्टिकच्या पिशव्या आणि नायलॉन मांजाच्या विक्रेत्यांवर ,वापरकरणाऱ्यांवर कडक कारवाई करण्याची राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाची मागणी
.
स्वयंसेवी संस्थान मार्फत जनजागृती कार्यक्रम राबविण्याबाबत पालिकेला निवेदन

नागपूर,ता.२८ ऑक्टोबर २०२३: शासनाने प्लास्टिक वापरावर बंदी आणली असली तरी, नागपूर शहरात खुलेआम कॅरिबॅगचा वापर होताना दिसून येत आहे. ठिक ठिकाणी करवाई करून संबधित दुकान चालकांकडून दंडही वसूल करण्यात आला आहे  मात्र, सध्या मोहीम थंडावल्याने सर्रासपणे सणासुदीला प्लास्टिकचा वापर सुरू असून, शहरात प्लास्टिक बंदीचा फज्जा उडाल्याचा आरोप राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीच्ये कार्यकारी अध्यक्ष श्रीकांत शिवणकर यांनी केला. .

राष्ट्रवादी तर्फे यापूर्वीही प्लास्टिक पिशव्या आणि इतर वस्तूंचा निषेध करत अनेक आंदोलन करण्यात आले आणि प्रतिबंधित पिशव्यांच्या निर्माण कारखान्यावर उपद्रव पथकाच्या मदतीने काही महीन्यापूर्वीच  मोठी कारवाई करण्यात आली परंतु, पालिकेतील अधिकाऱ्यांच्या सुस्त कारभारामुळे निर्बंधित प्लॅस्टिकच्या पिशव्यांचा सर्रास वापर सुरु झाला आहे.

यावर ताबडतोब अंकुश बसावा तसेच येणाऱ्या संक्रातीच्या सणामध्ये नायलॉन मांजाची सर्रास विक्री होत असल्यामुळे , पक्षी प्राणी आणि मनुष्याच्या जीवितास धोका उत्पन्न होत असून, त्याबाबत आतापासून उपाययोजना होण्याकरिता मनपाच्या अतिरिक्त आयुक्त आंचल गोयल यांचा घेराव करत ताबडतोब या संदर्भात  मागणी करण्यात आली आहे .

या निवेदनात महानगरपालिकेला पुढीलप्रमाणे उपाययोजना सुचविण्यात आल्या ;

१. विघटन न करता येणार्‍या प्लॅस्टिकच्या वापरावर निर्बंध कडक करावेत .
२. प्रत्येक भाजी , फुल ,फळ बाजारात विभागीय स्तरावर बाजाराच्या दिवशी ठोस कारवाई करावी.
३.  पर्यावरणवादी संस्थांची मदत घेऊन सिंगल युज प्लास्टिकचे समूळ निर्मूलन करावे .
४. विघटन न होणाऱ्या प्लास्टिकच्या प्रभावाविषयी जनजागृती वाढवावी या साठी विविध स्वयंसेवी माध्यमांद्वारे सार्वजनिक जनजागृती मोहीम सुरू करावी .
५. स्वयंसेवी संस्था, जनप्रतिनिधी , जागरूक नागरिकांचा मोहिमेत सहभाग वाढवून त्यांना पर्यावरण  मित्र म्हणून जबाबदारी द्यावी .
६. संक्रातीच्या सणामध्ये नायलॉन मांजाचा बाजारपेठेत सुळसुळाट होत असतो आणि त्याच्या वापरामुळे आजपर्यंत अनेक पशु पक्षी ,मनुष्यांची जीव हानी झाली आहे , या संदर्भात महानगरपालिकेद्वारे जनजागृती मोहीम सुरु करून यावर तात्काळ उपायोजना करावी.

या बाबींवर लवकरात लवकर निर्णय न झाल्यास तीव्र आंदोलनाचा इशारा देण्यात आला आहे . या प्रसंगी प्रदेश सचिव आनंद सिंह , युवक अध्यक्ष विशाल खांडेकर ,अरविंद भाजीपाले , अरविंद ढेंगरे , संजय जोशी , महेंद्र देशपांडे , प्रज्ञशील घाटे , धनराज बांबोळे , माधुरी शेंडे , सुशांत मुन , सुनील उके , विनोद शेंडे , संजय पाटील , अशोक मिश्रा , संतोष गुप्ता , शुभम ठाकरे , प्रकाश डोंगरे , पुरोहित कांबळे , गणपत ठाकरे , पप्पू राऊत , विपीन इटनकर,ऋषी बोराटे , निरंजन ठाकरे , रवी विश्वकर्मा , गोपाळ गोडसे , रामा काटकर , हिंमत राऊत , मनोहर बावणे , सचिन पाटील  आणि पदाधिकारी उपस्थित होते.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *