उपराजधानीनागपूर मनपाराजकारण

मनपा कार्यालयावर शहरातील समस्यांबाबत काँग्रेसचा धडक मोर्चा


-भष्ट्राचारी एवीजी व ब्हीवीजी कचरा संकलन कंपनीचे कत्राट रद्द करण्याची केली मागणी

-मनपा प्रशासकिय कार्यालयात आयुक्ताचा घेराव : शहरातील समस्यां बाबत विचारला जाब

नागरिकांची मनपातील कर्मचा-यांकडून लृट: कामात निष्काळजीपणा करुन बिनाकारण जनतेकडून घेतात पैसे:आ.विकास ठाकरे यांचा खळबळजनक आरोप

-प्रशासनामार्फत नियुक्ती केलेले वार्ड कर्मचारी यांनी नियमित प्रभागातील व वार्डातील समस्यांवर लक्ष केंद्रित करावे:विकास ठाकरे यांची मागणी

नागपूर,१० नोव्हेंबर २०२३: मनपा द्वारा शहरातील दैनदिन घनकचरा उचलण्यासाठी दोन एन्जेसीची नियुक्ती करण्यात आली परंतु एजेन्सी कडून नियमित वस्तीतील आणि ठिकठिकाणी जमा असलेला कचरा संकलन होत नसल्याने कच-याचे ढीग तयार होत आहे, त्यामुळे साथरोगांच्या जंतू संसर्गामुळे शहरवासियांच्या आरोग्यावर परिणम होत आहे.येत्या एका महिन्यात या दोन्ही कचरा संकलन एजन्सीची कार्यपद्धती सुधारली नाही तर संपूर्ण शहराचा कचरा मनपा कार्यालयात आंदोलनाच्या माध्यमातून टाकण्यात येईल,असा इशारा काँग्रेसचे पश्‍चिम नागपूरचे आमदार विकास ठाकरे यांनी आज मनपा आयुक्तांना दिला.

नागपूर शहर जिल्हा काॅग्रेस कमेटीचे अध्यक्ष व व आमदार विकास ठाकरे यांनी मनपा आयुक्त डॉ.अभिजित चौधरी यांना शिष्टमंडळाद्वारे आज सकाळी ११ वाजता निवेदन देण्यात आले. निवेदन देतांना प्रदेश सोशल मिडिया अध्यक्ष विशाल मुत्तेमवार,माजी नगरसेवक प्रशांत धवड,संजय महाकाळकर,पुरुषोत्तम हजारे,माजी महापौर नरेश गांवडे,माजी नगरसेवक रमण पैगवार,माजी नगरसेवक रमेश पुणेकर,नितीन साठवणे,मनोज साबळे,भावना लोणारे,डाॅ.गजराज हटेवार,प्रा.दिनेष बानाबाकोडे,गुडडू तिवारी,स्नेहा निकोसे,विवेक निकोसे,अल्पसंख्याक अध्यक्ष वसीम खान,मिलींद दुपारे उपस्थित होते.

एजी आणि ब्हीवीजी एंजसीज कचरा संकलन करण्यात असमर्थ ठरल्यामुळे व वजन वाढीव करण्यासाठी माती संकलित करुन भष्ट्राचार करीत असल्याचे, माजी नगरसेवक प्रशात धवड यांनी स्वतः व्हीडीयो व्हायरल करीत प्रमाण दिले.मनपा आयुक्तांना या विषयी अवगत केले असता आयुक्त यांनी सांगितले, की याबाबत निरिक्षण करुन दंडात्मक कार्यवाही करुन ईवीजी, ब्हीवीजीची कार्यप्रणाली सुधारणा करण्यात येईल.

अमृत योजनेअंतर्गत पिण्याच्या पाण्याची पाईप लाईन टाकण्यासाठी खोदण्यात आलेल्या नाल्याच्या व रस्त्याच्या कडेला असलेला मलमा उचलण्यात यावे, याचा रहदारी करणा-या लोकांना अतोंनात त्रास होत आहे.ओसीडब्ल्यूनी पाईप लाईनेचे काम केले पण त्यांचे इस्टालेशन बराेबर न केल्याने पिण्याच्या पाण्याचा पुरवठा अनियमित होत असल्याने नागरिकांच्या तक्रारी आहे. पाण्याचा पुरवठा नियमित व्हावा यावर चर्चा केली.

नुकत्याच झालेल्या पावसाच्या अतिवष्टीमुळे नागरिकांच्या घरात पाणी घुसुन मोठया प्रमाणात नुकसान झाले परंतु प्रशासनामार्फत पुर्णपणे निरिक्षणच करण्यात आले नाही. त्यामुळे शासनाकडून अजुन पर्यत मदत मिळाली नाही. त्यांच्या घरासमोर खड्डे पडलेले आहे परंतु प्रशासनाचे याकडे लक्ष नाही.

मनपातील कनिष्ठ अभियंते महेद्र सुरडकर हे लोकांपासुन पैसे घेतात आणि हेतु पुरस्पर अतिक्रमण काढत नाही.आमदार जनतेचे सेवक आहेत आमदारांनी पत्र दिले असून सुद्धा कारवाई करीत नाही. तीन महिन्या अगोदर लक्ष्मीनगर झोन येथील कनिष्ठ अभियंते शैलेश जांभुळकर आणि डिप्टी इंजिनिअर लाबसोंगे यांनाआयुक्त मार्फत निलंबित करण्यात आले होते. जेव्हा हे काम ९० टक्के महेंद्र सुरटकर यांच्या अधिकारात झाले असुन त्यांच्यावर कृपादृष्टी करुन त्यांना का निलंबित करण्यात आले नाही? व ५ टक्के काम ज्या अभियांताकडे होते त्यांना निलंबित का करण्यात आले या गोष्टीची चैकशी करुन संबधित कनिष्ठ अभियंताला निलबित करण्याची मागणी याप्रसंगी आमदार विकास ठाकरे यांनी केली.
नागपूर महानगर पालिका मार्फत सामान्य जनतेला घर टॅक्स,पाणी बिलाचे मिटर चेक न करता सरसकट‘अंदाजित ’बिल मोठया प्रमाणात पाठविली जाते.

सकाळी मार्निग वाॅक साठी जात असलेल्या नागरिकांवर ठिकठिकाणी मोकाट कुत्र्यांचे कळप जे रस्त्यांवर बसले असतात, धावून चावण्याचा प्रयत्न करतात यावर लक्ष केंद्रित करण्याची मागणी त्यांनी केली.

मनपा प्रशासन द्वारा ज्या लोकांनी जागेवर अतिक्रमण केले आहे त्यांच्यावर कार्यवाही न करता, त्यांच्याकडून डिमांड नुसार कार्यवाही केली जात नाही.

मनपा आयुक्त डॉ. अभिजित चौधरींसोबत चर्चा करतांना आ.विकास ठाकरे यांनी सांगितले की, नुकत्याच झालेल्या अतिवृरूष्टीमुळे अनेक रस्त्याची हालत अत्यंत खराब झाली,याबाबत मनपाला निवेदन देवून सुध्दा आवश्यक नसलेल्या रस्त्यांना डांबरीकरण मंजूर करण्यात आले परंतु, अतिशय खराब असणा-या वस्तीमधील स्लम एरियातील वस्तीतील सिमेटचे डांबरीकरण करण्यात आले नाही.यावर लक्ष केंद्रित करण्यात यावे.

अशा अनेक शहरातील समस्या बाबत मनपा आयुक्तांसोबत चर्चा करण्यात आली तसेच जर एक महिन्याच्या आत शहरातील समस्यांवर लक्ष केंद्रित केले नाही तर,शहर काॅंग्रेस कमेटीमार्फत मनपा कार्यालया समोर तीव्र आंदोलन करण्यात येण्याचा इशारा त्यांनी दिला.

आंदोलनात संजय सरायकर,महेश श्रीवास ॲड.अभय रणदिवे,डाॅ.मनोहर तांबुलकर,ब्लाॅक अध्यक्ष ज्ञानेश्वर ठाकरे,रवि गाडगे पाटिल,दिनेश तराळे,प्रविण गवरे,पंकज निघोट,मोतीराम मोहाडीकर,अब्दुल शकील,इरशाद मलिक,देवेद्र रोटेले,सुरज आवळे,रजत देशमुख,विश्वेश्वर अहिरकर,गोपाल पटटम,राजेश कंुभलकर,तौषिफ खान,प्रशांत ढाकणे,उत्तर भारतीय सेल अध्यक्ष एम.एम.शर्मा,शत्रुध्न महोतो, हेंमत चैधरी,लंकेश ऊके,दिपक वानखेडे,आशीष दिक्षित,राजेश डेगे,नाजु भाई,नंदा देशमुख,वंदना मेश्राम,अरुण डवरे,कुंदा हरडे,राजेश साखरकर,शाबाद खान,प्रशांत पाटिल,प्रशांत कापसे,नरेश खडसे,श्रीकांत ढोलके,मनीश कनोजिया,विनील चैरसिया,राजेश परतेकी,सरस्वती सलामे, सुनिल आवले,अजय गोडबोले,मनीष चांदेकर सहित पदाधिकारी व कार्यकर्त मोठया संख्येने उपस्थित होते.

……………………………..

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *