उपराजधानीसांस्कृतिक

बहुजन विचार मंचच्या वतीने ‘शिवशाही’ महोत्सव बुधवारपासून

नरेंद्र जिचकार यांची पत्र परिषदेत माहिती

नागपूर,१२ फेब्रुवारी २०२४: बहुजन विचार मंचच्या वतीने १४ ते १९ फेब्रुवारी दरम्यान झिंगाबाई टाकली येथील पुरुषोत्तम बाजार समोरच्या पटांगणात शिवशाही महोत्सवाचे आयोजन करण्यात आले आहे. महोत्सवात शिवचरित्र व्याख्यान,शिव पोवाडे, संगीत रजनी, महानाट्य, गझल व मुशायरा, गर्जा महाराष्ट्र माझा, असे विविध कार्यक्रम होणार असल्याचे संयोजक नरेंद्र जिचकार यांनी आज प्रेस क्लब येथे आयोजित पत्रकार परिषदेत सांगितले.

याप्रसंगी बोलताना त्यांनी सांगितले ,की शिवशाही महोत्सवाचे हे दुसरे वर्ष आहे. १४ फेब्रुवारीला शिवशाही मिरवणूक काढून महोत्सवास प्रारंभ होईल. १५ तारखेला सद्भावना दिन साजरा केला जाणार असून या निमित्त नितीन बानगुडे पाटील यांचे शिवचरित्रावर व्याख्यान होईल. शिवशाहीर सुरेश जाधव हे शिव पोवाडा सादर करतील. १६ तारखेला “युवा दिन “साजरा केला जाणार असून, युवा रत्न पुरस्कार वितरित केले जातील.यावेळी प्रसिद्ध व्याख्यानकर्ते प्राध्यापक नितेश कराळे यांचे व्याख्यान होईल. साईराम अय्यर यांची “दिल है हिंदुस्तानी” ही संगीत रजनी सादर होईल. १७ फेब्रुवारीला संविधान जागर दिनानिमित्त एडवोकेट फिरदोस मिर्झा यांचे संविधानावर व्याख्यान तसेच १२० कलावंतांचा समावेश असलेले संविधानावर महानाट्य सादर केले जाणार आहे. १८ तारखेला स्त्रीशक्ती संवेदना निमित्त स्त्रीशक्ती सन्मान पुरस्कार सोहळा आयोजित करण्यात आला आहे. सुरेश भट गझल मंचचा मराठी, उर्दू गझलधारा कार्यक्रम सादर होईल.सायंकाळी पुरुषोत्तम महाराज यांचे कीर्तन होईल.१९ फेब्रुवारीला शिवजयंती निमित्त डॉक्टर शिवरत्न शेटे यांचे

“शिवशंभू”गे पिता पुत्राच्या भावबंधावर व्याख्यान आणि “गर्झा महाराष्ट्र” या संगीत नाट्याने महोत्सवाची सांगता होईल.

महिला सत्कार मूर्तीमध्ये सुप्रसिद्ध लेखिका आणि सामाजिक कार्यकर्ता अरुणा सबाने ,जिल्हा परिषद अध्यक्ष मुक्ता कोकड्डडे आदी या सत्कारमूर्तींचा समावेश असल्याचे जिचकार यांनी सांगितले.

याप्रसंगी बोलताना त्यांनी सांगितले की “गर्जा महाराष्ट्र माझा” या संगीत नाट्य सांस्कृतिक कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले असून, जनतेने मोठ्या प्रमाणात “शिवशाही महोत्सवात” सहभागी होऊन छत्रपती शिवाजी महाराज, संतश्रेष्ठ तुकाराम महाराज, महात्मा फुले, गाडगे महाराज, डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर, राष्ट्रसंत तुकडोजी महाराज, डॉक्टर पंजाबराव देशमुख, मौलाना आझाद, बिरसा मुंडा, लोकशाहीर अण्णाभाऊ साठे, लहुजी साळवे ,डॉक्टर एपीजे अब्दुल कलाम यांच्या विचारांचा जागर करावा असे आवाहन शिवशाही महोत्सवाचे आयोजक नरेंद्र जिचकार यांनी याप्रसंगी केले.

याप्रसंगी जिचकार यांनी सांगितले की १७ तारखेच्या कार्यक्रमात कन्हैया कुमार हे देखील उपस्थित राहण्याची शक्यता असून त्यांची तिकीट बुक झाली आहे मात्र १७ तारखेला राहुल गांधी यांची “भारत जोडो यात्रा” उत्तर प्रदेशमध्ये राहणार असून तिथे त्यांना उपस्थित राहावे लागल्यास नागपूरच्या कार्यक्रमात ते उपस्थित राहू शकणार नाही मात्र तरी देखील 99 टक्के कन्हैया कुमार यांची १७ तारखेला उपस्थिती राहण्याची शक्यता आहे.

………………………………………………

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *