उपराजधानीशैक्षणिक

अनुदानित जागा वाढवण्याची व ऑनलाईन प्रवेश त्वरित सुरु करण्याचा सरकारचा निर्णय

SSC सहित अन्य परीक्षा बोर्डातील विद्यार्थ्यांवर अन्याय न होता सर्वसमावेशी प्रवेश प्रक्रिया राबविण्यासाठी नामवंत कॉलेजांमध्ये जागा वाढवण्याची व प्रवेश प्रक्रिया त्वरित सुरु करण्याची मागणी अभाविपने नवनियुक्त  शिक्षणमंत्री आशिष शेलार यांच्या कडे केली होती व ते मान्य करण्याचे त्यांनी आश्वासन अभाविपला दिले होते. शिक्षणमंत्र्यांनी अभाविपची मागणी मान्य केली.

महाराष्ट्र राज्य शिक्षण मंडळाच्या माध्यमिक बोर्डाचे (SSC) निकालात अपेक्षेप्रमाणे अंतर्गत गुण पद्धती बंद केल्यामुळे कमी लागलेले होते. मुळात अकरावी ऑनलाईन प्रवेश प्रक्रियेत मुंबई परिसरातील नामवंत कॉलेजमध्ये प्रवेशासाठी चढावोढ असते त्यातच कमी लागलेल्या निकालामुळे SSC बोर्डाचे विद्यार्थी धस्तावले होते. SSC च्या परीक्षेत ९०% हून अधिक गुण घेणारे फक्त ५ हजारच्या आसपास विद्यार्थी आहेत तर अन्य बोर्डाच्या विद्यार्थी संख्या त्याहून अधिक असल्याचे दिसून आले, त्यामुळे साहजिकच SSC बोर्डाच्या विद्यार्थ्यांना चांगल्या महाविद्यालयात प्रवेशासाठी झगडावे लागणार असल्याने विद्यार्थी व पालक वर्गात भीतीचे वातावरण होते.

 

महाराष्ट्रा विधानसभेचे सुरु असलेल्या पावसाळी अधिवेशनात शिक्षणमंत्री आशिष शेलार यांनी अकरावी प्रवेशासाठी नामवंत कॉलेजेमधील अनुदानित जागा वाढवण्याची व ऑनलाईन प्रवेश त्वरित सुरु करण्याची घोषणा केली. यामध्ये मुंबई परिसरातील नामवंत कॉलेजमध्ये अकरावी प्रवेशासाठी विज्ञान व वाणिज्य शाखेत अनुक्रमे ५ व ८% तसेच पुणे, नागपूर परिसरातील कॉलेजांमध्ये १०% जागा वाढविण्याचा निर्णय सरकारने घेतला. सरकारने अभाविपच्या मागण्यांवर घेतलेल्या सकारात्मक निर्णयामुळे अकरावी प्रवेशासाठी अतिरिक्त जागा उपलब्ध होणार असून कुठल्याच परीक्षा बोर्डाच्या विद्यार्थ्यांवर अन्याय होणार नसल्याचे कोंकण प्रदेशमंत्री अनिकेत ओव्हाळ यांनी सांगितले. तसेच नवीन शिक्षणमंत्र्यांनी त्वरित निर्णय केल्याने त्यांचे अभिनंदन करीत, ऑनलाईन प्रवेश प्रक्रिया उद्याच सुरु होणार असल्याने विद्यार्थी व पालकांवरील मानसिक तणाव कमी होण्यास मदत होईल असेही ओव्हाळ यांनी यावेळी सांगितले.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *