उपराजधानीराजकारण

बंधन कुछ ऐसा बनाये..दिल दिल से फिर मिल जाये

मो.फारुख यांनी उजळले दिवे: अयोध्याचा आनंद अवतरला फारुख यांच्या अंगणात!

नागपूर,ता. ५ ऑगस्ट: आज अयोध्येत श्रीराम जन्मभूमीत भगवान श्रीरामांच्या भव्य-दिव्य मंदिराचे भूमीपूजन पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते पार पडले.देशभरातच नव्हे तर जगभरातच हा सोहळा मनाचे आणि डोळ्यांचे पारणे फेडणारा ठरला. नागपूरात देखील ठिकठिकाणी या श्रीराम मंदिराचा भूमीपूजन सोहळा उत्साहात साजरा करण्यात आला त्याचवेळी मोमिनपु-यात असे ही ‘एकमेव’ घर होते ज्या घरासमोर घरासमोर देखील दिप उजळले आणि यू-ट्यूबवर अनुराग,दिपशिखा व अभिषेक यांचे अतिशय लोकप्रिय झालेले गीत ’बंधन कूछ ऐसा बनाये…दिल दिल से फिर मिल जाये’या गीताची आठवण आली.हे घर होते मोहम्मद फारुख यांचे!

मोहम्मद फारुख हे १९९२ साली नागपूरातून कारसेवेमध्ये देखील सहभागी झाले होते.स्व.प्रभाकरराव दटके,राजेश कन्हेरे,डॉ.कोठेकर आदी.यांची चमू नागपूरातून अयोध्येत दाखल झाली तेव्हा नागपूरातूनच नव्हे तर भारतातूनच कारसेवेत सहभागी होणारी एकमेव ’मुस्लिम’ व्यक्ति म्हणून त्यांची ओळख निर्माण झाली. अतिशय संवेदनशील मनाचे मो.फारुख यांचे विचार हे बंधुत्वाचे आहेत.या मुद्दाकडे ’मंदिर-मज्सिद’ असे न बघता ’सर्वधर्मसमभाव’या नजरेतून बघितले गेले पाहिजे,असे त्यांचे म्हणने आहे.हा शांती व अमनचा देश आहे. या देशातील शांती अबाधित राहीली पाहिजे,असे ते सांगतात.हाच शांतीचा आणि बंधुत्वाचा संदेश घेऊन मी कारसेवेत सहभागी झालो.

मात्र माझ्या या पावलामुळे मी माझ्याच समाजातून बहीष्कृत झालो. माझ्या नावाचा फतवा काढण्यात आला. मला व माझ्या कुटुंबियांना असंख्य हाल-अपेष्टा सहन कराव्या लागल्या.आजही अंगणात दिवे उजाळताना वकील असणा-या पत्नीने टोकले,काय मिळतं हे करुन?आपल्याला सर्वांच्या शिव्या खाव्या लागतात!मुलांना टोमणे मिळतात,वो देख वो अयोध्या गया था,बाबरी ढहा के आया था,उसके बच्चे है ये!मात्र आजही फारुख यांनी घरासमोर दिवे उजाळलेच!पत्नीचा विरोध सहन करुनही.

वयाच्या २० व्या वर्षी फारुख यांनी अयोध्येत जाण्याचा निर्णय घेतला. स्व.प्रभाकरराव दटके यांच्या विचारांचा त्यांच्यावर प्रभाव होता. त्यांच्याच विचारांच्या प्रभावामुळे ते भारतीय जनता पक्ष्ाच्या अल्पसंख्याक सेलचे अध्यक्ष् देखील झाले.त्यांच्या नेतृत्वात त्यांनी अयोध्या गाठले. खूप गंभीर परिस्थितीतून वाचून आलो एवढेच!असे ते सांगतात.त्यावेळी केंद्रात पी.व्ही.नरसिंहराव यांची सरकार होती. गृहमंत्री शंकरराव चव्हाण होते. त्यांनी सीआरपीएफच्या तसेच मिलिट्रीच्या जवानांना आदेश दिले,कारसेवकांना पागंवण्यासाठी लाठीमार करा प्रसंगी गोळीबार करा!

मो.फारुख यांनाही अटक झाली.इतरांसोबत ते देखील १५ दिवसांची शिक्ष्ा भोगून आलेत.लालकृष्ण अडवानी,मुरली मनोहर जोशी,सुश्री उमा भारती,साध्वी ऋतुंभरा,आचार्य धमेंद्र आदींनी अयोध्येत जहाल भाषणे दिली असल्याची आठवण ते सांगतात.यामुळे वातावरण ही तापले.बाबरी ढासळली तेव्हा त्याखाली दीडशे ते दोनशे कारसेवक दफन झाले होते! ६ डिसेंबर १९९२ रोजी सकाळी ११.४० मिनिटांवर बाबरी मज्सिद ढासळली आणि १२.३५ नंतर संपूर्ण जगाला ही घटना कळली!

या घटनेचे तीव्र पडसाद मोमिनपु-यात देखील उमटले होते!माझ्यावर हल्ले झाले. हैदराबाद येथील ’अल कबीर’पर्यंत मी फिर्याद पोहोचवली. माझी निष्ठा धर्मासोबतच तत्वावर देखील आहे. मी बंधुत्वावर प्रेम करतो.महाराष्ट्राच्या मुस्लिम राष्ट्रीय मोर्चाचा मी संस्थापक आहे. या संघटनेतर्फे हाच विचार प्रचारित करतो. मी भारतीय जनता पक्ष्ाचा धर्मनिरपेक्ष् चेहरा आहे,असे म्हटले तरी वावगे ठरणार नाही. गेल्या ३२ वर्षांपासून मी या पक्ष्ाशीच एकनिष्ठ राहीलो,विचारांशी बांधिलकी जपली. केंद्रिय मंत्री नितीन गडकरी मला ’छोटा फारुख’म्हणूनच हाक मारतात.

आज अयोध्येत ५०० वर्षांनंतर झालेल्या भूमिपूजना सोहळा पक्ष्ाचा एक कार्यकर्ता म्हणून मलाही साजरा करणे बंधनकारक होते. पत्नीने काळजीपोटी केलेला विरोध मी झुगारला. मात्र असे असले तरी एकच खंत मनात आहे,एवढ्या वर्षांपासून पक्ष्ाच्या सेवेत असलो तरी अद्याप पक्ष्ाने साधा नगरसेवक म्हणून देखील मला तिकीट दिले नाही किवा महत्वाची जवाबदारी सोपवली नाही!

माझा जीव धोक्यात घालून मी देशाप्रति,धर्माप्रति,बंधुत्व व शांतिसाठी झटलो,झटत राहील मात्र एखाद्या तालिबानी येऊन कधी माझे जीवन संपवेल याचाही नेम नाही.पक्ष्ाने एखादे जवाबदारीचे पद दिले असते तर कुटुंबियांना तेवढाच मानसिक आधार मिळाला असता…!
तूर्त एवढेच म्हणेल ’खुशियो से सिमटा है ये दिन आजका..अपनो से बनता है ये दिन आजका..रिश्‍तो से गहरा है ये रंग आजका..मीठा सा लम्हा है ये दिन आज का..दिवाली…आज का दिन..तारे गिन गिन..बंधन कुछ ऐसा बनाये…दिल दिल से फिर मिल जाये…!

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *