महाराष्ट्रराजकारणविदर्भ

संदीप जोशी साहेब प्रचार बाजूला सारुन मनपा शाळांमध्ये मुख्याध्यापकांची नियुक्ती करा

 

 

 

 

 

 

 

 

पदवीधर निवडणूक: त्रिकोणी लढाईचे दावेदार उमेदवार नितीन रोंघे यांचे भाजप उमेदवाराला आव्हान

नागपूर,ता. २० नोव्हेंबर:नुकतेच वृत्तपत्रांमध्ये नागपूर महापालिकेतील १५ माध्यमिक शाळांमध्ये तर १८ प्राथमिक शाळांमध्ये मुख्याध्यापकच नाही!अशी बातमी प्रसिद्ध झाली.पदवीधर मतदार संघावर आजपर्यंत भारतीय जनता पक्षाच्या उमेदवारांचीच मक्तेदारी राहीली आहे तरी देखील शिक्ष् णासारख्या क्षेत्रात ही अशी अवस्था जर असेल तर भाजपचे उमेदवार संदीप जोशी यांनी काही काळ आता प्रचार थांबवून याच विषयावर आत्ममंथन करावे असे आव्हान पदवीधर निवडणूकीतील ‘त्रिकोणी‘ लढाईतील उमेदवार समजले जाणारे नितीन रोंघे यांनी सोशल मिडीयाद्वारे केले.

आपल्या पोस्टमध्ये त्यांनी संदीप जोशी यांना लक्ष् करीत,आपल्यासारख्या कर्तबगार नेत्याच्या कारकिर्दीत असे होणे बरोबर नसल्याचा टोला लगावला.आपण प्रचारात व्यस्त असल्याने शिक्ष् णाशी संबधित एवढ्या गंभीर प्रश्‍नाकडे आपले लक्ष् गेले नसावे,हे मी समजू शकतो अशी कोपरखळी देखील त्यांनी मारली.माझी आपल्याला विनंती आहे,आता प्रचार थोडा वेळ बाजूला ठेवा आणि बैठक करुन हा गंभीर प्रश्‍न तातडीने मार्गी लावा,असे आव्हान त्यांनी केले.

आपल्या प्रचाराचे थोडे नुकसान होईल पण आपण एक जवाबदार विरोधक म्हणून मी सुद्धा काही काळ प्रचार थांबवू आणि ‘टाईम प्लीज’घेऊ,अशी शाल जोडीतील टिका करताना रोंघे यांनी या गंभीर प्रश्‍नाकडे जोशी यांचे लक्ष् वेधले.

मी देखील या काळात प्रचार सोडून मुख्याध्यापकच नसलेल्या शाळांमध्ये शिक्ष् णाचा कसा स्तर मनपा शाळेतील गरिब,गरजू विद्यार्थी अभ्यासत असतील यावर चिंतन व आत्मंथन करणार असल्याचे रोंघे यांनी आपल्या सोशल मिडीयातील पोस्टमध्ये नमूद केले.
मुख्याध्यापक नसलेल्या शाळांमध्ये गुणवत्तेचा स्तर घसरलेला असताना पदवीधरांना न्याय देण्याची बाब जोशी हे नमूद करतात. महापालिकेच्या शाळेतील शिक्ष् कांना गेल्या ४ वर्षांपासून पदोन्नती देखील मिळाली नाही,हे त्यांच्या गुणवत्तेचा अपमान नाही ठरत का?असा सवाल पदवीधर मतदार संघाचे उमेदवार नितीन रोंघे यांनी केला.

नागपूर महानगरपालिकेत गेल्या १४ वर्षांपासून भारतीय जनता पक्षाची एकहाती सत्ता आहे.असे असताना नागपूर महानगरपालिकेतील शाळांची अशी दशा आहे तर शैक्ष् णिक पदवीधर मतदारासंघातील सुशिक्षित मतदारांचे प्रश्‍न संदीप जोशी हे कसे सोडवणार?असा प्रश्‍न देखील त्यांनी उपस्थित केला.

नितीन रोंघे हे पदवीधर मतदार संघातील उमेदवार असून भाजपचे उमेदवार संदीप जोशी तसेच काँग्रेसचे उमेदवार ॲड.अभिजित वंजारी यांच्या तुल्यबळ लढतीतील एक तगडे प्रतिस्पर्धी मानले जात अाहे. त्यांच्या उमेदवारीमुळे ही लढत आता दुहेरी राहीली नसून ‘त्रिकोणी’झाली असल्याचे बोलले जात आहे. दुसरी महत्वाची बाब म्हणजे ‘विदर्भवादी’ उमेदवार म्हणून त्यांच्याकडे बघितले जात आहे.तिसरी महत्वाची बाब म्हणजे ,बांग्लादेश,राजेश्‍वरम,भावनाथम,श्रीलंका सारख्या भारताच्या मित्र स्थळांवर नितीन रोंघे यांना तेथील प्रेसिडेंशियल निवडणूकीत लोकशाहीबाबत मार्गदर्शन करण्यासाठी भारतातील प्रतिनिधीमधून बोलावण्यात आले आहे,हे विशेष!

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *