उपराजधानीनागपूर मनपा

मनपाचे “गणेश विसर्जन वाहन आपल्या दारी”

नागपूर, ता १५ : जलप्रदूषण थांबविण्यासाठी यावर्षी नागपूर महानगरपालिकेतर्फे श्री गणेश विसर्जनासाठी झोन निहाय फिरते वाहनाची व्यवस्था करण्यात आली आहे. महापौर दयाशंकर तिवारी आणि मनपा आयुक्त राधाकृष्णन बी यांनी या संदर्भात निर्देश आरोग्य विभागाला निर्गमीत केले होते.

मनपातर्फे यावर्षी तलावात श्री च्या मूर्तीचे विसर्जनावर बंदी घालण्यात आली आहे. मूर्ती विसर्जनासाठी सर्वच तलावांवर पर्यायी व्यवस्था करण्यात येत आहे. तसेच झोन निहाय फिरते विसर्जन वाहनाची व्यवस्था भाविकांसाठी उपलब्ध करण्यात आली आहे. भाविक आपल्या झोनमध्ये भ्रमणध्वनी क्रमांकावर संपर्क करुन वाहनांसाठी आपली माहिती देऊ शकतात. विसर्जनाची वेळ झोनल कार्यालया कडून कळविण्यात येईल, असे नोडल अधिकारी डॉ.गजेन्द्र महल्ले यांनी सांगितले.

श्रींच्या विसर्जनासाठी फुटाळा मध्ये तयारी पूर्ण-

नागपूर महानगरपालिके तर्फे यावर्षी शहरातील सर्व तलावात श्री गणेश मूर्तीच्या विसर्जनावर बंदी घालण्यात आली आहे. धरमपेठ झोन अंतर्गत फुटाळा तलावात टीनाचे कठडे लावण्यात आले असून मूर्ती विसर्जनासाठी तलावावर पर्यायी व्यवस्था करण्यात आली आहे. या कामाची पाहणी गुरुवारी (१६ सप्टेंबर) रोजी धरमपेठ झोन सभापती सुनील हिरणवार, नगरसेविका डॉ. परिणीता फुके, सहाय्यक आयुक्त प्रकाश वराडे यांनी केली.

फुटाळा तलावाच्या परिसरात कृत्रिम विसर्जन कुंड लावण्यात आले आहे. भाविकांसाठी वेगळी व्यवस्था करण्यात आली आहे. येथे १० मध्यम विसर्जन कुंड तसेच ४ मोठे कुंडची व्यवस्था करण्यात आली आहे. ग्रीन व्हिजील फाऊंडेशनचे कौस्तुभ चटर्जी व सुरभी जायस्वाल आणि त्यांचे सहकारी पर्यावरण पूरक विसर्जनासाठी मनपाला सहकार्य करीत आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *