ज्योतिषविदर्भ

ॲस्ट्रॉनोमी पार्कमध्ये भारतातील सर्वात मोठ्या श्रीयंत्राची प्रतिष्ठापना रविवारी


नाना पटोले यांच्या हस्ते सूर्य घडयाळ्याचे लोकार्पण

नागपूर,ता. २६ नोव्हेंबर: श्रीयंत्र हे त्रिपूरा शक्तीचे प्रतिक मानल्या जाते.भगवती त्रिपुरा शक्तीच्या साधनेत श्री यंत्र हे अत्यंत प्रभावी यंत्र मानल्या जाते.महाशक्ती त्रिपूरा सुंदरीच्या साधनेचे उत्तम फळ श्रीयंत्राच्या साधनेशिवाय मिळू शकत नाही अशी मान्यता आहे.

हे भारताचे एवढ्या मोठ्या स्वरुपातील एकमेव श्रीयंत्र असून चार फूट उंच,चार फूट रुंद आणि चार फूट लांबीचे आहे.या श्रीयंत्राची प्रतिष्ठापना व लोकार्पण नागपूरपासून ३५ किलोमीटर अंतर असणा-या श्रीचौकी,कान्होलीबारा येथे रविवार दि.२८ नोव्हेंबर २०२१ रोजी सकाळी १० वाजता महामंडळेश्‍वर ओंकारेश्‍वर श्री विवेकानंद पुरी व श्री ब्रम्हचैतन्य तुळशीदासजी महाराज यांच्या शुभे हस्ते पार पडणार आहे.राष्ट्रीय स्वयंसंघाच्या महिला समितीच्या २१ सदस्या या याप्रसंगी श्रीसुक्ताचा पाठ करणार असल्याची माहिती श्री शनिशक्तीपीठाचे संचालक आचार्य भूपेश घाडगे यांनी  दिली.

ब्रम्हांड पुराणातील उल्लेखाप्रमाणे श्रीयंत्राच्या गर्भामध्ये ३३ कोटी देवदवतेचा वास असतो.श्री ललिता महात्रिपूरीसुंदरी देवीचे निवासस्थान मानले जाते.त्या निवासस्थानामध्ये महाकाली,महालक्ष्मी,महासरस्वतीसोबतच परंब्रम्ह,परंविष्णू,परंशिवासहित निवास करते.म्हणूनच श्रीयंत्राची पूजा करणा-यास विश्‍वातील समस्त देवदेवतांची पूजा केल्याचे पुण्य लाभते व सर्व स्तरावरील समृद्धी व धन प्राप्त होते अशी मान्यता आहे.

या यंत्रेतील नऊ चक्रे ही मनुष्य देहातील नऊ चक्रासमान मानले जातात.यामध्ये मधोमध एक बिंदू आहे आणि सर्वात बाहेरच्या बाजूला एक नूपूर आहे.नूपूराच्या चारही बाजूने चार द्वारे असतात.यात अष्टकमळ,षोडसकमळ व त्रैचाळीस त्रिकोण येतात.नेरु यंत्र हे शनिशक्तीपीठामध्ये स्थापन केले असून नऊ टन बसाट ओडीसाच्या दगडामध्ये ३३ किलो कार्क करुन श्रीयंत्र बनवण्यात आले.

याच श्री यंत्राच्या वरती असणा-या सूर्य घड्याळाचे उद् घाटन नुकतेच केंद्रिय मंत्री नितीन गडकरी यांच्या हस्ते झाले आहे.मध्यभारतातील हे एक अनोखे सूर्य घड्याळ आहे.भारतात फक्त जयपूर येथील जंतरमंतर तसेच कोर्णाक मंदिरात अशी सूर्य घड्याळ आपल्याला आढळते मात्र या सूर्य घड्याळात काही अनोख्या बाबी अंर्तभूत करण्यात आल्या असून ज्योतिषशास्त्राानुसार बारा राशींचे बारा लग्ने यांचा देखील अंर्तभाव यात करण्यात आला आहे. याचे दर्शन दिवसा देखील केल्या जाऊ शकते तसेच डीजिटल घड्याळाप्रमाणेच अचूक वेळ सूर्याच्या परिक्रमे व छायानुसार कोणालाही कळू शकते.

श्रीक्षेत्र चौकी तसं प्रसिद्ध ठिकाण आहे.या ठिकाणी पौराणिक कथेनुसार पांडवकालीन काळातील विदर्भातील एकमेव गुरु बृहस्पतीचे सुप्रसिद्ध मंदिर आहे . याशिवाय या परिसराला चक्रावर्ती म्हणून देखील म्हटल्या जाते.चक्राकार डोंगरांमध्ये वसलेले ही पवित्र श्री चक्रवर्ती नगरी,श्रीशनिशक्तीपीठ पर्यटन तसेच भाविकांसाठी धार्मिकदृष्टया महत्वाचे स्थळ झाले आहे.या स्थळाला भेट देण्याचे अवाहन आचार्य भूपेश घाडगे यांनी केले आहे.

येत्या काळात लवकरच पंचागाच्या दृष्टिकोणातून लवकरच याच ठिकाणी नक्षत्र, तिथी,वार, योग आणि करण या यंत्रांच्या देखील प्रतिष्ठापणेचा मानस ते व्यक्त करतात.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *