उपराजधानीज्योतिष

कोजागिरी पौर्णिमेला चंद्रप्रकाशात दूध आटवून सेवन आरोग्यासाठी हितकारक:ज्योतिषाचार्य भूपेश गाडगे

वेदांगामध्ये नमूद आहेत अनेक फायदे

नागपूर,ता. ८ ऑक्टोबर : आपल्या मनात अनेक शंका उदभवत असतात,त्या सर्व शंकांचे निरसन वेदांमध्ये सांगितले आहे. पौराणिक आख्याकिका आणि विज्ञान हे दोन वेगवेगळे विषय व अनुभव आहेत.ज्याेतिष विज्ञानालाच आम्ही ‘वेदांग‘संबोधतो.वेदांग म्हणजेच वेदांगाचे अंग,त्यात सांख्य,न्याय,व्याकरण,निरुकत्त तसेच ज्योतिष हे त्याचे अंग आहेत तर पौराणिक आख्याकिका म्हणजे कथा, त्याचा सार विज्ञानाला आधारित असतो.

ही सार कथा अशी सांगते कि अश्‍विन पौर्णिमेच्या रात्रि लक्ष्मीजीचा वास पृथ्वीतळावर असतो आणि चंद्रोदय म्हणजे चंद्राचा उदय हा क्षीतिजा पासून पंधरा अंशावर पुढे सरकतो तेव्हा पासून माध्यान्ही म्हणजे अगदी डोक्यावर असेपर्यंत तसेच पुढे पंधरा अंशापर्यंत पुढे सरकतो तेव्हापर्यंत म्हणजे जवळपास साढे बारा रात्रीची वेळ असते, त्या काळखंडात जर आपण चंद्रप्रकाशात राहतो व त्या काळखंडात दूध आटवताे,त्यावेळी त्यात फक्त चंद्राचाच प्रकाश किवा उर्जा नव्हे तर त्यावेळी ज्या शक्ती निसर्गात असतात ते देखील दूधात समाविष्ट होत असतात व वेदांगात देखील हेच सांगितले आहे की त्याचे अनेक प्रकारचे फायदे हे माणसाच्या आरोग्याला होत असतात अशी माहिती सुप्रसिद्ध ज्योतिषाचार्य भूपेश गाडगे यांनी दिली.

यावेळी बोलताना त्यांनी सांगितले की, फक्त चंद्र किवा नक्षत्रे नाहीत तर निसर्गातील अनेक शक्तीचा प्रभाव कोजागिरीच्या दिवशी मध्य रात्री चंद्रप्रकाशात आटवलेल्या दूधात पडत असतो आणि ते दूध प्राशन केल्यामुळे आयुर्वेदात सांगितल्यायप्रमाणे अनेक व्याधींवर ते गुणकारी ही ठरत असतात.

ज्याप्रमाणे आम्ही पहाटे आरोग्यासाठी सूर्य प्रकाशात पायी चालत असताना सूर्य प्रकाशाचा,सूर्य किरणांचाही लाभ घेत असतो,विशेष म्हणजे सकाळी सात ते आठ दरम्यानच्या सूर्य प्रकाशात पायी चालण्याचे अनेक फायदे डाक्टर्स देखील सांगत असतात की या वेळेत मानवी आरोग्याला विटामिन डी,विटामीन सी इत्यादी पोषक तत्वे मिळत असतात त्याचप्रमाणे वेदांग देखील हेच सांगतं की अश्‍विन पौर्णिमेच्या दिवशी ब्रम्हांडामध्ये जो तारका समूह असतो त्याचा देखील सर्वाधिक लाभ कोजागिरी पौर्णिमेला मिळत असतो.

लोकांना मात्र वेदांगामधील हे विज्ञान पटत नसल्यामुळेेच लक्ष्मीची वास असल्याचे वेदांग सांगतं.लक्ष्मी म्हणजे समृद्धिचं कारकतत्व.समृद्धि मिळणार,धनप्राप्ती होणार म्हणून भाविक मग वेदांगमध्ये सांगितलेल्या तत्वांप्रमाणे आचरण करतात त्यामुळेच ज्योतिष विज्ञानात कोजागिरी पोर्णिमा आणि लक्ष्मीजींचे कारकतत्व यांचा संबंध सांगण्यात आले असल्याचे भूपेश गाडगे सांगतात.

कोजागिरी पोर्णिर्मेच्या प्रकाशात आटवलेले दूध हे फक्त चांगलं असतं,असं म्हणून चालणार नाही तर ते माणसाच्या आरोग्याल पोषित करणार असतं.

चित्रा आणि स्वाती.ही दोन्ही नक्षत्रे ब्रम्हांडामधलील सर्वात जवळचे नक्षत्रे मानले जातात.नक्षत्रे म्हणजे ब्रम्हांडामध्ये जे तारका समूह आहेत ज्याला इंग्रजी भाषेत गॅलेक्सीस म्हणतो त्या तारका समूह या पृथ्वी जवळचे मानल्या जातात

नासा देखील हे मान्य करतो की हे दोन अश्विनी व स्वाति हे दोन नक्षत्र आमच्यापासून ३६ व ७३ कोटी अंतरावर आहे.१६३० मध्ये इटलीत जन्मलेले गॅलेलियो या वैज्ञानिकांनी ग्रहे हे सूर्या भाेवती फिरतात असा सिद्धांत मांडला.आमच्याकडील आर्यभट,पाराशर या सारख्या आपल्या पूर्वाचार्यांनी तर हजारो वर्षांपूर्वीच पृथ्वीच्या उत्तप्तीचा व ग्रहांचा सिद्धांत मांडला आहे.नक्षत्राचा असा सिद्धांत नासाला देखील मांडता आला नाही.

या नक्षत्रांमधून ज्या उर्जा आम्हाला मिळतात त्या या पृथ्वीवरील सर्व चराचराला,जीव जंतूंना आणि मानवी आरोग्याला पोषित करीत असल्याची माहिती यावेळी भूपेश गाडगे यांनी दिली.वेद म्हणजे शाश्‍वत मूल्ये आणि या मूल्यांच्या आधारेच माणसाचे जीवन आनंदमय होत असल्याचे त्यांनी सांगितले.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *