उपराजधानीज्योतिष

सूर्यग्रहणानंतर लक्ष्मीची उत्तर पूजा वर्ज्य :ज्योतिषाचार्य भूपेश घाडगे

नागपूर,ता. १८ ऑक्टोबर: अश्‍विन अमावस्या मंगळवार दिनांक २५ ऑक्टोबर रोजी भारतात खंडग्रास सूर्यग्रहण(गस्तास्त) असून ग्रहणाचा स्पर्श १६.४९ वाजता ,मध्य १७.४३ वाजता, सूर्यास्त १८.०७ तर पर्व ०१.१९ असा त्याचा काळखंड असणार आहे.त्यामुळे २४ ऑक्टोबर रोजी लक्ष्मी पूजन केल्यानंतर त्याची उत्तरपूजा ही देखील २५ ऑक्टोबर रोजी रात्री ३ वाजता पूर्वी करावी कारण ०३.३० वाजता पासूून ग्रहणाचा वेध काळ सुरु होणार आहे.ग्रहणानंतर लक्ष्मीची उत्तर पूजा ही शास्त्रानुसार वर्ज्य असल्याचे सुप्रसिद्ध ज्योतिषाचार्य भूपेश घाडगे यांनी पत्रकाद्वारे सांगितले.

हे सूर्यग्रहण भारतात सर्वत्र ग्रस्तास्त दिसणार आहे म्हणजे ग्रस्त असणारे सूर्यबिंब अस्तास जाईल त्यामुळे भारतात कुठेही ग्रहणमोक्ष दिसणार नसल्याचे त्यांनी सांगितले.

हे ग्रहण दिवसाच्या चौथ्या प्रहरात लागत असल्याने मंगळवार पहाटे ०३.३० पासून सूर्यास्तापर्यंत ग्रहणाचा वेध पाळावा.बाल,वृद्ध,अशक्त,आजारी व्यक्ती व गर्भवतींनी मंगळवारी दुपारी १२.३० पासून सूर्यास्तापर्यंत वेध पाळावे.वेधामध्ये भोजन करु नये.स्नान,जप,देवपूजा,श्राद्ध इ.करता येतील.

सुर्यग्रहण हे भारताचा पूर्व भाग सोडून इतर भागात दिसणार आहे.पूर्वेकडील मणिपूर,मेघालय,नागालॅण्ड,मिजोरम,त्रिपूरा,अरुणाचल प्रदेश या भागात हे ग्रहण दिसणार नाही.उर्वरित भागात ग्रस्तास्त दिसेल म्हणजे सूर्य मोक्ष होण्या पूर्वी सुर्यास्त होत असल्याने ग्रस्तास्त सूर्य बिंबाचा अस्त होईल.ग्रहण मोक्ष होत असताना दिसणार नाही.

भारताशिवाय पश्‍चिम आशिया,बेल्जियम,अफगानिस्तान,इजिप्त,सौदी अरेबिया,यूरोप,रशिया,फ्रांस,अफ्रिकेचा काही भाग या देशात देखील हे ग्रहण दिसणार आहे.

या ग्रहणाचा वेधारंभ २५ ऑक्टोबर रोजी पहाटे ०३ वाजून ३० मिनिटांपासून सुरु होईल. त्यानंतरही ग्रहण राहील पण पर्वकाळात ५४ मिनिटांचा वेध धरला आहे.हे ग्रहण तुळा राशी आणि स्वाती नक्षत्रावर होत आहे.त्यामुळे कन्या,तुला,वृश्‍चिक राशिच्या जातकांना तसेच चित्रा,स्वाती,विशाखा ही जन्म नक्षत्रे असणा-या जातकांना त्रासदायक ठरेल,असे भाकीत भूपेश घाडगे यांनी वर्तवले.

अश्‍विन महिन्यात होणारे हे ग्रहण चीन,मुस्लिम भागातील राष्ट्रांना त्रासदायक ठरेल.शल्य चिकित्सक,डॉक्टर्स,वैद्यक यांनाही पिडादायक राहील.

गर्भवती स्त्रियांनी हे ग्रहण पाहू नये.गर्भवती स्त्रियांनी ग्रहण काळात काहीही चिरु नये.ग्रहणकाळात काहीही खाऊ नये.आवश्‍यक असल्यास फक्त पाणी प्यावे,असा सल्ला त्यांनी दिला.

अनेकांच्या मनात हा प्रश्‍न येतो २५ तारखेला ग्रहण आहे त्यामुळे लक्ष्मी पूजन केव्हा विसर्जित करावी.त्यामुळेच २४ तारखेलाच सायंकाळी लक्ष्मीपूजन करावे व २५ तारखेला उत्तर पूजा पहाटेच ३ वाजता किवा त्यापूर्वीच करावी कारण ग्रहणाचे वेध हे २५ तारखेला पहाटे ३ वाजून ३० मिनिटांनी सुरु होत आहेत.

काही ठिकाणी लक्ष्मी पूजन भाऊबीजेपर्यंतही ठेवतात मात्र या वर्षी ग्रहण कालानंतर उत्तर पूजा ठेऊ नये व २५ तारखेला पहाटे ३ वाजता पूर्वीच ती विसर्जित करावी,अशी माहिती घाडगे यांनी दिली.

असे आहेत राशिपरत्वे ग्रहणाचे फळ-
मेष:कौटूंबिक चिंता
वृषभ: सौख्यदायक
मिथून:चिंता
कर्क: व्यथा
सिंह:लक्ष्मीप्राप्ती
कन्या:द्रव्यनाश
तुळा:शरीर पिडा
वृश्‍चिक:अपायकारक
धनू:लाभाकारक
मकर:सौख्यदायक
कुंभ:मानभंग देणारे
मीन:शरीर कष्ट
…………………….

 

 

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *