उपराजधानीसांस्कृतिक

काचबिंदू आजाराप्रती जनजागृती आवश्यक : डॉ नेहा देशपांडे

९ पैकी १ व्यक्तीस काचबिंदू होण्याची शक्यता, काचबिंदू आजारावर संगीतमय सखोल चर्चा
–आज पासून काचबिंदू सप्ताहाला प्रारंभ

११ मार्च २०२३: आर्थिक परिस्थिती असताना केवळ टाळाटाळ केल्यामुळे किंवा दुर्लक्ष केल्यामुळे अनेक रुग्ण काचबिंदू आजार क्लिष्ट झाल्यावर डॉटरांकडे जातात हा सामान्य अनुभव असल्याचे सांगून या आजाराविषयी जनजागृती होण्याची गरज असल्याचे मत ओएसएनच्या अध्यक्ष डॉ नेहा देशपांडे यांनी व्यक्त केले.

ओप्‍थॅल्‍मोलॉजिकल सोसायटी नागपूर (ओएसएन), इंडियन मेडीकल असोसिएशन नागपूर शाखा आणि कमलाबाई देशपांडे मेमोरिअल ट्रस्ट यांच्या संयुक्‍तवतीने व ऋतुराज नागपूर प्रस्तुत ‘नझरों… के दिल… से!’ हा डोळ्यांचे विकार व काचबिंदूबद्दल सखोल सांगीतिक चर्चेचा कार्यक्रम आज आयएमए हॉल,नॉर्थ अंबाझरी रोड येथे आयोज‍ित करण्‍यात आला आहे त्यावेळी त्या बोलत होत्या.

ओप्‍थॅल्‍मोलॉजिकल सोसायटीच्‍यावतीने काचबिंदू जनजागृती आठवडा साजरा केला जात असून त्‍या अनुषंगाने या कार्यक्रमाचे आयोजन करण्‍यात आले आहे अशी माहिती डॉ नेहा देशपांडे यांनी दिली. आज पासून काचबिंदू सप्ताह सुरु होत असून डोळ्यांच्या आजाराकडे वेळीच लक्ष देऊन डोळे तपासून घेण्याचा सल्ला त्यांनी दिला.

डॉ अमर भास्करे यांनी यावेळी डोळे हे शरीराचा अवयव म्हणून कसे कार्य करतात आणि त्याचे भाग जसे कॉर्निया, आयरिस, ऑप्टिक नर्व्ह यांची माहिती दिली. ऑप्टिक नर्व्ह कमजोर किंवा क्षीण होत काचबिंदू होतो असे त्यांनी सांगितले. डॉ गुंजन यांनी मोतीबिंदू आणि काचबिंदू यांच्यामधला फरक सांगितला. डोळ्याची स्थिती चांगली असल्यास मोतीबिंदू उपचारानंतर पूर्ण बरा होतो परंतु काचबिंदू मध्ये आहे तितकी दृष्टी वाचविण्याचे आव्हान असते त्यासाठी वेळीच निदान होणे फार महत्वाचे आहे असे त्या म्हणाल्या. ९ पैकी १ व्यक्तीस काचबिंदू होण्याची शक्यता अशी माहिती त्यांनी दिली. त्यामुळे जनजागृती फार आवश्यक असण्यावर त्यांनी भर दिला

या कार्यक्रमात तज्‍ज्ञ मार्गदर्शक म्‍हणून डॉ. विनय नांगिया, डॉ. आशिष थुल, डॉ. शिल्पा तिवारी, डॉ. नेहा देशपांडे, डॉ रोहिणी जुनेजा सहभागी झाले होते. यांनी काचबिंदू होण्याची करणे सांगितली यात कुटुंबात या आजाराची हिस्ट्री असणे, स्टिरॉइड औषधांचा लंबकाळ वापर, उच्च रक्तदाब, निकट दृष्टिदोष, वृद्धपकाळ यांचा समावेश आहे. केवळ डोळ्यांचा नंबर कडून आणणे आणि चष्मा बदलणे म्हणे नेत्र तपासणी नव्हे असा उल्लेख वारंवार सर्व तज्ज्ञांनी केले.

यावेळी रूप पाहता लोचनी या भक्ती गीताने गुणवंत घटवाई यांनी कार्यक्रमाची भक्तिमय सुरवात करून श्रोत्यांना मंत्रमुग्ध केले. याशिवाय डोळे ही मुख्य संकल्पना घेऊन गुणवंत घटवाई ,अनुजा मेंघळ- सावजी व मुकुल पांडे यांनी ‘तेरी आखो के सीवा, झुकी झुकी सी नजर , आपकी आखो मी कूछ , इन आखो की मस्ती अशी विविध गीते सादर केलीत. यात त्‍यांना गोविंद गडीकर, मोरेश्वर दहासहस्त्र, विशाल दहासहस्त्र, मुग्धा तापस वाद्यसंगत केली.

या कार्यक्रमाची संकल्पना मुग्धा तापस यांची होती तर निवेदन किशोर गलांडे व आसावरी गलांडे- देशपांडे यांनी केले.

……………………………………….

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *