व्यापार- वाणिज्यसांस्कृतिक

‘आयुष्यावर बोलू काही’ कार्यक्रम नागपुरात रंगणार !

सदाबहार कार्यक्रमाला झाली २० वर्षे पूर्ण

७ जुलै रोजी होणार देशपांडे सभागृहात सादर

नागपूर,ता.४ जुलै २०२३: आयुष्यावर बोलू काही या सदाबहार कार्यक्रमाला वीस वर्षे पूर्ण होत आहेत . त्यानिमित्ताने संपूर्ण महाराष्ट्रभर हा कार्यक्रम मोठ्या उत्साहाने घेतल्या जातो आहे. त्या अनुषंगाने हा कार्यक्रम दि ७ जुलै रोजी नागपूर, ८ जुलै अमरावती आणि ९ जुलै चंद्रपूर असा विदर्भ दौरा करतो आहे

.‘आयष्यावर बोलू काही’ यावर बोलताना डॉक्टर सलील कुलकर्णी म्हणाले, या कार्यक्रमाला वीस वर्ष पूर्ण होत आहेत. गेली वीस वर्ष या कविता आणि गाण्यांनी घराघरात आणि मनामनात जागा निर्माण केली. त्यामुळे हा कार्यक्रम इतक्या मोठ्या प्रमाणात यशस्वी होऊ शकला कारण तो सतत बदलतो आहे आणि आम्ही या मध्ये सतत नवीन कविता आणि गाणी यांचा समावेश करत आहोत.

या कार्यक्रमात अगदी ५ वर्षांपासून ते जेष्ठ नागरिकांसाठी सगळ्यांसाठी काहीतरी आहे. म्हणून हा कार्यक्रम सगळ्यांना आवडतो या कार्यक्रमाचे महाराष्ट्रात , भारतात अनेक ठिकाणी आणि १८ देशात प्रयोग झाले आहेत. या कार्यक्रमातील गाणी लोकांना तोंडपाठ आहेत लहान मुलांना पण पाठ आहेत. सगळ्या पिढ्यांपर्यंत ही मराठी भाषा पोहचली आहे. स्वतंत्र रचना आणि नवीन कविता असूनही इतकी वर्ष त्याला भरभरून दाद मिळत आहे हा पण एक महत्वाचा मुद्दा आहे.

डॉक्टर सलील कुलकर्णी यांच्या आवाज आणि संगीतातून तसेच संदीप खरे यांच्या लेखणीतून उतरलेल्या आणि त्यांनी गायलेल्या या अतिशय सुंदर गाण्यांच्या या अविस्मरणीय कार्यक्रमाने अनेक रेकॉर्ड मोडले आहेत. मराठी रसिक माणसाच्या मनात या कार्यक्रमाने एक अनोखी जागा निर्माण केली आहे. सामान्य माणसाचे आयुष्य या कार्यक्रमाने गाणी आणि कवितेच्या माध्यमातून अलगदपणे उलगडले आहे.

२० वर्ष मराठी मनात घर केलेला आणि १७०० प्रयोगाचा टप्पा पार केलेला हा कार्यक्रम चुकवू नये. हा कार्यक्रम ७ जुलै २०२३ रोजी, रात्री ७ वाजता वसंतराव देशपांडे सभागृह, सिव्हिल लाइन्स, नागपूर येथे आयोजित करण्यात आला आहे. या कार्यक्रमाचा रसिकांनी माेठ्या प्रमाणात आनंद घ्यावा असे आव्हान आरिष इन्फ्रास्ट्रक्चर यांनी केले आहे.

या सगळ्या कार्यक्रमाची तिकिटं Bookmyshow या ऍप वर उपलब्ध आहेत .याची माहिती विदर्भातील या कार्यक्रमाचे प्रायोजक आरिष इन्फ्रास्ट्रक्चरतर्फे प्रशांत काळी व कुणाल नरसापूरकर यांनी प्रसिद्धीपत्रकाद्वारे दिली.

आरिष इन्फ्रास्ट्रक्चर ही नागपुरातील गृहप्रकल्प बांधकाम व्यवसायातील एक अग्रणी कंपनी आहे आणि आपल्या ग्राहकांना दर्जेदार आणि उत्तम सेवा देण्यास कटिबद्ध आहे. सध्या या कंपनीचे बेसा नागपूर येथे मोठे टाऊनशिप प्रकल्प चालू आहे.

 

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *