उपराजधानीव्यापार- वाणिज्य

शिकविलेली आणि आवश्यक कौशल्ये यांच्यातील अंतर कमी करणे गरजेचे: सीपी गुरनानी

आयटी आणि आयटीईएस क्षेत्रासाठी पॅनेल चर्चा- ‘द जिओग्राफिकल सेंटर’ संपन्न

नागपूर,२८ जानेवरी २०२४:  : देशाच्या मध्यवर्ती असलेल्या नागपूर शहरात अभियांत्रिकी महाविद्यालये, चांगल्या वैद्यकीय सुविधा, चांगले शिक्षण आणि पायाभूत सुविधा असूनही आयटी क्षेत्रात रोजगाराच्या दृष्टिकोनातून उमेदवारांची निवड होण्याचे प्रमाण कमी आहे. सीईओ आणि एमडी टेक महिंद्रा सीपी गुरनानी यांनी सांगितले की, शिकविलेली कौशल्ये आणि बाजारात आवश्यक असलेली कौशल्ये यांच्यातील तफावत हे मनुष्यबळ निवडीचे प्रमाण कमी असण्याचे एक कारण असू शकते.

केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांच्या संकल्पनेतून साकारलेल्या आणि असोसिएशन फॉर इंडस्ट्रियल डेव्हलपमेंट (एआयडी) अंतर्गत आयोजित ‘खासदार औद्योगिक महोत्सव- ॲडव्हान्टेज विदर्भ’ येथे आयटी आणि आयटीईएस क्षेत्र- ‘द जिओग्राफिकल सेंटर’ या पॅनेल चर्चेत ते प्रमुख भाषणात बोलत होते. कार्यक्रमाला नॅसकॉमचे संस्थापक व अध्यक्ष हरीश मेहता; आयआयएमएनचे संचालक डॉ. भीमराया मेत्री; एसेंटचे अजय कपूर, एआयडीचे संयोजक विनोद तांबी, एआयडीचे अध्यक्ष आशिष काळे, एआयडी सचिव विजय शर्मा यांची उपस्थित होती. यावेळी ४ स्टार्टअप्स संबंधी सामंजस्य करारांवर स्वाक्षरी करण्यात आली. दरम्यान नितीन गडकरी यांनी नागपूरच्या आयटी क्षेत्रासाठीच्या व्हिडिओचे अनावरण केले..

लघुउद्योजकांनी जाणून घेतल्या पीएसयूच्या गरजा-
सार्वजनिक क्षेत्रातील सरकारी कंपन्यांना लागणाऱ्या उत्पादनांची गरज लक्षात घेत विदर्भातील लघुउद्योजकांनी रविवारी एमएसएमई व्हेंडर डेव्हलपमेंट प्रोग्रामला चांगला प्रतिसाद दिला. यावेळी एमएसएमई-डीआयचे संचालक पी. एम. पार्लेवार, इंडियन ऑइल कॉर्पोरेशन लिमिटेडचे उपमहाव्यवस्थापक (कॉन्ट्रॅक्ट्स) सचिंद्र नवनागे, मिश्रधातू निगम लिमिटेडच्या उपमहाव्यवस्थापक (परचेस) इंदू एमबी, पॉवरग्रिडचे मुख्य व्यवस्थापक (सी ॲण्ड एम) विजय लिखार, राष्ट्रीय केमिकल अॅण्ड फर्टिलायझर्स लिमिटेडचे उपमहाव्यवस्थापक (परचेस) शुभम गोडबोले, भारत डायनॅमिक्स लिमिटेडचे उपमहाव्यवस्थापक (सीसी) हर्षवर्धन दवे, मिनरल एक्स्प्लोरेशन ॲण्ड कन्सल्टन्सी लिमिटेडचे सहव्यवस्थापक चंद्रशेखर यादव, वेकोलिचे व्यवस्थापक (एमएम) शाहीद हुसैन, अंबाझरी आयुध निर्माणीचे सहमहाव्यवस्थापक मनीष श्रीवास्तव, इंडियन बँकचे फायनान्शिअल अॅनालिस्ट महक असोपा, कोकण रेल्वे कॉर्पोरेशन लिमिटेडचे के. के. एम. भारद्वाज, भारत पेट्रोलियम कॉर्पोरेशन लिमिटेडचे सीपीओ राजेश गहलोत, फूड कॉर्पोरेशन ऑफ इंडियाचे व्यवस्थापक कृष्णा गर्ग, हिंदुस्तान पेट्रोलियम कॉर्पोरेशन लिमिटेडचे उपमहाव्यवस्थापक प्रदीप चौहाण, मॉइलचे सहमहाव्यवस्थापक राजू डोईफोडे आदींचर सहभाग होता.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *