उपराजधानीक्राइमराजकारण

कामगार महिलेचा बळी घेणा-या भाजपावर कारवाई करा : विशाल मुत्तेमवार

कार्यक्रमातील चेंगराचेंगरीत महिलेचा मृत्यू

नागपूर : भारतीय जनता पार्टी आणि प्रशासनाच्या गलथान कारभारामुळे एका महिलेचा जीव गेल्याची घटना शहरात घडली. भाजपने महिलांचा कार्यक्रम सुरेश भट्ट सभागृहात घेतला. यादरम्यान सभागृहाच्या बाहेर चेंगराचेंगरी होऊन एका महिलेचा मृत्यू झाला आहे. याशिवाय अनेक इतर महिला जखमी झाल्यात. या धक्कादायक घटनेचा महाराष्ट्र काँग्रेस कमिटीचे महासचिव विशाल मुत्तेमवार यांनी निषेध केला असून मार्केटींगसाठी निष्पाप जीवाचा बळी घेणाऱ्या भाजपावर कारवाईची मागणी केली आहे.

शहरातील सुरेश भट्ट सभागृहात भाजपने आयोजित केलेल्या कामगार कल्याण योजनेच्या शिबिरात गर्दीमुळे झालेल्या चेंगराचेंगरी एका महिलेचा मृत्यू झाला. मनू तुळशीराम राजपूत (वय ६५ रा. आशीर्वाद नगर) असे मृत महिलेचे नाव आहे.

भाजपकडून इमारत व इतर बांधकाम या व्यवसायात काम करणाऱ्या बांधकाम कामगारांसाठी ही योजना काढण्यात आली आहे. मात्र जर अशा कार्यक्रमाचे नियोजन भाजपला करता येत नाही तर असे कार्यक्रम घेतातच कसे? असा सवाल विशाल मुत्तेमवार यांनी केला. दरम्यान या महिलेच्या मृत्यूला जबाबदार असणाऱ्या भारतीय जनता पार्टी आणि आयोजकांवर कारवाई प्रशासनाकडून करण्याची मागणी त्यांनी केली आहे.

8 मार्चला महिला दिन होता. या दिनानिमित्त भाजप महिलांचा सन्मान तर करू शकले नाही, मात्र एका महिलेचा बळी घेणाऱ्या या कार्यक्रमांच्या आयोजकांवर गुन्हा दाखल झाला पाहिजे अशी भूमिका त्यांनी घेतली. याच घटनेच अनेक इतर महिला जखमी झाल्यात. त्यामुळे या जखमींच्या नुकसान भरपाईची मागणी विशाल मुत्तेमवार यांनी केली आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *