उपराजधानीमहामेट्रो

 नागपूर मेट्रोच्या प्रवासी सेवा होणार द्वीगुणित: प्रत्येक तासाला उपलब्ध असणार मेट्रो सेवा

नागपूर २३ : नुकतेच नागपूर मेट्रोला मेट्रो रेल्वे सुरक्षा आयुक्त (सीएमआरएस) यांच्या तर्फे अप मार्गावर प्रवासी मेट्रो सेवा सुरु करण्याचे प्रमाणपत्र मिळाल्यानंतर, महा मेट्रो नागपूर आता मेट्रो प्रवासी सेवा द्विगुणीत करण्याकरिता सज्ज झाली आहे. एवढेच नाही तर नागपूर मेट्रोची प्रवासी सेवा ही प्रत्येक तासाला सिताबर्डी इंटरचेंज मेट्रो स्टेशन आणि खापरी मेट्रो स्टेशन येथून लवकरच सुरु होणार आहे.

तयार केलेल्या योजनानुसार मेट्रोची प्रवासी सेवा सकाळी ८.०० वाजता पासून सिताबर्डी इंटरचेंज आणि खापरी मेट्रो स्टेशन येथून एकाच वेळी अप आणि डाऊन मार्गिकेवर प्रत्येक तासावर सकाळी ८.०० ते सायंकाळी ७.०० पर्यंत प्रवासी नागरिकांन करिता उपलब्ध असेल.

सध्यास्थितीत मेट्रोची प्रवासी सेवा ही संकाळी ८.००, ९.३० आणि ११.०० तसेच दुपारी ३.३०,५.०० आणि सायंकाळी ६.३० वाजता पर्यंत एक मेट्रो ट्रेन उपलब्ध आहे.
पण हे दृश्य सीएमआरएसच्या मिळालेल्या प्रमाणपतत्रा नंतर लवकरच बदलणार आहे. आता मेट्रोची प्रवासी सेवा अप आणि डाऊन मार्गावर धावेल व मेट्रो स्टेशनच्या संबंधित प्लॅटफॉर्मवर देखील थांबेल. महा मेट्रो नागपूर तर्फे आता ६ मेट्रो प्रवासी सेवेच्या ऐवजी १३ मेट्रो प्रवासी सेवा प्रत्येक तासावर प्रवाश्यां करिता उपलब्ध असेल.
शिवाय महा मेट्रो,नागपूर लवकरच जय प्रकाश नगर आणि राहटे कॉलोनी मेट्रो स्टेशन येथून प्रवासी सेवा सुरु करणार आहे. याव्यतिरिक्त नागपूर मेट्रो रिच-३ (सिताबर्डी इंटरचेंज स्टेशन ते लोकमान्य नगर मेट्रो स्टेशन) अंतर्गत येणाऱ्या अश्या महत्वाच्या मार्गिकेवर प्रवासी सेवा सुरु करण्याकरीता सज्ज झाले आहे.
प्रवासी सेवेमध्ये वाढ झाल्याने नागरिकांना याचा मोठ्या प्रमाणात फायदा होणार मुख्यत: जे मिहान आणि हिंगणा येथील औद्योगिक वसाहत येथे कार्यरत आहे. मुख्य म्हणजे मिहान सेझ येथील कंपनीमध्ये कार्यरत कर्मचाऱ्यांनी मेट्रोची प्रवासी सेवा ही त्यांच्या कार्यालयीन वेळेनुसार कार्यरत असावी या करीता बऱ्याच दिवसांपासून मेट्रो प्रशासनाकडे मागणी केली होती जे की आता लवकरच पूर्ण होणार आहे.

प्रत्येक तासावर मेट्रो सेवा उपलब्ध झाल्याने मेट्रोच्या प्रवासी सेवेमध्ये देखील वाढ होईल. नागपूर मेट्रो तर्फे याआधी मिहान आणि हिंगणा येथे कार्यरत औद्योगिक वसाहती तसेच कार्यरत कर्मचाऱ्यांशी त्यांच्या कंपनी पर्यंत मेट्रो प्रवासी सेवा व फिडर सर्विस संदर्भात अवगत करत मेट्रोच्या प्रवासी सेवा संदर्भात सादरीकरण करण्यात आले आहे. मेट्रोच्या प्रवासी सेवेमध्ये वाढ झाल्याने येथील कर्मचाऱ्यांना याचा नक्कीच फायदा होईल व प्रवाश्यांन मध्ये देखील वाढ होईल.

महा मेट्रो लवकरच एयरपोर्ट मेट्रो स्टेशन आणि नागपूर विमानतळ दरम्यान शटल सेवा देखील सुरू करीत आहे. ज्यायामुळे मेट्रो ट्रेन आणि विमानतळावरील सेवा जोडल्या जाणार व नागरिकांना देखील सोईचे ठरणार.

नागपूर महानगरपालिकेच्या सहकार्याने महा मेट्रो नागपूर द्वारे शहराच्या बेलतरोडी भागातून बस सेवा सुरु केली आहे. सदर बस सेवा ही एयरपोर्ट मेट्रो स्टेशन,एयरपोर्ट साउथ मेट्रो स्टेशन,न्यू एयरपोर्ट आणि खापरी मेट्रो स्टेशनला जोडते आणि कर्मचाऱ्यांना कंपनी कार्यालय आणि औद्योगिक वसाहती पर्यत सेवा पुरविते. सदर बस सेवा सकाळी ७.४० मि. पासून सायंकाळी ८.३० मि. पर्यत कार्यरत असते. महा मेट्रो ने मल्टी मॉडेल इंटिग्रेशन (एमएमआय) अंतर्गत फीडर सेवा याआधीच सादर केली आहे. सुरु करण्यात आलेली सदर बस सेवा मिहान येथे कार्यरत कर्मचाऱ्यांना त्यांच्या घरापासून जवळीक मेट्रो स्टेशन आणि खापरी मेट्रो स्टेशन पासून मिहान येथे कार्यरत कर्मचाऱ्यांना कार्यस्थळी सोडते.

याशिवाय ई-सायकल,बायसिकलची सेवा शेअरिंग बेसिस वर उपलब्ध असून सदर सुविधा मेट्रो स्टेशन याठिकाणी उपलब्ध आहे तसेच मिहान येथे कार्यरत कंपन्यानी देखील याचा लाभ घेतला आहे. मेट्रो स्टेशन परिसरात मोठ्या प्रमाणात पार्किंगची सोय देखील करण्यात आली आहे. सदर सोई-सुविधा प्रवाश्यांची आवश्यकता लक्षात घेऊन महा मेट्रोने याचे नियोजन केले आहे. याव्यतिरिक्त ब्रेल साईनेज, टॅकटाईल, विशेष तिकीट काउंटर आणि दिव्यांगकरिता व्हीलचेअर,बेबी केयररूम,सीसीटीव्ही कॅमेरा,बॅगेज स्कॅनर,सर्व मेट्रो स्टेशनवर सुरक्षा रक्षक उपलब्ध असणार . या प्रकारच्या सर्व सोई प्रवाश्यांच्या सुख-सुविधा वाढविण्यास मदत करते.

. अप आणि डाऊन प्लॅटफॉर्म वर होणार दररोज २५ प्रवासी सेवा
. शेवटची प्रवासी सेवा सिताबर्डी स्टेशन येथून सायंकाळी ७.०० तसेच खापरी स्टेशन येथून ८.००वाजता राहणार .

 

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *