उपराजधानीमहामेट्रो

महा मेट्रोच्या नागपूर ‘फेसबुक’ पानाला मिळाले पाच लाख लाईक्स

“४ वर्षात गाठला महत्वाचा पल्ला”

नागपूर : नागपूर मेट्रोचे काम सुरु झाले तेव्हा ४ वर्षाआधी सुरु केलेले फेसबुक पान आज ५ लाख नागरिकांच्या पसंतीस उतरले आहे. रिच-१ अंतर्गत वर्धा मार्गावर नागपूर मेट्रोची प्रवासी सेवा नागरीकांन करीता सुरु झाली असून लवकरच रिच-३ अंतर्गत येणाऱ्या हिंगणा मार्गावर देखील प्रवासी सेवा सुरु करण्याचा महा मेट्रोचा मानस आहे. नागपूर मेट्रो रेल प्रकल्प अल्प अवधीत एकाहून एक टप्पा गाठत असून निर्माण कार्य काळमर्यादेत पूर्ण करण्याच्या दिशेने अग्रेसर आहे त्याच सोबत नागपूर मेट्रो रेल प्रकल्पाचे अधिकृत फेसबूक पेज सुद्धा नव-नवे कीर्तिमान स्थाप्तीत करीत आहे देशाच्या इतर मेट्रो रेल प्रकल्पाच्या तुलनेत अग्रेसर आहे.
संपूर्ण शहरात सुरु असणाऱ्या मेट्रो बांधकामाची अद्ययावत माहिती तपासणे किंवा प्रवासी वाहतूक सेवे संदर्भात माहिती मिळविणे तसेच मनात येणाऱ्या शंकांचे निरसन करून घेणे त्यांच्या हां त्यांच्या दैनंदिन कार्यतला भाग झाला आहे. प्रत्येक प्रश्नांची उत्तरं इथे मिळत असल्याने झपाट्याने चाहता वर्ग वाढणार शहरातील हे लोकप्रिय अव्वल फेसबुक पान संपूर्ण देशात इतर मेट्रो फेसबुक पानांमध्ये ५ लाख एवढे लाईक्स असलेले पहिल्या क्रमांकाचे फेसबुक पान ठरले आहे. तसेच महाराष्ट्रातले आणि नागपूर शहरातील इतर नामवंत फेसबुक पानांमध्येही नागपूर मेट्रो पान हे प्रथम क्रमांकाचे लोकप्रिय पान म्हणून नावारूपास आले आहे.

नागरिकांच्या फायद्याचे असणारी माहितीपूर्ण कार्यक्रम ‘फेसबुक लाईव्ह’ स्वरूपात व्यवस्थापकीय संचालक डॉ. ब्रिजेश दीक्षित यांचा नागरिकांसाठी असलेल्या सूचना अनेकदा व्हिडीओ रूपात नागरिकांपर्यंत पोहचवले जातात. भारतीय परंपरेतले गणपती महोत्सव सारखे सणवार, पहिल्यांदाच मेट्रोचे डबे नागपुरात पोचल्याची पोचपावती किंवा नागपूर मेट्रोचा उद्घाटन सोहळा व नागपूर मेट्रो पहिल्यांदाच वर्धा मार्गावर धावणारा प्रसंग असो असे अत्यंत आनंदाचे प्रसंग फेसबुक लाईव्ह करून नागरिकांसमवेत हा आनंद मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला. याशिवाय प्रवासी मेट्रो सेवा,बांधकाम स्थळावरून प्रवास करणाऱ्या नागरिकांनी त्यांच्या कॅमेराने टिपलेले छायाचित्र प्रकाशित करणे किंवा विविध कॉन्टेस्टच्या माध्यमातून शहरातील नागरिकांना जुळवून ठेवण्याचे काम हे फेसबुक पेज करते आहे. याकाळात फेसबुकवर प्रकाशित होणाऱ्या माहितीच्या आधारे महामेट्रोच्या पारदर्शी कामाची प्रचिती आल्याने नागरिकांचा विश्वास प्रगाढ होत जाऊन मेट्रो चमूसोबत सामाजिक कार्य करण्याची नागरिकांची रुची वाढत जाते आहे याच माध्यमातून जवळ जवळ पाच हजाराहून जास्ती मेट्रोमित्र या परिवारात सामील झाले आहेत.

नागपूर मेट्रो रुळावरून धावायला लागली असून नागरिकांनी दाखवलेला विश्वास आणि सहकार्य या ५ लाखाच्या आकड्यावरून लक्षात घेता, पुढील कार्यप्रवास अधिक वेगाने आणि त्यांच्या विश्वासावर खरा उतरणारा होणार यात शंका नाही. याच आनंदी उत्साही घटनेचे साक्षीदार होता यावे म्हणून तो दि. ४ जुलै रोजी संध्याकाळी ५ वाजता मेट्रो मित्रांसोबत डॉ. दीक्षित आणि चमूने उत्साहात साजरा केला. याप्रसंगी मा. ब्रिजेश दीक्षित, व्यवस्थापकीय संचालक यांनी या यशाचे श्रेय नागपूरकरांना दिले. यावेळी संचालक (वित्त)एस. शिवमाथन, संचालक (रोलिंग स्टॉक)सुनील माथूर, (महाव्यवस्थापक- प्रशासन) श्री अनिल कोकाटे आणि मेट्रो मित्र उपस्थित होते.

नागपूर मेट्रो फेसबुक पेज :
• १२ जानेवारी २०१५ रोजी नागपूर मेट्रो रेल प्रकल्पाचे फेसबूक पेज सुरु
• दिनांक ०७ सप्टेंबर २०१५ रोजी १ लाख फेसबूक लाईक्स
• दिनांक ११ जुलै २०१६ रोजी २ लाख फेसबूक लाईक्स
• ०४ में २०१७ रोजी ३ लाख फेसबूक लाईक्स
• १८ डिसेंबर,२०१७ रोजी ४ लाख फेसबूक लाईक्स मिळविण्याचा मान
• १० एप्रिल २०१८ रोजी सर्वात जास्ती फेसबूक लाईक्स मिळविण्यास कोच्ची मेट्रो रेल प्रकल्पाला मागे टाकले
• सध्यास्थितीत इतर मेट्रोच्या फेसबुक पेज च्या तुलनेत क्रमांक १ चे फेसबुक पेज व ५ लाख लाईक्स मिळविण्याचा मान (व यामध्ये सतत वाढ सुरु)

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *