उपराजधानीज्योतिष

कान्होलीबाराचे शनिशक्तीपीठ हे वैदर्भियांचे शनि शिंगणापूर: वर्षा उसगावकर

भाविकांना दिलेला शब्द पाळण्यासाठी पुन्हा शनिदर्शन

नागपूर: माणूसकी आणि देवत्व हे दोन्ही शब्द माझ्यासाठी खूप महत्वाचे आहे. हे शब्द मला शांती प्रदान करतात. पुराणांमध्ये शनिबद्दल खूप सांगितलं आहे. माझे वडील यांना देखील ज्योतिषशास्त्राची आवड होती. तीच आवड कदाचित माझ्यातही आली असेल. म्हणूनच नागपूरचे आर्यभट एस्ट्रोनॉमीचे संचालक डॉ.भूपेश घाडगे यांनी कान्होलीबारा,चौकी येथील शनिमूर्तींच्या प्रतिष्ठापणेसाठी निमंत्रण दिले तेव्हा मी ते नाकारु शकले नाही. माझी शनिदेवावर श्रद्धा आहे. कान्होलीबारा आता जगाच्या नकाश्‍यात विशेष तीर्थ क्ष्ेत्र म्हणून ओळखल्या जात आहे किंबहूना वैदर्भियांसाठी ते प्रति ‘शनि शिंगणापूरच’असल्याचे विधान सुप्रसिद्ध अभिनेत्री वर्षा उसगावकर यांनी केले.
गुरुवार दि. ६ फेब्रुवारी रोजी प्रेस क्लब येथे आयोजित पत्र परिषदेत त्या बोलत होत्या.याप्रसंगी आर्यभट एस्ट्रोनॉमी संस्थेचे संचालक व अध्यक्ष् डॉ.भूपेश घाडगे, सुप्रसिद्ध ज्योतिषतज्ज्ञ डॉ.पूजा घाडगे,जयराम धामणे,रामदास फुलझेले,रमेश मिश्रा,देवेंद्र दायरे आदी उपस्थित होत. याप्रसंगी बोलताना वर्षा उसगावकार म्हणाल्या,की कान्होलीबारा हे श्री क्ष्ेत्र अाता जगाच्या नकाश्‍यात विशेष तीर्थ श्रेत्र म्हणून ओळखल्या जात आहे. याच ठिकाणी भारतातील सुप्रसिद्ध ‘बृहस्पतीचं’मंदिर असून ज्योतिषाचार्य डॉ.भूपेश घाडगे यांनी नक्ष् त्रांचा सखोल अभ्यास करुन खगोलीय वास्तूप्रमाणे याच ठिकाणी शनिदेवाच्या भव्य मूर्तींची प्राणप्रतिष्ठा ३ जून २०१९ रोजी माझ्या हस्ते केली तेव्हाच मंदिराचे बांधकाम पूर्ण झाल्यावर दर्शनाला पुन्हा येईल,असा शब्द दिला होता.

नुकतेच २४ जानेवारी २०२० मध्ये याच परिसरात जगप्रसिद्ध तत्ववेते,खगोलशास्त्रज्ञ व ज्योतिषाचार्य आर्यभट,ज्यांनी जगाला ‘शून्याची’देगणी दिली,गणितीय शोध परिपूर्ण केला त्यांच्या भव्य पुतळ्याचा अनावरण सोहळा पार पडला, याशिवाय शनीपत्नी नीलादेवी ज्यांना ऋणमुक्तेश्‍वरी देवीच्या नावानेही ओळखल्या जातं त्यांच्याही मूर्तींची प्रतिष्ठापना झाली आहे,या सर्वांचे दर्शन घेण्यासाठीच खास मुंबईहून आल्या असल्याचे त्यांनी सांगितले. ज्ञान ही गोष्ट फक्त स्वत:पुरतीच मर्यादित ठेवण्यासाठी नसते.भूपेश घाडगे हे ज्योतिषशास्त्राचे ज्ञान आज जगभरातील विद्यार्थ्यांना प्रदान करीत आहेत मला याचाही विशेष अभिमान वाटत असल्याचे त्यांनी सांगितले.

मराठी चित्रपट व चांगल्या भूमिका याबाबतच्या प्रश्‍नावर बोलताना ‘अण्णागिरी’हा खूप चांगला चित्रपट असून यात माझी विनोदी भूमिका असल्याचे त्यांनी सांगितले. पुढे ही चांगली भूमिका मिळाल्यास मराठी चित्रपट नक्की करणार असल्याचे त्या म्हणाल्या. भूमिकेला मात्र ‘कणा’असला पाहिजे.चित्रपट चालणं न चालणं हे आपल्या हातात नसतं. नाटक या विषयाबाबत सांगताना ‘गुंतता ह्दय हे’या नाटकात कल्याणीच्या भूमिकेसाठी प्रस्ताव आला होता मात्र इतर चित्रीकरणात व्यस्त असल्यामुळे ती भूमिका साकारणं शक्य झालं नाही. ‘हेलमॅट’ नाटकात देखील चार वर्षांपूर्वी चंद्रकांत कुलकर्णी दिग्दर्शित ’हेलमेट ’मध्ये देखील राणीच्या भूमिकेसाठी विचारणा झाली होती मात्र ते ही नाटक मी करु शकले नाही याची खंत त्यांनी व्यक्त केली. मात्र ‘वीज म्हणाली धरतीला’हे एका वाहीनीवर प्रसारित झाले होते.

मराठी चित्रपट हा मागे जात आहे का?या प्रश्‍नाबाबत बोलताना खरे बघितले तर मराठी चित्रपट आता ‘वयात’आल्याचे त्यांनी सांगितले.आज तंत्र खूप पुढे गेलं आहे.मात्र हिंदी चित्रपटांची भ्रष्ट नक्कल मराठीला करण्याची गरज नसल्याचे त्या म्हणाल्या.मराठी संस्कृती इतकी चांगली असताना हिंदी चित्रपटांची नक्कल किवा गाण्यांची नक्कल करण्याची गरजच नाही. बंगाली,उडिया इ. चित्रपट हे कधीही हिंदी चित्रपटांची नक्कल करीत नाहीत त्यांची अस्सल संस्कृतीच ते पडद्यावर दाखवतात. आज वर्षाला १०० च्या वर मराठी चित्रपट निर्मित होत आहेत मात्र ५ किवा १० चित्रपटच प्रदर्शित होत असल्याचे त्या म्हणाल्या.

दिग्दर्शनात उतरणार का?या प्रश्‍नाबाबत बोलताना,माझ्याकडे एवढा पैसा नसल्याचे त्यांनी हसून सांगितले. आज चित्रपट बनवायला १४ कोटी तरी लागतात.नुकसानीची जोखीमही घ्यावी लागते. पैसा असता तरी चित्रपट निर्मिती केली नसती अशी प्रांजळ कबुलीही त्यांनी दिली.
हिंगणघाटच्या दूर्देवी घटनेच्या पार्श्वभूमीवर, कलाकार हे राजकीय विषयांवर भरभरुन बोलतात मात्र सामाजिक विषयांवर ते मोकळेपणाने भूमिका घेत नाही, या प्रश्‍नाबाबत बोलताना कलाकारांनी सामाजिक विषयांवर देखील मत मांडले पाहिजे असे त्या म्हणाल्या.सामाजिक असो किवा राजकीय बाब,यावर मत मांडणं म्हणजे न्यायालयाचा अवमान नसतो. शिक्ष्ा होण्याची भीती नसते,महिलांवर होणारा अन्याय याविषयी कलावंतांनी पुढे येऊन मत मांडलं पाहिजे,असे समर्थन त्यांनी केले.

प्रारंभी भूपेश घाडगे यांनी पत्र परिषदेमागील भूमिका मांडताना गॅलिलियो,न्यूटनच्याही पूर्वीपासून आर्यभटांचे शास्त्र उदयास आले असल्याचे सांगितले.मात्र या शास्त्राबाबत युवा पिढीला काहीही ज्ञान नाही.ज्योतिष हे एक प्राचीन पुरातण शास्त्र आहे. त्याच आधारावर ग्रह,नक्ष् त्रे,राशी गणना इ.शास्त्रोक्त खगोलीय अभ्यास करुनच कान्होली बारा येथे शनिशक्तीपीठाची स्थापना करण्यात आली असल्याचे त्यांनी सांगितले. पत्र परिषदेला जयराम धामणे,डॉ.पूजा घाडगे,रामदास फुलझेले, रमेश मिश्रा, देवेंद्र दायरे आदी उपस्थित होते.

वर्षां उसगावकर यांना त्यांच्या सौन्दर्य याचे रहस्य विचारले असता,फार कमी जेवण,भुकेपेक्षा कमी जेवणे असं हसत त्यांनी सांगितले. जठराग्नी पूर्ण अन्नानी भरू नये,वायू साठी जागा असावी असे आहारशास्त्र सांगतं, त्याचेच मी पालन करते,असे सौन्दर्याचे गुपित त्यांनी उलगडले.

अखिल भारतीय चित्रपट महामंडळाकडून सदस्यांना खूप अपेक्ष्ा-
अ.भा.चित्रपट महामंडळाची मी अध्यक्ष् असून या मंडळाकडून चित्रपटसृष्टितील सदस्यांना खूप अपेक्षा आहेत. आज जवळपास या मंडळाचे ४० सभासद आहेत. त्यांना चित्रपटसृष्टित कोणतीही अडचण आल्यास मंडळातर्फे ती सोडवली जाते. अनेकांना काम केल्यावरही मानधन मिळत नाही.त्यांचं मानधन मिळवून दिलं जातं त्याशिवाय त्या चित्रपटाला प्रमाण पत्र दिले जात नाही.काही वृद्ध कलावंत आहेत त्यांच्या पेंशन,आजारपणासाठी मंडळातर्फे मदत दिली जाते.आज मराठी चित्रपट मल्टीप्लेक्समध्ये दिसत असला तरी प्राईम टाईम मिळत नाही,यावर देखील तोडगा काढण्याचा प्रयत्न सुरु आहे. चित्रपट हा दिवाणखाना किवा अंगणात बसून बघितल्या जाऊ शकत नाही. मराठी चित्रपटांना ग्रामीण भागात देखील ४०-५० आसनाचे लहान लहान चित्रपट गृह असावे. आज मराठी चित्रपटाला हिंदी किवा इंग्रजी नव्हे तर मराठी चित्रपटांशीच स्पर्धा करावी लागत आहे.मल्टीप्लेक्समध्ये मराठी चित्रपटासाठी प्राईम टाईम मिळण्यात मनसेच्या आंदाेलनाला यश मिळाले का?या प्रश्‍नावर त्यांनी प्रतिप्रश्‍न केला,तुम्हाला काय वाटतं?मिळाले का?नाही,हे उत्तर मिळाल्यावर त्यांनीही मला ही असंच वाटतं सांगून प्रश्‍न टोलवला.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *