उपराजधानीज्योतिष

जयराम धामणे,राजेंद्र दिवे ‘जीवनगौरव’पुरस्काराने सन्मानित

आर्यभट एस्ट्रोनॉमी संस्थेचा पुरस्कार सोहळा

नागपूर: सुप्रसिद्ध अभिनेत्री वर्षा उसगावकर यांच्या हस्ते रामदापेठेतील एका प्रसिद्ध हॉटेलमध्ये शहरातील सुविख्यात आर्यभट एस्ट्रोनॉमी संस्थेचा पुरस्कार वितरण सोहळा गुरुवारी पार पडला. याप्रसंगी सुप्रसिद्ध समाजसेवी जयराम धामणेज्येष्ठ पत्रकार राजेंद्र दिवे यांना ‘जीवनगौरव’पुरस्काराने सन्मानित करण्यात आले.

याप्रसंगी बोलताना वर्षा उसगावकर म्हणाल्या,की ज्योतिष हे भारतातील एक प्राचिन शास्त्र आहे. त्यांच्या वडीलांनी ज्योतिषशास्त्राची खूप आवड होती मात्र या शास्त्रातील गणितीय आकडेमोड याची मला अद्याप भीती वाटते.तसेही शालेय जीवनात गणित या विषयाची भीती वाटायची त्यामुळेच कदाचित ज्योतिषशास्त्रातील कालगणनेचे गणित मला कधी जमलेच नाही मात्र ज्योतिषशास्त्र व या शास्त्रावर नितांत प्रेम करणारे,देशभरातून आज येथे उपस्थित झालेले ज्योतिषतज्ज्ञ यांच्याविषयी मला नितांत आदर व्यक्त करीत त्यांनी आर्यभट एस्ट्रोनॉमी संस्थेच्या पुढील वाटचालीला शुभेच्छा प्रदान केल्या.

जयराम धामणे यांनी पुरस्कार स्वीकारताना आनंद होत असल्याचे सांगितले. आज देशभरातील विविध राज्यातून आलेल्या ज्योतिषतज्ज्ञांसमोर हा पुरस्कार मिळाल्याचा विशेष आनंद होत असल्याचे सांगितले. समाजाच्या विविध क्ष्ेत्रात उल्लेखनीय काम करणारे यांचा आज सत्कार झाला, त्यांची दखल संस्था गेल्या आठ वर्षांपासून घेत आहे याचे कौतूक आहे.ज्योतिष हे विज्ञानच आहे मात्र आपल्याच देशात ते दूर्लक्ष्ति असल्याची खंत त्यांनी व्यक्त केली. हे शास्त्र निराधान नसून या शास्त्राचा अभ्यास सर्वसामान्यांपर्यंत जाने ही आज काळाची गरज असल्याचे त्यांनी सांगितले.

राजेंद्र दिवे यांनी पुरस्कारासाठी आनंद व्यक्त करीत संस्थेचे आभार मानले. एवढ्या लवकर जीवनगौरव घेऊन कामापासून निवृत्त होणार नसल्याची कोटी करुन अद्याप खूप काम करणार असल्याचे त्यांनी सांगितले. आर्यभट यांची नव्याने ओळख संस्थेचे संचालक डॉ. भूपेश घाडगे युवा तरुणाईला करुन देत आहे याचा आनंद वाटतो,असे ते म्हणाले.

भूपेश घाडगे यांनी आयोजनामागील भूमिका स्पष्ट करताना गेल्या २२ वर्षांपासून ज्योतिषशास्त्राचे अध्यापन करीत असल्याचे सांगितले. हे शास्त्र व या शास्त्रातील अगाध ज्ञान तरुण पिढीपर्यंत पोहोचवणे यासोबतच समाजातील विविध क्ष्ेत्रात उल्लेखनीय काम करणारे यांचा शोध घेऊन सत्कार करने यामागे उद्देश्‍य म्हणजे ते त्यांच्या क्ष्ेत्रात परत गेल्यानंतर स्मृतिचिन्हाच्या रुपात ज्योतिषशास्त्राची समाजाला मिळालेली देणगी ही देखील त्यांच्या दिवानखाण्यात,कार्यालयात झळकावी हे उद्देश्‍य असल्याचे सांगितले. पुढे ही संस्थेतर्फे असाच सत्कार सोहळा आयोजित करीत राहण्याचा मानस त्यांनी व्यक्त केला.

आैरंगाबाद येथून आलेले डॉ. अरुण उंचेगावकर यांना तसेच त्यांच्या पत्नी शोभा उंचेगावकर यांना ‘सर्वोकृष्ट वास्तूविशारदचा’ पुरस्कार प्राप्त झाला. लहानपनापासूनच ज्योतिषशास्त्राची आवड असल्यामुळे शास्त्रोक्त अभ्यास करुन पदव्या प्राप्त केल्या असल्याचे त्यांनी सांगितले. आजोबा रंगनाथ गुरु उंचेगावकर हे देखील प्रख्यात ज्योतिष होते. र्थमल पॉवर प्लांटमध्ये अभियंता पदावर कार्यरत असताना देखील या शास्त्राचा अभ्यास सुरु ठेवला.ज्योतष द्रोणाचार्य, ज्योतिष पारंगत,ज्योतिष ब्रम्हऋषि अश्‍या अनेक पदव्या मिळवून आज औरंगाबाद,पुणे,सातारा इ. अनेक शहरात ज्योतिष सेवा करीत असल्याचे त्यांनी सांगितले. शोभा उंचेगावकर यांनी देखील वास्तूशास्त्रात अनेक पदव्या प्राप्त केल्या असून या शास्त्राची मनापासून आवड असल्यामुळेच अविरत याच सेवेत रमत असल्याचे सांगितले.

याप्रसंगी ज्येष्ठ पत्रकार डॉ.ममता खांडेकर यांचा ’उत्कृष्ट पत्रकार नागपूर शहर’ देऊन सन्मानित करण्यात आले. पत्रकार स्नेहल जोशी यांना प्रसार माध्यमातील उत्केष्ट कार्यासाठी ‘उत्कृष्ट महिला एंकर’चा पुरस्कार देऊन गौरविण्यात आले. उल्लेखनीय कार्यासाठी ज्योतिषाचार्य डॉ.पूजा घाडगे यांना ‘उत्कृष्ट ज्योतिषाचार्य‘चा पुरस्कार प्रदान करण्यात आला.याशिवाय सामाजिक क्ष्ेत्रातील पंकज सपाटे,रामदास फुलझले, रमेश मिश्रा, देवेंद्र दायरे यांचा सत्कार करण्यात आला.शिल्पी मून यांना व्यवस्थपन क्षेत्राचा ॲड.नीना डोगरा यांना विधी क्षेत्रातील पुरस्काराने गौरविण्यात आले. समाजामध्ये खालच्या स्तरापर्यंत कायद्याचे मार्गदर्शन व गरजूंना मदत करणार्या ॲड.नीना डोगरा या बी.कॉम,एल.एल.बी,एलएलएम(बिजनेस लॉ) एलएलएम(क्रिमिनल लॉ) मानवी अधिकार व सायबर कायद्यातील पदव्यूत्तर पदवी प्राप्त आहेत.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *