उपराजधानी

महानिर्मितीच्या ९ व्या राज्यस्तरीय गुणवत्ता मंडळ स्पर्धेचा शानदार समारोप

नागपूर : महानिर्मितीचा तंत्रज्ञ हा मशीनचा खरा जाणकार आहे, तंत्रज्ञ व अभियंत्यांवर वीज उत्पादनाची मोठी जबाबदारी आहे. गुणवत्ता मंडळासारख्या स्पर्धेच्या माध्यमातून नवनवीन लोकांना संधी उपलब्ध करून, खाजगी व सार्वजनिक उपक्रमातील गुणवत्ता मंडळांशी स्पर्धा करून पर्यायाने महानिर्मिच्या शाश्वत विकासात गुणवत्ता मंडळ चमूने अधिक सहभाग वाढवि णे गरजेचे असल्याचे प्रतिपादन संचालक(संचलन) चंद्रकांत थोटवे यांनी केले. ते दोन दिवसीय राज्यस्तरीय गुणवत्ता मंडळ स्पर्धेच्या समारोपीय समारंभात कोराडी प्रशिक्षण केंद्र येथे बोलत होते. मंचावर प्रमुख पाहुणे म्हणून चंद्रकांत थोटवे, कार्यकारी संचालक(मानव संसाधन) विनोद बोंदरे, प्रसिद्ध नाट्य व सिने अभिनेता डॉ.गिरीश ओक, विशेष अतिथी म्हणून मुख्य अभियंते अभय हरणे, राजकुमार तासकर, राजेश पाटील, मिलिंद नातू, आनंद मेश्राम, विनय हरदास प्रामुख्याने उपस्थित होते.

समारंभाचे अध्यक्षस्थान मुख्य अभियंता दिलीप धकाते यांनी भूषविले. माज्या जडणघडणीत महाराष्ट्र राज्य विद्युत मंडळाचा मोठा वाटा आहे. माझे वडील रत्नाकर ओक हे १९७८ ते १९८८ अशी दहा वर्षे कोराडी प्रशिक्षण केंद्राचे प्रमुख होते. एम.एस.ई.बी.ला नोकरीला असल्याने माझे बालपण वीज केंद्रांच्या वसाहत् ाीतच गेले आहे. विशेष म्हणजे वडिलांच्या संस्कारातील शिकण्याची उर्मी, स्वावलंबन आणि प्रामाणिकता ह्या गोष्टीत गुणवत्ता दिसून येत असल्याचा अभिमान त्यांनी व्यक्त केला.

बालपणीच्या जुन्या आठवणींना उजाळा देताना व वडिलांचे पत्र वाचतांना मात्र डॉ.गिरीश ओक यांना गहिवरू न आले. डॉ.गिरीश ओक यांनी त्यांच्या जीवन प्रवासातील गंमती-जमती उपस्थितांना शेअर केल्या. तुम्ही असे काम करा कि तुम्ही नसले कि दोन क्षण अवघडल्या सारखे झाले पाहिजे, असा विनंतीवजा सल्ला त्यांनी सहभागी स्पर्धकांना दिला. याप्रसंगी डॉ.गिरीश ओक यांनी “तो मी नव्हेच” या नाटकातील स्वगत सादर करून उपस्थितांची मने जिंकली. मागील तीन वर्षांत महानिर्मितीमध्ये सातत्याने सुधारणा, सकारात्मक नवनवे बदल, चांगले काम होत आहे व आगामी आव्हानांसाठी महानिर्मितीचे मनुष्यबळ सक्षम आहे. त्याचे कारण कोराडी व नाशिक प्र-ि शक्षण केंद्रासारखे दमदार गुरुकुल महानिर्मितीकडे आहे.

गुणवत्ता मंडळ चमूने आपला नावलौकिक कायम ठेवावा अशी अपेक्षा व्यक्त केली व डॉ.गिरीश ओक यांच्या अभिनयातून खºया अथार्ने गुणवत्ता दिसून येत असल्याचे गौरवोद्गार विनोद बोंदरे यांनी काढले. प्रारंभी सहभागी स्पर्धकांनी आपले मनोगत व्यक्त केले. त्यानंतर मुख्य अभियंते अभय हरणे, राजेश पाटील, मिलिंद नातू यांनी गुणवत्ता मंडळाची संकल्पना, महत्व व वैशिष्ट्ये यावर आपले विचार मांडले.मुख्य अभियंता दिलीप धकाते म्हणाले कि, ज्ञानासोबतच सादरीकरण महत्वाचे आहे. आपले वीज केंद्र हे ब्रांड बनले पाहिजेत.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *