उपराजधानीसांस्कृतिक

नितेश कराळेची फटकेबाजी तर साईराम अय्यरची आवाजाची जादू

शिवशाही महोत्सवाला नागरिकांचा उदंड प्रतिसाद
.

नागपूर,१७ फेब्रुवारी २०२४:  नरेद्र जिचकार आयोजित ‘शिवशाही’ महोत्सवाचा तिसरा दिवस युवा दिन म्हणून साजरा करण्यात आला.या कार्यक्रमाचे अध्यक्ष पद महाराष्ट्राचे माजी गृहमंत्री अनिल देशमुख यांनी भूषविले. या प्रसंगी ओजस देवतळे आणि नितीन फुके यांना युवा रत्न पुरस्कार देऊन गौरविण्यात आले.

प्रास्ताविक मांडताना नरेंद्र जिचकार यांनी युवा दिनाचे महत्त्व विशद करताना आजच्या युवा पिढीच्या भावविश्वाचे विश्लेषण केले .ते म्हणाले जन आशीर्वाद यात्रेनिमित्त पश्चिम नागपूरच्या प्रत्येक परिसरात, वस्तीतील घरा घरात जाऊन प्रत्यक्ष भेट दिली असता एक गोष्ट प्रकर्षाने जाणवली ती म्हणजे आज शिक्षण साधारणतः सर्व घरात तर पोहचले पण योग्यते नुसार त्यांना रोजगार मिळत नाही ही वस्तुस्थिती आहे.युवा पिढीने छत्रपती शिवाजी महाराजांचे आदर्श डोळ्यापुढे ठेवून ध्येयपूर्तीसाठी संघर्ष करावा.

आजच्या युवा पीढी या विषयावर भाष्य करताना प्रसिद्ध व्याख्यानकर्ते प्रा . नितेश कराळे यांनी नेहमीप्रमाणे आपल्या वर्हाडी शैलीत फटकेबाजी केली . युवा पिढीने निराश न होता सकारात्मक विचाराने आयुष्याकडे बघावे.कराळे म्हणाले मी पदवी करताना चार वेळा आणि एम.पी.एस.सी.मध्येसहा वेळा नापास झालो.पण कधीही निराश झालो नाही.कोरोना काळात माझे व्हिडिओ व्हायरल झाले आणि माझी वर्हाडी भाषा शैलीत शिकवण्याच्या पद्धतीवर अनेक लोकांनी टिका केली.पण रफीक मिर्झा बेग खुश होऊन त्यांनी फोन केला.आपण स्वतः वर विश्वास ठेवला की अपयशाला ही यशाची गवसणी घालता येते.

अध्यक्षीय भाषण देताना माजी गृहमंत्री अनिल देशमुख म्हणाले की शिवशाही महोत्सवाच्या शिव मंडपात येऊन मन प्रसन्न झाले.नरेद्र जिचकार अतिशय महत्त्वाचे कार्य करीत आहेत.मला त्याचा गर्व आहे.आज छत्रपती शिवाजी महाराजाची विचारांची गरज आहे.

प्रसिद्ध गायक साईराम अय्यर नाईटने महोत्सवात रंजकता आणली.तुम मिले दिल खिले या गाण्याला गात साईराम अय्यरनी शिवमंचावर प्रवेश केला.त्यानंतर चुरा लिया हैं तुमने गाणं गात प्रेक्षकात ईन्ट्री करताच प्रेक्षक साईरामाच्या तालावर नाचू लागली

.ऐसी दिवानगी,मार डाला, ढोलारे ,वंदे मातरम् या सारख्या गाणी गात कार्यक्रमात रंग भरला.साईरामच्या जोडीला नागपूरचे सागर मधुमटके, मंजिरी वैद्य यांनी साथ दिली तर संगीत संयोजन परिमल वाराणिश्ववार आणि महेंद्र ढोलेचे होते.शिवशाही महोत्सवाच्या युवा दिनाची सुरवात शिवाजंली या संगीतमय कार्यक्रमाने झाली.कार्यक्रमाला रसिकांनी प्रचंड गर्दी केली.

……………………………..

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *