उपराजधानीक्राइममुक्तवेधराजकारण

होमियोपॅथी रुग्णालयात सेक्स स्कॅण्डल!

(रविवार विशेष)

(छायाचित्र : होमियोपॅथी कॉलेज की अय्याशीचा अड्डा! हॉस्पीटल कॉलेजची चादर,स्टेथोस्कोप,बीपीची मशीन स्पष्टपणे दिसून पडतेय)

नासुप्रच्या २०० कोटींच्या जमीनीचा गौडबंगाल

नासुप्रमधून रुग्णालयासंबंधी जमीनीची फाईलच गहाळ!

गडकरींचे केंद्रिय आरोग्य मंत्रालयाला तक्रारीचे पत्र

मान्यताप्राप्त होमियोपॅथी कॉलेजचे केले औषधीशास्त्र कॉलेजमध्ये परिवर्तन!

उच्च व तंत्रशिक्षण मंत्री चंद्रकांत पाटील,आ.कृष्णा खोपडे यांच्या भूमिकेवर आक्षेप

उपप्राचार्य डॉ.गोपाल भूतडा यांचा होमियोपॅथी रुग्णालय वाचवण्यासाठी प्रदीर्घ लढा

डॉ.ममता खांडेकर
(Senior Journalist)

नागपूर,ता.१८ फेब्रुवरी २०२४ : जगनाडे चौकात सत् चिकित्सा प्रसारक मंडळातर्फे नागपूर सुधार प्रन्यासच्या ८८ हजार चौ.फूटांच्या जागेवर, राष्ट्रीस स्वयंसेवक संघाचे कै.डॉ.भाऊसाहेब दफ्तरी यांनी १९६४ साली होमियोपॅथी कॉलेजची स्थापना केली होती.याचा मूळ हेतू फक्त होमियोपॅथीचा प्रसार व प्रचार,होमियोपॅथीचे रुग्णालय व महाविद्यालयाकरिता ही जागा आरक्ष्त करणे हा होता. मात्र,काँग्रेसचे नेते घनश्‍याम पानपालिया यांनी या कॉलेजचा वापर लैंगिक बाबींसाठी अगदी उघडपणे केला,कॉलेजचे उपप्राचार्य व भारतीय जनता पक्षाच्या वैद्यकीय आघाडीचे उपाध्यक्ष डॉ.गोपाल भूतडा यांनी पानपालिया यांच्या या बेलगाम लैंगिक वर्तनाच्या विरोधात अनेक पुरावे गोळा केले व त्या विरोधात नागपूर विद्यापीठाकडे तक्रार दाखल केली,परिणामी विद्यापीठाने या कॉलेजची मान्यता २०१३ साली काढून घेतली.

पानपालिया यांच्या कार्यकाळात एका महिलेचे प्रकरण बरेच गाजले.शिक्षकांना देखील हक्काच्या पगारासाठी फार मोठा संघर्ष करावा लागला.या संपूर्ण पार्श्वभूमीवर २०१३ साली होमियोपॅथी कॉलेजची मान्यताच रद्द करीत, पत्र काढून या कॉलेजची इत्यंभूत संपत्ती ही शासनाच्या अधीन करण्याची सूचना विद्यापीठाने केली.जगनाडे चौकात डाव्या बाजूला असलेल्या या कॉलेजची ८८ हजार चौ.फू.ची जागा असून ,याशिवाय केडीके कॉलेज समोर आणखी १० चौ.फू.जागा या संस्थेकडे आहे.. संपूर्ण जागेची किंमत २०० कोटी रुपये असून एवढी मोठी संपत्ती शासनाला परत करण्या ऐवजी पानपालिया याने ही संपत्ती २०१३ मध्ये गंगाधर नाकाडे यांना विकली.यावेळी शिक्षक तसेच चतुर्थ श्रेणीतील कर्मचा-यांचे पगार मिळून ५.६० कोटी कॉलेजकडे थकीत होेते.

होमियोपॅथी कॉलेजमध्ये लैंगिक वर्तनाच्या बाबतीत पानपालिया याच्या विरोधात कोतवाली पोलिस ठाण्यात गुन्हा देखील दाखल झाला होता मात्र,१०-१५ लाखांच्या सेटिंगमधून तो थंड बस्त्यात टाकण्यात आला,असा गंभीर आरोप खास ‘सत्ताधीश’सोबत बोलताना डॉ.भूतडा यांनी केला.२०१९ साली सर्वोच्च न्यायालयाने शिक्षक व कर्मचा-यांची संपूर्ण थकबाकी देण्याचे आदेश महाविद्यालयाला दिले.मात्र,२५ ते ३० कोटींमध्ये हे महाविद्यालय पानपालियाकडून विकत घेणारे नाकाडे यांनी सर्वोच्च न्यायालयाचे आदेश धुडकावून लावले!

नाकाडे हे महाविकासआघाडीचे उमेदवार देखील होते मात्र,काही तासांच्या आतच त्यांनी आपली उमेदवारी मागे घेतली होती,हे विशेष!

नाकाडे यांनी हे महाविद्यालय अवैधरित्या ताब्यात घेतल्यावर व्यवस्थापक देखील बदलले व स्वत:च्या मर्जीतील माणसे रुजू केली.धर्मादाय आयुक्तांकडे १ कोटी २० लाख रुपयांची घूस देण्यात आली असल्याचा आरोप डॉ.भूतडा यांनी केला.२०१४ साली राज्यात देवेंद्र फडणवीस यांची सत्ता येत होती.शुक्रवार,शनिवार व रविवार धर्मादाय आयुक्तांकडे पाच लोकांचे अर्ज खारिज होतात. सायंकाळी नाकाडे यांनी स्वत:च्या व्यवस्थापकांची बॉडी प्रस्थापित केली.

(छायाचित्र : डॉ.भूतडा यांनी वृत्तपत्रात ‘नावानिशी’ प्रसिद्ध केलेली नोटीस)

१ जानेवरी २०२३ रोजी नाकाडे यांनी औषधीशास्त्र शाखेत प्रवेशासाठी जाहीरात प्रसिद्ध केली!विद्यापीठाची कोणतीही मान्यता नसताना नाकाडे यांनी ही जाहीरात प्रसिद्ध केली.यासाठी खोटी कागदपत्रे जोडण्यात आली,असा आरोप डॉ.भूतडा करतात.उच्च न्यायालयात या विरोधात धाव घेतली असता,न्यायालयाने सर्व पुरावे मान्य करीत, औषधीशास्त्र शाखेत प्रवेश घेणा-या २८ विद्यार्थ्यांना इतर महाविद्यालयांमध्ये समाविष्ट करण्याचे निर्देश दिले.उच्च न्यायालयाच्या या आदेशा विरोधात नाकाडे सर्वोच्च न्यायालयात गेले.महागडे वकील उभे केले मात्र,पहील्याच सुनावणीत नाकाडे यांना सर्वोच्च न्यायालयाने ते ‘अपराधी‘(कल्प्रिट)असल्याचे खडे बोल सुनावले.खोटी कागदपत्रे लावून औषधीशास्त्राच्या शाखेसाठी प्रवेश मिळवल्याचे सांगत गंभीर टिपण्णी केली.मे महिन्यापासून सर्वोच्च न्यायालयाच्या या आदेशाला आतापर्यंत रिलीफ मिळाला नाही.१६ मे २०२४ रोजी सर्वोच्च न्यायालयाने हा आदेश दिला असून, उच्च न्यायालयाच्या आदेशाला कायम ठेवले आहे.

५० कोटी खर्च करुन नासुप्रची मोक्याच्या जागेवरील २०० कोटींची जागा हडप करायची असल्याचा आरोप डॉ.भूतडा करतात.जून २०२२ मध्ये नाकाडे यांनी मूळ होमियोपॅथीसाठी निर्मित झालेल्या महाविद्यालयाचा वापर बदल(यूजर चेंज)केला.जमीनीच्या बाबतीत गैरव्यवहार केला असल्याची तक्रार करीत डॉ.भूतडा यांनी नासुप्रकडे माहितीच्या अधिकारात या जमीनीच्या संदर्भात माहिती मागितली.याशिवाय होमियोपॅथीसारख्या उदात्त वैद्यकीय शाखेत लैंगिक विकृतीचा प्रदीर्घ काळ जो खेळ खेळण्यात आला त्या विरोधात ५ ऑगस्ट २०२१ मध्ये वृत्तपत्रामध्ये पानपालिया यांच्या नावे जाहीर नोटीस प्रसिद्ध केली.

एवढ्या महत्वाच्या जमीनीबाबतच्या गैरव्यवहाराविषयी २०२३ मध्ये नासुप्रने माहितीच्या अधिकारात कोणतीही माहिती डॉ.भूतडा यांना दिली नाही.या विरोधात डॉ.भूतडा अपीलमध्ये गेले असता, या जमीनीच्या संदर्भातील संपूर्ण फाईलच गहाळ झाल्याचे उत्तर नासुप्रच्या महिला अधिका-यानी दिले!१९६४ ते २०२३ पर्यंत या २०० कोटींच्या जमीनीच्या संदर्भातील फाईल नासुप्रमध्ये तशीच होती मात्र,माहितीच्या अधिकारात माहिती मागितली असता ती फाईलच नासुप्रमधून गहाळ झाली!भू-माफियांपासून आपली संपत्ती वाचवण्यासाठी नासुप्रची कार्यपद्धती कशी आहे?हे प्रकरण याचे ज्वलंत उदाहरण म्हणून सांगता येईल.

कै.भाऊराव दफ्तरी यांच्या अगाध परिश्रमातून साकारलेेल्या या महाविद्यालयाला पुन्हा होमियोपॅथी शाखेची मान्यता मिळावी यासाठी डॉ.भूतडा अविरत प्रयत्नरत आहेत.यासाठी त्यांनी देशाचेे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यापासून तर राष्ट्रपती,राज्यपाल,उच्च व तंत्र शिक्षण मंत्री,राज्याचे मुख्यमंत्री,उपमुख्यमंत्री आदी शीर्षस्थ नेत्यांना हजारो ई-मेल केले.केंद्रिय मंत्री नितीन गडकरी यांनी डॉ.भूतडा यांच्या तक्रारीची गंभीर दखल घेत गडकरी यांनी ७ सप्टेंबर २०२३ रोजी केंद्रिय आरोग्य मंत्री मनसुख मांडविया यांना पत्र लिहून या संपूर्ण धोकाधडीची चौकशी करुन दोषींना योग्य शिक्षा करण्याची शिफारस केली.

(छायाचित्र : केंद्रिय मंत्री नितीन गडकरी यांनी केंद्रिय आरोग्य मंत्र्यांना पाठवलेले पत्र)

५ फेब्रुवरी २०२४ रोजी कै.भाऊराव दफ्तरी ट्रस्टने देखील नासुप्रच्या सभापतींना पत्र लिहून नासुप्रची लीज भूखंड ५४३,आजम शाह ले-आऊट सत् चिकित्सा प्रसारक मंडळाला फक्त होमियोपॅथी चिकित्सा प्रचार व प्रसाराकरीताच आरक्ष्त ठेवण्यासाठी निवेदन दिले.या महाविद्यालयाचे तसेच भूखंडाची उपयोगिता वापर बदलून औषधीशास्त्रासाठी देण्यात येऊ नये,असे त्यात नमूद केले.

स्वत: डॉ.भूतडा यांनी नासुप्र सभापती मनोज सुर्यवंशी यांची भेट घेतली.माहितीच्या अधिकारात मला तुमचे अधिकारी माहिती देत नसून फाईल गहाळ झाल्याचे सांगत आहे,असे त्यांनी सभापतींच्या निर्दशनास आणून दिले.यावर सभापतींनी त्वरीत दूस-या दिवशी सकाळी ११ वाजता अधिका-यांना आपल्या कक्षात तलब केले.मौका चौकशी करा आणि नासुप्रची जमीन नाकाडे यांच्याकडून ताब्यात घेण्याची सूचना केली.यावर पातोडे नावाच्या तसेच सहारे नावाच्या महिला अधिका-यांनी फाईल गहाळ झाल्याचे सांगितले!यावर सभापतींनी फाईल गहाळ झाल्यासंबंधी पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्याचे निर्देश दिले.२०२३ च्या ऑक्टोबर महिन्यात नासुप्र सभापतींनी दिलेल्या या आदेशाची अद्याप अंमलबजावणी झाली नसल्याचे डॉ.भूतडा सांगतात.

नाकाडे यांनीच पैशांच्या जोरावर शासकीय अधिका-यांना मॅनेज केले,असा आरोप डॉ.भूतडा करतात.२०१३ साली नागपूर होमियोपॅथी कॉलेज बंद पडले मात्र,आपल्या प्रतिज्ञापत्रात नाकाडे हे, मी कॉलेज बंद करण्यासाठी अर्ज केला नाही असे सांगतात,मग होमियोपॅथी ऐवजी ते औषधीशास्त्रासाठी प्रवेश कसे देऊ शकतात?नासुप्रच्या परवानगीशिवाय जमीनीचा वापर कसा बदलू शकतात?असा सवाल डॉ.भूतडा करतात.नागपूर महानगरपालिकेचे आयुक्त डॉ.अभिजित चौधरी यांच्याकडे देखील अनेकदा लेखी तक्रार दिली असल्याचे ते सांगतात.मात्र,एवढ्या गंभीर बाबीची त्यांनी देखील कोणतीही दखल घेतली नसल्याची टिका डॉ.भूतडा करतात.३ जानेवारी रोजी डॉ.भूतडा यांनी नासुप्रचे कार्यालय न्यायासाठी अक्षरश: डोक्यावर घेतले. पातोडे यांनी नाकाडे यांना कारणे दाखवा नोटीस पाठविली.याचे उत्तर नाकाडे यांच्याकडून अतिशय बोगस असे आल्याचे डॉ.भूतडा सांगतात.

(छायाचित्र : उच्च व तंत्र शिक्षण विभागातर्फे उच्चस्तरीय चौकशी समितीचा अहवाल १६ मार्च २०२३ नुसार, औषधीशास्त्र कॉलेजसंबंधी सर्व मान्यता खोट्या व बोगस कागदपत्रांच्या आधारे मिळवल्या असल्याचा शेरा)

होमियोपॅथी कॉलेजची लीज रद्द करणारी नोटीस काढणार असल्याचे पातोडे यांनी नाकाडे यांना सांगताच,न्यायालयात सुनावणी सुरु असल्याचे नाकाडे यांनी सांगितले.न्यायालयाच्या आदेशाचे पालन करणार असल्याचे नाकाडे यांनी सांगितले.यावर डॉ.भूतडा यांनी व्यक्तीगत सुनावणी घेण्याची मागणी केली.पातोडे यांनी नोटीस काढून याच वर्षी २४ जानेवरी रोजी सुनावणी ठेवली.डॉ.भूतडा व नाकाडे यांनी समोरासमोर बसून वाद प्रतिवाद केला.फक्त २८ विद्यार्थी प्रवेश असताना नाकाडे यांनी औषधीशास्त्र विभागात ३५० विद्यार्थ्यांच्या प्रवेशाचे बोगस कागदपत्रे दाखवली.दूपारी साढे तीन ते सहा वाजेपर्यंत डॉ.भूतडा यांनी गेल्या पंधरा वर्षांपासूनचा लढा, अभ्यासपूर्ण व कागदोपत्री पुराव्यानिशी मांडला.या जमीनीची लीज होमियोपॅथीसाठी दिली असताना नासुप्रच्या परवागनीशिवाय यूजर चेंज कसा करण्यात आला?होमियोपॅथीसारख्या उद्दात्त वैद्यकीय शाखेच्या ठिकाणाला स्वत:चे विकृत लैंगिक चाळे शमविण्याचे ठिकाण बनविण्यात आले,कॉलेजमधील कक्षालाच स्वत:चे बेडरुम बनविण्यात आले,या विरोधात इतके पुरावे देऊन सुद्धा दोषींविरुद्ध काय कारवाई केली?नाकाडे यांनी कश्‍याप्रकारे बोगस व्यवस्थापकीय बॉडीची रचना केली इत्यादी अनेक विषयांची नासुप्रकडून लिखित दखल घेऊन अहवाल तयार करण्यात आला.

२०० कोटींच्या संपत्तीसाठी नाकाडे हे १५-२० कोटी सहज खर्च करु शकतात,असा आरोप डॉ.भूतडा करतात. मला देखील लाच देण्याचा प्रयत्न झाला.२०२१ मध्ये नासूप्रने आपला अहवाल शासनाला पाठवला.शासनाकडून कोणतेही उत्तर आले नाही.५ एप्रिल २०२१ रोजी धर्मादाय आयुक्तांकडे देखील सार्वजनिक वापराची जागा(पीयू लॅण्ड)ही व्यवसायिक वापरासाठी देता येते का?यासंबंधीची संपूर्ण बॅलेंस शीटच लावून पाठविण्यात आले.वीस वर्ष होत आले मात्र,लढा संपत नव्हता.होमियोपॅथी ऐवजी औषधीशास्त्राच्या अभ्यासक्रमासाठी विद्यापीठाची कोणतीही पूर्व परवागनी नाही,अर्ज नाही,त्यामुळे मेडीकल एज्यूकेशनकडे तक्रार केली.त्यांनी तात्काळ विना परवानगी औषधीशास्त्राचे हे महाविद्यालय बंद करण्याचे आदेश २०२२ मध्ये दिले.

मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्याकडे हे प्रकरण गेले असता त्यांनी नियमानुसार या प्रकरणाची सुनावणी घेण्याची  सूचना नासुप्र सभापतींना केली.तत्कालीन नासुप्रचे विशवस्त विकास ठाकरे,संदीप इटकेलवार,मोहन मते यांना देखील पीयू लॅण्डचे, कमर्शियल उपयोगासंबधी,संपूर्ण प्रकरणाचे ड्राफ्ट पाठविले.मी एका हक्काच्या होमियोपॅथी कॉलेजसाठी खूप काही हरलो असल्याचे डॉ.भूतडा सांगतात.महानगरपालिका,नासुप्रसंबधी अनेक बातम्या प्रसार माध्यमांमध्ये येत असतात मात्र,होमियोपॅथीच्या कॉलेजच्या लढयात कोणाचीही साथ मिळाली नसल्याची खंत डॉ.भूतडा व्यक्त करतात.माझं तारुण्य लढण्यात गेलं,तब्येत ढासळली,उच्च रक्तदाब जडला मात्र,संस्थेसाठी माघार घेणार नाही,असा निर्धार ते व्यक्त करतात.२००६ पासून हा नीतीमत्तेचा आणि न्यायाचा लढा सुरु आहे.चाणक्यने चंद्रगुप्तला राज्य सोपविल्याशिवाय केसांना गाठ बांधली नाही,याच ठिकाणी पुन्हा होमियोपॅथी महाविद्यालय सुरु केल्याशिवाय स्वस्थ बसणार नसल्याचे ते सांगतात.माध्यमांनी माझ्या या लढ्यात माझी साथ दिली पाहीजे,अशी अपेक्षा त्यांनी व्यक्त केली.

या महाविद्यालयात अगदी १४-१५ वर्षाच्या मुलीचे देखील लैंगिक शोषण झाले.माझ्याकडे सर्व पुरावे असून कोणताही संवेदनशील माणूस ते बघून ओकारी करुन देईल,एवढा किळसवाणा प्रकार या महाविद्यालयात सुरु होता.आपल्यावर ही प्रकरणे शेकणार,साढे पाच कोटींचे देणे,सर्वोच्च न्यायालयाच्या आदेशावरुन महाविद्यालयाच्या शिक्षक,कर्मचा-यांना देणे भाग आहे,हे पनपालिया यांच्या लक्षात येताच त्यांनी आपल्या पापाचा भार नाकाडे यांच्यावर टाकून दिला.सत्‌ चिकित्सा प्रसारक मंडळाचे पनपालिया यांच्या कूकर्मांनी ‘सेक्स’ चिकित्सा प्रसारक मंडळामध्ये परिवर्तित केले,अशी खोचक टिका डॉ.भूतडा करतात.

चंद्रकांत पाटील उच्च तंत्र शिक्षण मंत्री आहेत,त्यांच्या मंत्रालयात बोगस कागदपत्रे सादर करुन औषधीशास्त्रासाठी परवागनी प्राप्त करण्यात आली.यासाठी भाजपचे (जातीचे) आ.कृष्णा खोपडे यांची मदत घेण्यात आल्याचा आरोप डॉ.भूतडा करतात.ते नाकाडे यांना चंद्रकांत पाटील यांच्यापर्यंत घेऊन गेले.पाटील यांनी नाकाडे यांच्या प्रकरणात नासुप्रला परत सुनावणी घेण्याचे आदेश दिले!नासुप्रमध्ये झालेल्या पहील्या सुनावणीची ऑन कॅमरा रेर्कोडींग नसल्याने या वेळी ही सुनावणी ऑन कॅमरा घेण्याची मागणी डॉ.भूतडा यांनी केली.नासुप्रचे अधिकारी हे आमदार यांच्या दबावाखाली अहवाल तयार करतील असा आक्षेप मी नोंदवला असता,‘अहवालात तेच असेल जी कागदपत्रे सांगतात’असे आश्‍वासन मिळताच अवघ्या दीड तासातच नाकाडे यांच्या संपूर्ण बोगस कारभाराची चिरफाड केली असल्याचा दावा डॉ.भूतडा करतात.१६ जून २०२३ रोजी पहीली सुनावणी तर अवघ्या १५ दिवसात दुसरी सुनावणी पार पडली.

ऑन कॅमरा मी नाकाडे यांना भू-माफिया,अतिक्रमणकारी,चिटर,फ्रॉड,खोटे कागदपत्रे जोडणारा,पीयू लॅण्डचा गैरकायदेशीररित्या वापर बदलणारा,चिटर इत्यादी असे आरोप मी केले.यावर नाकाडे यांनी रडत,मी चिटर आहे का?अशी विचारणा केली.जो खोटे बोलून गैरकृत्य करतो त्याला चिटर म्हटल्या जातं,असा खुलासा मी केला.नाकाडे यांनी मला,तू का माझ्या मागे लागला आहे?अशी विचारणा केली,मी त्याला होमियोपॅथी कॉलेजच्या जागेवरील अतिक्रमण हटव,पनपालियाला तू दिलेले पैसे परत घे,नासुप्रची जागा परत कर,अशी मागणी मी केली.नाही तर ही लढाई सर्वोच्च न्यायालापर्यंत लढणार असल्याचा दम डॉ.भूतडा यांनी दिला.

पूर्वीपेक्षाही कडक अहवाल यावेळी तयार करण्यात आला.चंद्रकांत पाटील यांच्या मंत्रालयाकडून नाकाडे यांना ‘you can Run a series’असे पत्र मिळाले.शपथपत्र उच्च तंत्र शिक्षण अधिकारी यांनी लिहून घेतले,यासाठी संस्था जबाबदार राहणार नाही.न्यायालयात याबाबतचा वाद सुरु असल्याचे त्यात नमूद करण्यात आले.

१ एप्रिल २०२४ रोजी लीज संपली होती.लीज सुरु ठेवण्यासाठी विद्यार्थी दाखवावे लागतात.नाकाडे यांनी बोगस विद्यार्थ्यांची यादी नासुप्रमध्ये सादर केली.४ जानेवरी आणि २४ जानेवरी रोजी पर्सनल हेअरिंग झाली,आज १८ फेब्रुवरी झाली,आमच्या दोनच मागण्या आहे,लीज रद्द करा.नुकतेच महसूल मंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांनी विधानसभेत ज्यांची लीज संपली आहे ती जागा सरकार आपल्या ताब्यात घेणार असल्याची घोषणा केली.राज्यात अनेकांना जमीन लीजवर देण्यात आली आहे मात्र,जमीनीचा दुरुपयोग होत असल्याचे तसेच ज्या उद्देशाने जमीन लीजवर देण्यात आली त्याविरुद्ध जमीनीचा उपयोग होत असल्यास, अश्‍या जमीनी परत घेण्यात येतील.राधाकृष्ण विखे पाटील यांच्या या घोषणेनुसार जगनाडे चौकातील या जमीनीची लीज नासुप्रने तात्काळ रद्द करावी,अशी मागणी डॉ.भूतडा यांनी केली.

ईडीची सक्रीयता या प्रकरणात कुठे आहे?असा सवाल ते करतात.शासनाच्या एक कोटी महसूलाची लृट झाली.स्टॅम्प ड्यूटी नाही भरली.ईडी कारवाई करु शकते कारण हे प्रकरणत शंभर कोटींच्या पेक्षाही जास्त रकमेच्या जमीनीच्या स्वरुपात आहे,असे भूतडा सांगतात.या संदर्भात ईडी,सीबीआयला देखील मेल केले असल्याचे डॉ.भूतडा यांनी सांगितले.या संदर्भात उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या कार्यालयात देखील हा भूखंड स्व.गंगाधर फडणवीस मेमोरियल गर्व्हमेंट होमियोपॅथी कॉलेज,हॉस्पीटल,रिसर्च सेंटरसाठी आरक्ष्त करुन देण्यासाठी निवेदन देण्यात आले.फडणवीस यांच्या कार्यालयातून ते निवेदन मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्याकडे तसेच उच्च व तंत्र शिक्षण मंत्रालयाकडे पाठविण्यात आले.मात्र,त्याच उच्च व तंत्र शिक्षण मंत्रालयाने विदर्भात शासकीय होमियोपॅथी कॉलेजचा विचार न करता खासगी औषधीशास्त्र कॉलेजसाठी परवागनी बहाल केली.पाटील यांच्या मंत्रालयातील एक अधिकारी हा कट्टर भाजपविरोधी असल्याचा दावा डॉ.भूतडा यांनी केला.सरकार बदलली मात्र,भाजप सरकारचे ‘शासकीय’ विरोधक बदलण्यास भाजप नेते अपयशी ठरले असल्याचा आरोप डॉ.भूतडा करतात.

भाजपचाच एक कार्यकर्ता,राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या एका स्वयंसेवीच्या परिश्रमातून साकारलेल्या होमियोपॅथी कॉलेजची जमीन,भू-माफियाच्या तावडीतून सोडविण्यासाठी प्रदीर्घ काळापासून लढत आहे,ही लाजिरवाणी बाब असून, पंतप्रधान मोदी व भारतीय जनता पक्ष देशात ‘रामराज्य‘आणण्याची घोषणा देतात,याची सुरवात दोषींना दंड व प्रामाणिकांना न्याय देऊन करा,असे आवाहन डॉ.भूतडा करतात.

(डॉ.भूतडा यांचा संपर्क क्रमांक- ९१७५५६०००९)

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *