उपराजधानीराजकारण

‘कहो दिल से‘ला मतदारांचा अल्प प्रतिसाद

नागपूर,रामटेकमध्ये ‘पंजा’चा माहोल

भाजपने केला आचार संहितेचा भंग,बूथवर गडकरी व कमळ चिन्हाची चिठ्ठी मतदारांच्या हातात

मतदानाच्या दिवशी पंतप्रधान शहरात:निवडणूक आहे की थट्टा,बुद्धीजीवींचा संताप

विकास ठाकरेंच्या प्रभावीपणे मागे उभा राहीला ‘कुणबी’ फॅक्टर

काँग्रेसचे सर्वच गट ठाकरेंच्या विजयासाठी लागले होते कामाला:गडकरी मात्र एकटेच

भाजपचा परंपरागत मतदार मतदानासाठी बाहेर पडलाच नाही:मतदानाचे अल्प प्रमाण काँग्रेससाठी संजीवनी

नागपूरात भाजपची साम,दाम,दंड,भेदाची नीती ठरणार अयशस्वी:मुस्लिम,बौद्ध व कुणबी मते पलटणार का बाजी?

हलबांच्या नाराजीवर तोडगा शोधलाच नाही

पर्यावरणवाद्यांचेही ‘नोटा’चा स्वीकार न करता ऐन वेळेवर’पंजा’वर शिक्कामोर्तब

डॉ.ममता खांडेकर
(Senior Journalist)

नागपूर,ता.१९ एप्रिल २०२४: लोकसभेच्या नागपूर व रामटेक मतदारसंघासाठी आज मतदान पार पडले,मुख्य लढत भाजपचे केंद्रिय मंत्री नितीन गडकरी व काँग्रेसचे विकास ठाकरे यांच्यातच होती.तुल्यबळ ठरलेल्या या लढतीत अनेक मुद्दांचा प्रभाव राहीला.मतदान करताना सर्वात आधी नागपूरच्या मतदारांनी विचार केला तो गडकरी यांच्या दहा वर्षांच्या कामांचा,यानंतर काँग्रेसने उभा केलेल्या उमेदवाराचा,यानंतर उमेदवाराच्या जातीचा,भारतीय जनता पक्षाचा पक्ष म्हणून देशातील नीतीचा आणि सर्वात महत्वाचे म्हणजे या मतदानात पक्षातील नेते,काही आमदारांच्या मनापासून पाठींब्याचा,पक्षातीलच पदाधिका-यांचे जातीच्या आधारावर पडणा-या मतांचा देखील कौल ,मतदान माेजणीच्या दिवशी आजच्या लढतीचा निकाल ठरविणार असल्याचे जाणकार सांगत आहेत.

केंद्रिय मंत्री असल्याने गडकरी यांनी नागपूरात तिस-यांदा खासदार म्हणून निवडून येण्यासाठी पुरजोर प्रयत्न केले आहेत मात्र,यावेळी आंबेडकरवादी मतांचे विभाजन झालेच नाही,ती सर्व मते काँग्रेसचे उमेदवार विकास ठाकरेंच्या पाठीशी भक्कमपणे उभी झाल्याचे चित्र होेते.याशिवाय मोमिनपुरा,टेका नाका,जाफर नगर,ऊंटखाना इत्यादी भागातील एकगठ्ठा मुस्लिम मते ही विकास ठाकरेंना जाणारी असल्याने गडकरी यांच्यासाठी धोक्याची घंटा वाजली आहे.सर्वात महत्वाचे म्हणजे उत्तर नागपूरात ज्या प्रकारे दूपारपासून मतदानाची गती संथ झाली किंबहूना संथ करण्यात आल्याचा आरोप केला जात आहे त्याने देखील एका नव्याच वादाला तोंड फोडले.

उत्तर नागपूरात बुथ क्रमांक २११,२१६,३४३ वर बराच गोंधळ झाला.याच बुथवर मुस्लिम मतदारांची भरघोस मते होती मात्र,अनेकांची नावेच मतदार यादीत असतानाही मतदार केंद्रावरुन गायब होती.त्यामुळे गडकरी यांचा विजय सुकर व्हावा यासाठी मुद्दामुन मुस्लिम मतदरांना मतदानापासून वंचित ठेवल्याचा आरोप करणारे अनेक व्हिडीयोज चांगलेच व्हायरल झाले.भाजपने देशपातळीवर ’काँग्रेसमुक्त भारताची’कितीही वल्गना केली तरी या देशात काँग्रेसच्या हक्काचे ३३ टक्के मतदार काँग्रेसच्या मागे भक्कमपणे उभी आहेत हे २०१९ च्या लोकसभेच्या निवडणूकीने सिद्ध केले होते.विविध जाती-धर्मातील हे मतदार भाजपला काहीही झाले तरी मतदान करीत नाही.मुस्लिमांच्या एकगठ्ठा मतांमुळे गडकरी यांच्या अडचणीत वाढ झाली .विशेष म्हणजे,कधी नव्हे ते गडकरी यांनी मोमिनपुरा,ताजाबाद येथे वारंवार सभा घेऊन मुस्लिमांना मतदान करण्याचे आवाहन केले होते मात्र,याचा कोणताही परिणाम मतदानात उमटला नाही उलट,प्रशासकीय पातळीवर ज्याप्रमाणे  मतदानाच्या बाबतीत घोळ झाला,तो गडकरी यांच्या विरोधात मुस्लिम धर्मियांमध्ये रोष वाढवणारा ठरला.

गडकरी यांच्या विजयाचा मार्ग आणखी दुष्कर करण्या मागे ‘जात‘हा आणखी एक फॅक्टर कारणीभूत ठरल्याची चर्चा आहे.भाजपच्या काही नेत्यांकडून,पदाधिका-यांकडून कुणबी असणा-या विकास ठाकरेंच्या पाठीशी आपल्या समाजाचे बळ लावण्यात आल्याची चर्चा आहे.याशिवाय राष्ट्रीय ओबीसी महासंघाने देखील पदवधीर मतदारसंघासारखीच आपली संपूर्ण ताकद विकास ठाकरेंच्या मागे उभी केलेली आढळून आली.या मतांचा देखील फटका गडकरी यांना बसण्याची शक्यता आहे.‘भारत जोडो’ अभियानातील विविध संघटनांनी देखील काँग्रेसचे विकास ठाकरे यांना पाठींबा जाहीर केला होता.

महत्वाचे म्हणजे दहा वर्षांचा कारभाराचा हिशेब जागरुक मतदार घेत असतो.विकासाचे कितीही दावे करण्यात येत असले तरी फक्त उड्डण पूले आणि सिमेंट काँक्रिटचे रस्ते याशिवाय यंदा गडकरी यांना आपली उपलब्धी सांगायला मुद्देच नव्हते,मेट्रोचे श्रेय ते मागील निवडणूकीत घेऊन चुकले होते.नियोजनशून्य सिमेंट काँक्रिट रस्त्यांच्या हव्यासामुळे शहरातील अनेक भागात थोडासा जरी पाऊस पडला तरी लोकांच्या घरात तळ साचले जात असल्याने, ही देखील नाराजी मनात होती.२३ सप्टेंबर २०२३ च्या अतिवृष्टिच्या पाऊसामुळे अंबाझरी भागातील अनेक सुखवस्तु समजल्या जाणा-या भागात प्रचंड त्राही-त्राही माजली.खासदार या नात्याने गडकरी नागरिकांच्या या संकटात कुठेही दिसले नाहीत.परिणामी,पूरपिडीत मतदारांचीही प्रचंड नाराजी आढळली.महत्वाचे म्हणजे भाजपचा परंपरागत मतदार हा मतदानासाठी बाहेर पडलाच नसल्याचे बोलले जात आहे.

मन मानेल तश्‍या उड्डाण पुलांमुळे व्यापारी वर्गात देखील प्रचंड नाराजी होती.मतदानाची टक्केवारी यामुळे देखील प्रभावित झाली.हलबा समाजाच्या जात प्रमाणपत्राच्या वैद्यतेविषयीचे मागील निवडणूकीत दिलेले आश्‍वासान संपूर्ण पाच वर्षाच्या खासदारकीच्या काळात गडकरी यांनी पाळलेच नाही.हलबा समाजातील अनेक मुलांच्या जे नोकरी करीत होते,पुण्यातील त्यांच्या चांगल्या नोक-या या फक्त जात वैद्यता प्रमाणपत्रामुळे गेल्याने हा समाज आतल्या आत धुसमुसत होता.याचा देखील फटका गडकरी यांना बसण्याची शक्यता आहे.

महत्वाचे म्हणजे ‘सत्ताधीश’ने काही मतदारसंघातील युवांना मतदानानंतर बोलते केले असता,तीन वर्षांपासून एम.टेक झालेले तसेच उच्च विद्याभूषित असणा-या युवांनी बेरोजगारीच्या प्रश्‍नावर मतदान केल्याचे सांगितले!हे मतदार कारने मतदान देण्यास आले होते हे विशेष.याचा अर्थ उच्चभ्रू कुटूंबातील मुले देखील बेराेजगारीच्या समस्येने प्रचंड प्रमाणात ग्रासली असताना,गडकरी यांच्या विकासाच्या एजेंडामध्ये युवा मतदारांसाठी कोणतेही आश्‍वासक,आश्‍वासन नव्हते.दर वर्षी ५० हजार नोक-या देणार असल्याचे आश्‍वासन गडकरी यांनी दिले होते मात्र,पाच वर्षांच्या खासदारकीच्या काळात केवळ ६२ हजार नोक-या दिले असल्याचा आकडा  ते सांगत आले,जे बेरोजगार युवांना भावले नसावे.

पंतप्रधान मोदींची लहर दोन्ही मतदारसंघात कुठेच दिसली नाही.विशेष म्हणजे नागपूर व रामटेक लोकसभा मतदार संघासाठी आज मतदान पार पडतानाही, मोदी यांनी वर्धा येथे सभा घेतली व नागपूरात मुक्कामी आहेत.यावर देखील शहरातील बुद्धिजीवींनी तीव्र नाराजी व्यक्त केली.आचार संहितेच्या काळात पंतप्रधानाचे मतदान होणा-या शहरात मुक्काम म्हणजे मतदारांना सरळ-सरळ प्रभावित करणारी कृती होय,असा आक्षेप त्यांनी घेतला.उत्तर प्रदेशच्या ८० जागा असून देशात त्या पाठोपाठ महाराष्ट्रात ४८ लोकसभेच्या जागा आहेत त्यामुळे मोदी यांना त्यांचे ‘चारसो पार’चे स्वप्न पूर्ण करण्यासाठी महाराष्ट्रातील अधिकाधिक जागा जिंकणे क्रमप्राप्त आहे.या पार्श्वभूमीवर मोदी यांनी चंद्रपूर,कन्हान तसेच वर्धा येथे सभा घेतल्या मात्र,नागपूर आणि रामटेकमध्ये त्यांची ‘लहर’उमटली नसल्याचे दिसून पडतंय.

शहरातील जागरुक पर्यावरणवादी हे गडकरी यांच्या गेल्या दहा वर्षांच्या एककल्ली विकास योजनांमुळे तसे ही नाराज होते.अनेक व्हॉट्स ॲप्स ग्रूप्सवर या निवडणूकीत ‘नोटा’वर चाललेली त्यांची चर्चा ऐन वेळी ‘पंजा’कडे झुकलेली आढळली.

याशिवाय उन्हाने आज तापमानाचे सर्व रेकॉर्ड तोडल्याने याचा देखील परिणाम मतदानावर झाला. उन्हापासून बचाव,सावलीत रांगा,मतदारांसाठी थांबण्यासाठी खोल्या इत्यादी केलेले दावे हे अनेक मतदार केंद्रांवर फोल ठरलेले दिसत होते.

थोडक्यात,नागपूरात आजच्या मतदानाचा कल हा, प्रचंड प्रमाणात वाढलेली महागाई,बेरोजगारी,पर्यावरणवाद्यांची नाराजी, कुणबी फॅक्टर,पूर पिडीतांची नाराजी,हलबांची नाराजी,शहरातील व्यापा-यांची नाराजी,आंबेडकरी मतांचे विभाजन न होणे,एमआयएमचा उमेदवार नसल्याने मुस्लिम मतांचे विभाजन न होने व त्याचा फायदा काँग्रेसला होने,मुस्लिमांची भाजप विरोधात नेहमीची एकज़ुटता,गडकरी हे चांगले नेते असले तरी भाजपवरील राग,भाजपच्या परंपरागत मतदारांनी मतदानाकडे दाखवलेली पाठ,कधी नव्हे ते काँग्रेसचे केदार गट,नितीन राऊत गट,चतुर्वेदी गट,प्रफूल्ल गुडधे पाटील यांनी अतुल लोंढे,अभिजित वंजारी व विलास मुत्तेमवारांच्या सोबतीने विकास ठाकरेंच्या पाठीशी उभे केलेले आपले संपूर्ण पाठबळ व सर्वात महत्वाचे म्हणजे गडकरी यांच्या पाठीशी संपूर्ण ताकदीने उभी राहीलेली न दिसणारी पक्षातील छूपी ताकद इत्यादी अनेक घटक हे गडकरींच्या विजयाचा मार्ग किती दुष्कर करतात हे ४ जून रोजीच नागपूरकरांना कळेल.परिणामी,‘कहो दिल से..नितीन जी फिर से’चा मार्ग अवघड वाटत आहे.
……………………

 

One thought on “‘कहो दिल से‘ला मतदारांचा अल्प प्रतिसाद

  • Ashish Pund

    Kaho Dil se congress Fir se

    Reply

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *