उपराजधानीसांस्कृतिक

’तुम जो मिल गये हो..’प्रेमगीतांनी रिझवले

’तुम जो मिल गये हो..’प्रेमगीतांनी रिझवले

नागपूर: पार्श्वगायक मोहम्मद रफी यांचा अजरामर आवाज आजही रसिकांच्या मनाचा खोलवर ठाव घेणाराच ठरतो. त्यांच्या हयातीत २६ हजारपेक्ष्ाही अधिक गीते त्यांनी हिंदी तसेच इतरही भाषेत समरसून गायली. त्यांच्या आवाजातील मधाळपणा,सुरांचे माधूर्य ऐकण्यासाठी त्याकाळी फक्त रेडियो हेच एकमेव माध्यम होते. तरीही त्या गाण्यांची भूरळ आजही रसिकांना तेवढीच मोहून जाते. त्यांनी गायलेली अनेक प्रेमगीते हे आजही तरुणाईला साद घालतात..वेड लावतात. असेच एक गीत म्हणजे फिल्म ‘हसते जख्म’ चित्रपटातील ‘तुम जो मिल गये हो..’. हे आहे. खांडेकर ऑकेस्ट्रा व नुपूर संगीत संचातर्फे शनिवारी सायंटिफिक सभागृहात ‘तुम जो मिल गये हो..’ हा संगीतमय कार्यक्रम पार पडला. कार्यक्रमातील प्रेमगीतांनी श्रोत्यांना अक्ष् रश: रिझवले.
रचना खांडेकर-पाठक यांनी हे शीर्षक गीत सादर करुन श्रोत्यांची उस्फूर्त दाद मिळवली. पुरुष पार्श्व गायकांची गाणी अलीकडे अनेक फिमेल पार्श्वगायिका गाताना दिसतात याचे कारण आवाजाची उंच पट्टी,गीतांचे बोल,भाव,संगीत याची भूरळ वेगळीच असते. रचना यांनी रफी यांचे गाणे हुबेहुब ताला-सुरात सादर करुन श्रोत्यांची मने जिंकली. यानंतर मिलिंद कोरटकर यांनी रफी यांचेच ‘आने से उसके अाये बहार’ हे दूसरे प्रेमगीत अतिशय तरळतेने सादर केले. अभय पांडे यांनी सादर केलेल्या’दर्दे दिल दर्दे जिगर’ या गीताने श्रोत्यांनाही प्रेयसीच्या आठवणीच्या हिंदोळ्यात हळूवार झूलवले. डॉ.ममता खांडेकर यांनी लताबाई यांनी गायलेल्या प्रेमगीतांचा ‘स्वरगुच्छ’ सादर केला. यात ’तेरे लिये पलको की झालर बूनू, तूम सामने बैठे रहो, दूरी ना रहे कोई, कया जानू सजन, मेरे जीवनसाथी कली थी मै तो प्यासी, मेरे दिल में हल्की सी वो खलीश है’या गीतांचा समावेश होता. श्रोत्यांनी ‘क्या जानू सजन’या गीताला वन्स मोर केला. मुश्‍ताक शेख यांनी ‘तेरे नाम’ चित्रपटातील गाजेलेले ‘तुमसे मिलना बाते करना बडा अच्छा लगता है’ या गीतावर श्रोत्यांनाही नादस्वरांवर तरंगवले. पुष्पा जोगे यांनी ‘दिल तो है दिल’ हे गीत सादर केले.

कार्यक्रमात ‘ दिल चीज क्या है’ ‘ लंबी जुदाई’ ही एकल गीते तर ’ आके तेरी बांहो मे’, कभी मैं कहू कभी तूम सुुनो’, साथीया तुने क्या किया’, दिवाना हूआ बादल, आजकल तरे मरे प्यार के चर्चे’ ही युगल गीते रचना यांनी मुश्‍ताख शेख, अभय पांडे व मिलिंद यांच्यासोबत सादर करुन टाळ्यांचा कडकडाट मिळवला. ‘नीले नीले अंबर पर’ गीत सादर करुन अभय पांडे तर ’चाहीये थोडा प्यार ’गीतावर मुश्‍ताख शेख यांनी माहोल केला. ‘कौन है जो सपनो में आया’ गीत मिलिंद यांनी सादर केले. संकल्पना रचना खांडेकर-पाठक यांची होती. संगीत संयोजन रमेश खांडेकर व पवन मानवटकर यांचे होते. उत्कृष्ट निवेदन सुप्रसिद्ध निवेदक डॉ. महेश तिवारी यांनी केले. की-बोर्डवर पवन मानवटकर, गिटारवर प्रकाश चव्हाण, ड्रम्सवर अशोक ठवरे, ढोलक व कांगोवर रघूनंदन परसरतवार, ऑक्टोपॅडवर अक्ष् य हरले यांनी उत्कृष्ट साथसंगत केली. कार्यक्रमाला श्रोत्यांची भरगच्च उपस्थिती लाभली.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *